Home /News /lifestyle /

Spices Storage T‬ips: तुमच्या Kitchen मधील मसाले वर्षभर राहतील एकदम Fresh; या सोप्या टिप्स वापरून पाहा

Spices Storage T‬ips: तुमच्या Kitchen मधील मसाले वर्षभर राहतील एकदम Fresh; या सोप्या टिप्स वापरून पाहा

Spices Storage Tips: आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत, ज्यांचा वापर करून तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरातील मसाले वर्षभर सहज साठवू शकता. यामुळं मसाल्यांचा सुगंध दीर्घकाळ टिकून राहतोच; शिवाय, त्यांची चवही बिघडणार नाही.

    मुंबई, 24 जानेवारी : भारतीय खाद्यपदार्थांची चव आणि स्वाद त्यात वापरल्या जाणाऱ्या विविध मसाल्यांमुळेच आहे. भारतीय संस्कृती जशी वैविध्यपूर्ण आहे, तशीच भारतीय खाद्यपदार्थांचीही खूप मोठी यादी आहे. मसाल्याशिवाय (Spices) खाण्याची कल्पनाच करता येत नाही. त्यामुळेच वर्षभराचे मसाले विकत घेऊन एकत्र साठवले जातात. अन्नाला चविष्ट बनवणारे हे मसाले वर्षभर योग्य पद्धतीनं साठवून ठेवणंही खूप गरजेचं आहे. प्रत्येक घरात ते साठवण्याची (Spices Storage Tips) स्वतःची पद्धत असते. आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत, ज्यांचा वापर करून तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरातील मसाले वर्षभर सहज साठवू शकता. यामुळं मसाल्यांचा सुगंध दीर्घकाळ टिकून राहतोच; शिवाय, त्यांची चवही बिघडणार नाही. या महत्त्वाच्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा 1. हवाबंद डब्याचा वापर - स्वयंपाकघरातील मसाले वर्षभर व्यवस्थित ठेवण्यासाठी ते हवाबंद बॉक्स किंवा डब्यात ठेवणं आवश्यक आहे. तुम्ही मसाले काचेच्या भांड्यात ठेवा किंवा लोखंडी डब्यात ठेवा. पण त्यात थेट हवा त्यांना जाणार नाही, याकडं नेहमी लक्ष ठेवा. जेव्हा तुम्ही या डब्यांमधून मसाले वापरण्यासाठी बाहेर काढाल, तेव्हा लगेचच बॉक्स व्यवस्थित बंद करा. 2. अंधारात ठेवा - मसाल्यांची चव आणि सुगंध आपल्या जेवणाची चव वाढवतो. या मसाल्यांचं नेहमी थेट सूर्यप्रकाशापासून संरक्षण केलं पाहिजे. मसाल्यांवर कडक ऊन पडल्यामुळं त्यांचा सुगंध नष्ट होऊ शकतो. तेव्हा मसाले ठेवण्यासाठी नेहमी अशी जागा निवडावी, जिथं थेट सूर्यप्रकाश पोहोचणार नाही. 3. उष्णतेपासून दूर राहा - अनेक घरांमध्ये गॅस शेगडीभोवती मसाले ठेवले जातात. जरी ते सुंदर दिसत असले तरी, यामुळं मसाल्यांची चव झपाट्यानं खराब होऊ शकते. मसाल्यांना जास्त उष्णता लागल्यास हळूहळू त्यांची चव जाते. तेव्हा ज्या भागात खोलीचं तापमान सामान्य असेल तिथं मसाले ठेवण्यासाठी जागा करा. हे वाचा - Adani Wilmar IPO 27 जानेवारीला येणार, गुंतवणूकदारांना कमाईची संधी; वाचा महत्त्वाच्या गोष्टी 4. आर्द्रतेपासून संरक्षण करा - जास्त ओलावा स्वयंपाकघरातील मसाल्यांचं बरंच नुकसान करू शकतो. अशा परिस्थितीत, मसाले अशा ठिकाणी साठवले जाणं आवश्यक आहे, जिथं ओलावा पोहोचू शकत नाही. अन्यथा, मसाले खराब होऊ शकतात. जेव्हा तुम्ही मसाले बाहेर काढाल तेव्हा लक्षात ठेवा की, तुमचे हात कोरडे असतील. चमचा वापरत असल्यास, चमचा कोरडा असल्याची खात्री करा. हे वाचा - Children’s height : आई-वडिलांपेक्षा मुलं कशी काय बरं उंच होतात? कारणही आहे तसंच खास 5. जास्त काळ साठवून ठेवू नका – मसाले किती दिवस साठवता येतात, याविषयी स्पष्ट माहिती उपलब्ध नाही. पण आपल्या सर्वांना माहीत आहे की, मसाले जितके जुने होतील तितकी त्यांची चव आणि सुगंध कमी होईल. तेव्हा फक्त एक वर्षासाठी मसाले साठवा. गेल्या वर्षीचे मसाले उरले असतील तर ते आधी वापरावेत. नाहीतर, जास्त दिवस न वापरल्यास मसाले जेवणाची चव वाढवण्याऐवजी बिघडवू शकतात.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Food, Lifestyle

    पुढील बातम्या