मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Spinach Juice Benefits: पालकचा रस या 6 आजारासाठी आहे विशेष गुणकारी, जाणून घ्या हिवाळ्यातील फायदे

Spinach Juice Benefits: पालकचा रस या 6 आजारासाठी आहे विशेष गुणकारी, जाणून घ्या हिवाळ्यातील फायदे

5. पालक
हिरव्या पालेभाज्यांमध्ये पालकचा समावेश आरोग्यदायी पदार्थांच्या यादीत होतो. यामध्ये आयर्न, फोलेट, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी सारखे पोषक घटक आढळतात, ज्यामुळे तुमचे केस निरोगी राहतात.
(सूचना: येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

5. पालक हिरव्या पालेभाज्यांमध्ये पालकचा समावेश आरोग्यदायी पदार्थांच्या यादीत होतो. यामध्ये आयर्न, फोलेट, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी सारखे पोषक घटक आढळतात, ज्यामुळे तुमचे केस निरोगी राहतात. (सूचना: येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

विशेषतः हिवाळ्यात पालकचा रस (Spinach Juice ) शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतो. आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यासोबतच त्वचा, केसांच्या समस्यांसह अनेक आजारांशी लढण्यास (Spinach Juice Benefits) त्यामुळे मदत मिळते.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 17 डिसेंबर : पालक (Spinach ) ही आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर भाजी आहे. पालक भाजी म्हणून खात असो किंवा पालकाचा रस पिणे असो, दोन्ही बाबतीत पालक आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरतो. पालकची चव अनेकांना आवडत नसली तरी पालक पोषक तत्वांचा खजिना आहे आणि बऱ्याच शारीरिक समस्यांचे निराकरण करण्यात प्रभावी आहे. विशेषतः हिवाळ्यात पालकचा रस (Spinach Juice ) शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतो. आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यासोबतच त्वचा, केसांच्या समस्यांसह अनेक आजारांशी लढण्यास (Spinach Juice Benefits) त्यामुळे मदत मिळते.

पालकमध्ये भरपूर पोषक तत्वे असतात. स्टाइलक्रेसच्या बातमीनुसार, पालकमध्ये कॅरोटेन, अमिनो अॅसिड, लोह, आयोडीन, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असते. त्यात जीवनसत्त्वे ए, सी, के, ई आणि बी कॉम्प्लेक्स देखील भरपूर असतात. पालकचे नियमित सेवन केल्याने आपल्या शरीराची पीएच पातळी संतुलित राहते. पालकमध्ये प्रोटीन आणि फायबर देखील मुबलक प्रमाणात असतात.

हे आहेत पालक खाण्याचे फायदे

1. अॅनिमिया - शरीरात रक्त कमी झाल्यामुळे अॅनिमियाचा त्रास होतो. पालकमध्ये भरपूर लोह आढळते. याच्या मदतीने शरीरात लाल रक्तपेशी वेगाने तयार होतात. त्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता जलद दूर होते.

2. संधिवात - पालक क्षारयुक्त आहे. यामुळेच जेव्हा संधिवाताचा त्रास असेल तेव्हा पालकचे सेवन केल्याने या समस्येपासून आराम मिळतो.

3. पोटाच्या समस्या - पोटाशी संबंधित समस्या असलेल्या लोकांसाठी पालक खाणे खूप फायदेशीर आहे. पालकामध्ये भरपूर फायबर आढळते. अल्सर, कमकुवत पचनसंस्था आणि बद्धकोष्ठता यासारख्या पोटाच्या समस्यांपासून मुक्त होण्यास मदत होते.

4. ऑस्टिओपोरोसिस - ऑस्टियोपोरोसिस या घातक रोगाशी लढण्यासाठीदेखील पालक प्रभावी आहे. पालकमध्ये व्हिटॅमिन के आढळते. याच्या मदतीने कॅल्शियम हाडांच्या आत घट्ट राहण्यास मदत होते. त्यामुळे हाडे निरोगी आणि मजबूत होतात.

हे वाचा - Healthy Drink : मेथी-ओव्याचे पाणी पिण्याचे आरोग्यासाठी आहेत अनेक फायदे, जाणून घ्या बनवण्याची पद्धत

5. त्वचा – पालकचे नियमित सेवन आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. पालकचा रस नियमितपणे प्यायल्याने त्वचेची गेलेली चमक परत येते आणि त्यात मुलायमपणा येतो. कालांतराने सुरकुत्या आणि काळी वर्तुळे कमी होण्यास मदत होते. महागडी अँटी-एजिंग क्रीम्स किंवा स्किन टॉनिक वापरण्याऐवजी रोज एक ग्लास पालकचा रस पिणे खूप फायदेशीर ठरू शकते.

हे वाचा - Winter Health: थंडीच्या दिवसात अशक्तपणा जाणवतोय? या 5 फळांचा आहारात करा समावेश

6. केस - त्वचेप्रमाणेच पालकचा रस केसांसाठीही खूप फायदेशीर आहे. केस पातळ होणे किंवा टाळूला खाज सुटणे अशा परिस्थितीत पालकच्या रसाचा खूप फायदा होतो. पालकमध्ये व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स मुबलक प्रमाणात असते. केसांची वाढ वाढवण्यासोबतच केस मजबूत होण्यासही मदत होते.

(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Health, Health Tips