A नाव समोर येताच बॉलिवूडचा खिलाडी म्हणजे अक्षय कुमारच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. अक्षय कुमार आणि दीपिका पादुकोणने तीन फिल्ममध्ये काम केलं आहे. चांदनी चौक टू चायना, हाऊसफुल आणि देसी बॉयज या फिल्ममध्ये ते एकत्र होते. शिवाय ओम शांती ओममध्येही अक्षय कुमार दिसला होता.When News channel said A name superstar My mom was like is it Akshay Kumar Then my sister came to his defense that he doesnt even drink Drugs are a far case#AkshayKumar ka brand hi esa h P.S. -She is not a big Bolywood fan
— लौहपुरूष Ashu (@RDJAkshayKumar) September 29, 2020
त्यामुळे A म्हणजे दुसरं तिसरं कुणी नाही तर अक्षय कुमारच आहे असा अंदाज सोशल मीडियावर बांधला जातो आहे. त्याच्या चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. अक्षय कुमारसाठी त्याचे चाहते लगचेच धावून आले. सोशल मीडियावर यावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. हे वाचा - 'पाणी फाऊंडेशन'मुळे साताऱ्यातील गावात फुललं आनंदवन; आमिर खानने शेअर केला VIDEO अभिनेत्री दीपिका पादुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंह यांच्या तपासानंतर त्यांचे मोबाइल फोन जप्त करण्यात आले असून यातून मोठा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यानंतर अनेक कलाकारांविरोधात एनसीबी लवकरच चार्जशीट दाखल करणार आहे. मोठमोठे बॉलिवूड सेलिब्रिटी एनसीबीच्या रडारवर आहेत. त्यापैकी काही जणांची आता चौकशी सुरू आहे. शिवाय आणखी अधिक खुलासे होण्याची शक्यता आहे. हे वाचा - मुंबई पोलिसांचे अनुराग कश्यपला समन, #metoo प्रकरणात उद्या होणार चौकशी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बैठकीनंतर एनसीबीने या केसच्या तपासात काही प्राथमिकता ठरवल्या आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे एनसीबी दीपिका पदुकोन, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकुल प्रीत सिंहच्या बँक अकाऊंटमधून केलेल्या ट्रान्झॅक्शनचा तपास करतील. पहिली प्राथमिकता आतापर्यंतच्या सर्व लोकांचा जबाब रिव्ह्यू करणं होतं. यासोबतचं सर्व पॅडलर्सचा जबाबही रिव्ह्यू करण्यात येईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फोनवर डंप डाटा येण्यापूर्वी जबाब रिव्ह्यू केल्यानंतर येणाऱ्या निकालानुसार पुढील रणनीती ठरविण्यात येईल. यामध्ये कॉल डिटेल्स, एसएमएस, व्हॉट्सअॅप चॅट यासर्वांचा तपास केला जाईल. 2017 ते 2020 पर्यंत डंप डाटा तपासण्यात येईल. हे सर्व इतकं सोपं नाही. यामध्ये अधिक काळ लागू शकतो. सोबतचं यादरम्यान जर काही सुगावा लागला तर कारवाई करण्यात येईल.Bhaitards are fully Confused #AkshayKumar ko Superstar mane ki nhi ,ek ko Drug case me drag bhi krna hai to ek bolta hai wo ho hi nhi sakta hai kyoki wo superstar nhi hai....
— ༆ (@AdityaS_Indian) September 30, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Akshay Kumar, Bollywood