लंडन, 26 जानेवारी : कधी घरी काही बनवण्याचा कंटाळा आला, घरात एकटं असू किंवा बाहेरचं काही खायची इच्छा झाली, पार्टी करायची असेल. निमित्त काहीही असो कधी ना कधी ऑनलाईन फूड (Online Food) मागवलं जातं. तुम्हीही असं ऑनलाईन फूड ऑर्डर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी तितकीच महत्त्वाची आहे. ऑनलाईन वस्तू मागवणं असो किंवा फूड त्याबाबत काही जणांना विचित्र अनुभव आलेला आहे. ऑनलाईन फू़ड ऑर्डर करणाऱ्या एका महिलेने सोशल मीडियावर आपला असाच अनुभव मांडला आहे.
यूकेतील एका महिलेने ऑनलाईन चिकन मागवलं होतं. पण चिकन खाताच तिला त्यात जे सापडलं ते पाहून तिला धक्काच बसला. कॅटी मोस असं या महिलेचं नाव आहे
(Spider in chicken).
चेशायरमध्ये राहणाऱ्या कॅटीने मॅकडोनाल्ड्समधून चिकन आणि बेकन रोल
(Mac D Chicken Wrap) ऑनलाईन ऑर्डर केले होते. तिने रोल खाल्ला त्यानंतर तिला दातात काहीतरी विचित्र चावल्यासारखं वाटलं. तिने चावलेला घास तोंडाबाहेर काढला. तेव्हा त्यात जे दिसलं ते पाहून तिला उलटीच आली. चिकनमध्ये दुसरं तिसरं काही नाही तर चक्क एक कोळी होता.
हे वाचा - Shocking! जोशात 167 किलो वजन उचलायला गेली तरुणी; हात तुटून धडापासून वेगळा झाला
मॅक-डीसारख्या प्रसिद्ध फूड कंपनीकडून असं काहीतरी खायला मिळेल यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. तिने लगेच याचा फोटो काढला आणि सोशल मीडियावर शेअर केला. तसंच कंपनीकडे तिने तक्रारही केली.

मॅक-डीने कोबीमार्फत हा कोळी गेला असावा, पण तरी शेफला काळजी घ्यायला हवी होती, असं याबाबत कंपनीने आपली प्रतिक्रिया दिली. याचा तपासही सुरू केला. कंपनीने तिची माफी मागत तिला रिफंड आणि रिप्लेसमेन्ट वाऊचर ऑफर केलं. पण कॅटीने आपण आता पुन्हा इथून फूड मागवणार नसल्याचं स्पष्ट केलं.
बर्गरमध्ये सापडला होता विंचू
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये भारतातही असंच एक प्रकरण समोर आलं होतं. हॉटेलमध्ये ऑर्डर केलेल्या बर्गरमध्ये (Scorpion found inside burger in the hotel) चक्क विंचू सापडला होता. तरुणाने बर्गरचा पहिला घास चावताच त्याला विचित्र चव लागल्याने त्याने घास तोंडातून बाहेर काढला. पाहतो तर काय? विंचूचा अर्धा भाग त्यात होता. मग त्याने बर्गर उघडून पाहिल्यावर त्यात मेलेला विंचू असल्याचं दिसून आलं.
हे वाचा - बेस्ट फ्रेंडलाच लग्नात No entry; नवरीबाईने ठेवली विचित्र अट कारण...
त्याने हॉटेलच्या स्टाफकडे तक्रार केली. हॉटेल मॅनेजरच्या ही गोष्ट लक्षात येताच त्याने बर्गर उघडून त्यातील विंचू बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. आपल्या चुकीवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न मॅनेजर करत असल्याचं पाहून तरुण आणि त्याच्या मित्रानं पोलिसांना बोलावून घेतलं. त्यावेळी हॉटेलच्या मॅनेजरने तरुण आणि त्याच्या मित्रावर दादागिरी करत त्यांना धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला. याचदरम्यान तरुणाची तब्येत बिघडली. त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.