मुंबई, 30 सप्टेंबर : अभिनेता सुशांत राजपूत मृत्यू (Sushant singh rajput) प्रकरणात ड्रग्ज अँगलने (drug) तपास करताना D, N, S, K ही नावं समोर येताच तीन बड्या अभिनेत्रींची नार्कोटिक्सच कंट्रोल ब्युरोकडून चौकशी सुरू झाली. आता मीडिया रिपोर्टनुसार एनसीबीला A, R आणि S अशी नावं सापडली आहेत. A नाव समोर येताच अक्षय कुमारच्या (Akshay kumar) नावाने चर्चा सुरू झाली आहे. याचदरम्यान अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्नाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये तिने अक्षय कुमारबाबत काही खुलासे केले आहेत.
हा सोशल मीडियावरील मुलाखतीचा व्हिडीओ आहे. ज्यामध्ये अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना एकत्र आहेत. यामध्ये ते एकमेकांची टिंगल करताना दिसत आहेत. यादरम्यान ट्विंकल म्हणते, "अक्षय खूप चांगला कुक आहे. माझं ब्रेन कसं फ्राय करायचं, माझं ब्लड कसं बॉईल करायचं हे त्याला चांगलंच माहिती आहे" ट्विंकल खन्नाने अक्षय कुमारबाबत अशी मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे.
एबीपी न्यूजच्या रिपोर्टनुसार एनसीबी आता लवकर A, R आणि S या नावाच्या अभिनेत्यांची चौकशी करणार आहे. या तिन्ही सुपरस्टार्सनी अभिनेत्री दीपिका पादुकोणसह काम केलं आहे, असंही या रिपोर्टमध्ये सांगितलं जातं आहे. A नावाचा सेलिब्रिटी स्वत: ड्रग्ज घेतो आणि इतरांनाही देतो, असा दावा केला जातो आहे. त्यामुळे A म्हणजे दुसरं तिसरं कुणी नाही तर अक्षय कुमारच आहे असा अंदाज सोशल मीडियावर बांधला जातो आहे. त्याच्या चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. अक्षय कुमारसाठी त्याचे चाहते लगचेच धावून आले. सोशल मीडियावर यावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
हे वाचा - ड्रग्ज कनेक्शनमध्ये अक्षय कुमारही? NCB च्या तपासात A नाव समोर येताच माजली खळबळ
अभिनेत्री दीपिका पादुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंह यांच्या तपासानंतर त्यांचे मोबाइल फोन जप्त करण्यात आले असून यातून मोठा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यानंतर अनेक कलाकारांविरोधात एनसीबी लवकरच चार्जशीट दाखल करणार आहे. मोठमोठे बॉलिवूड सेलिब्रिटी एनसीबीच्या रडारवर आहेत. त्यापैकी काही जणांची आता चौकशी सुरू आहे. शिवाय आणखी अधिक खुलासे होण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Akshay Kumar, Bollywood