मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

दहशतवाद्यांच्या बायका इस्रायलच्या जेलमधून स्पर्म बाहेर कशा आणतात वाचून बसेल धक्का!

दहशतवाद्यांच्या बायका इस्रायलच्या जेलमधून स्पर्म बाहेर कशा आणतात वाचून बसेल धक्का!

पॅलेस्टाईनचे दहशतवादी (Palestine terrorists) आपला वंश वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण त्यासाठी कुठल्या पातळीवर काय कल्पना प्रत्यक्षात आणली जात आहे. वीर्याचं (Sperms) स्मगलिंग करण्यासाठी चॉकलेटचा कागद, रिकामे सिगरेट लायटर, फळांचाही होतोय वापर.

पॅलेस्टाईनचे दहशतवादी (Palestine terrorists) आपला वंश वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण त्यासाठी कुठल्या पातळीवर काय कल्पना प्रत्यक्षात आणली जात आहे. वीर्याचं (Sperms) स्मगलिंग करण्यासाठी चॉकलेटचा कागद, रिकामे सिगरेट लायटर, फळांचाही होतोय वापर.

पॅलेस्टाईनचे दहशतवादी (Palestine terrorists) आपला वंश वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण त्यासाठी कुठल्या पातळीवर काय कल्पना प्रत्यक्षात आणली जात आहे. वीर्याचं (Sperms) स्मगलिंग करण्यासाठी चॉकलेटचा कागद, रिकामे सिगरेट लायटर, फळांचाही होतोय वापर.

पुढे वाचा ...
तेल अवीव, 15 डिसेंबर : इस्रायल(Israel) आणि पॅलेस्टाईनचं (palestine) शत्रुत्व जगाला नवीन नाही. मागील अनेक दशकांपासून दोन देशांमध्ये लढाई सुरू असून धर्माच्या आधारावर साम्राज्यवाद आणि त्यातून ही लढाई सुरू आहे. दोन विशिष्ट समुदायांमध्ये हे युद्ध सुरू असून इस्रायलच्या स्थापनेपासून या दोन्ही देशांमध्ये ही कथित धर्माची लढाई सुरू आहे.
पॅलेस्टाईन-इस्रायल संघर्ष  हा पॅलेस्टिनी अरब विरुद्ध ज्यू यांच्यातला आहे. पश्चिम आशियातील प्रदेशावर कुणाचा ताबा यावरून या दोन देशांमध्ये पाहिल्यापासून संघर्ष सुरू होता. ज्यू धर्माचा या जागेवर जन्म झाल्याचा दावा ज्यू करत होते. ख्रिश्चनांचाही हाच दावा आहे की ख्रिश्चन धर्म याच जागेवर जन्मला. पहिल्या महायुद्धानंतर ब्रिटनने पॅलेस्टाईनवर नियंत्रण मिळवलं. पण यानंतर हा प्रश्न अधिकच जटील झाला. या प्रदेशात अरब लोक राहतात आणि ज्यूंनासुद्धा इथं राहायचं होतं. त्यामुळे दोन्ही धर्माच्या नागरिकांना समाधान म्हणून यहुदी नागरिकांसाठी इस्रायल या देशाची स्थापना करण्यात आली. परंतु पॅलेस्टाईनला मान्यता देण्यात आली नाही. तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये म्हणजेच पॅलेस्टिनी अरब मुस्लिम आणि इस्रायलमधील ज्यू धर्माच्या नागरिकांमध्ये संघर्ष सुरु आहे. हजारो वर्षांपासून ज्यू लोकांचा या प्रदेशाशी ऐतिहासिक आणि धार्मिक कारणांनी संबंध आहे. या दोन्ही देशांना जेरुसलेम(jeruslem) आपली राजधानी म्हणून हवी आहे. परंतु अजूनपर्यंत यावर तोडगा निघाला नसून आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील अजूनपर्यंत हा विषय सुटलेला नाही.
वंश वाढवण्यासाठी नवी कल्पना
या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इस्रायलच्या जेलमध्ये बंद असलेल्या पॅलेस्टाईनच्या दहशतवाद्यांच्या पत्नीने आपला वंश वाढवण्यासाठी नवीन आयडिया करण्यास सुरुवात केली आहे. देशातील बहुतांश दहशतवादी इस्रायलमधील जेलमध्ये बंद आहेत. त्यामुळे त्यांचा वंश वाढू शकत नाही. परंतु त्यांचे स्पर्म म्हणजेच वीर्य बाहेर पाठवले जात असून याद्वारे त्या कृत्रिम पद्धतीने गर्भवती होत आहेत. परंतु यासाठी त्या कोणत्या गोष्टीचा आधार घेत आहेत हे समजल्यानंतर तुम्हाला देखील धक्का बसेल. या महिला चॉकलेटच्या कागदातून हे वीर्य घेऊन जात असून हे वीर्य मेडिकल प्रक्रिया करून वापरले जात आहे. याद्वारे या महिला गर्भवती होत असून स्मगलिंगचा(sperm smuggling through Israel jail) हा प्रकार असून पॅलेस्टाईनचे दहशतवादी आपला वंश वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु याची गरज का पडत आहे हे समजून घेण्यासाठी तुम्हाला इतिहासामध्ये डोकवावे लागणार आहे.
इस्रायल पॅलेस्टाइनचा शत्रुत्व
 इस्रायल आणि पॅलेस्टाईनची निर्मिती झाल्यानंतर अरब राष्ट्रांनी इस्रायलच्या निर्मितीला विरोध करत त्याला देश म्हणून मान्यता देण्यास नकार दिला. इस्रायलची स्थापन झाल्यानंतर अनेक अरब देशांनी इस्रायलवर हल्ला केला. परंतु त्यांनी सर्व राष्ट्रांचा पराभव करत गाझा पट्टीवर(gaza) देखील ताबा मिळवला. तेव्हापासून इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये हा संघर्ष सुरु असून दहशतवादी मोठ्या प्रमाणात इस्रायलवर हल्ले करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे इज्राईलने अनेक दहशतवाद्यांना जेलमध्ये बंद केले आहे. याठिकाणी दहशतवाद्यांना त्यांच्या पत्नींनी भेटण्यास बंदी आहे. अनेक ठिकाणी जेलमध्ये बंद असलेल्या कैद्यांना त्यांच्या पत्नीला भेटू दिले जाते.तसेच वैवाहिक आयुष्याचा आनंद देखील घेऊ दिला जाण्याची परवानगी आहे. परंतु इस्रायलमध्ये वंश वाढेल तसेच भेटीच्या निमिताने दहशतवादी हल्ला होण्याची देखील भीती असते. परंतु त्यांना डबा देण्याची सुविधा उपलब्ध आहे. याचाच फायदा या पत्नी घेत असून या माध्यमातून वीर्याचं स्मगलिंग (sperm smuggling through Israel jail) केलं जाते.
 या वीर्याचं स्मगलिंग करण्यासाठी चॉकलेटचा कागद, रिकामे सिगरेट लायटर, तसेच फळांना कापून त्यामधून देखील वीर्याची स्मगलिंग (sperm smuggling through Israel jail) केली जाते. या खाण्याच्या गोष्टींमधून आणि इतर गोष्टींमधून हे वीर्य त्यांच्या पत्नीपर्यंत जाते. त्यानंतर मेडिकल प्रक्रिया होऊन पुढील वापरासाठी याचा वापर केला जातो. डॉक्टरदेखील यामध्ये सहभागी असून  IVF करण्यासाठी आलेल्या महिलांकडून डॉक्टर खूप कमी रक्कम घेतात. त्याचबरोबर आपल्याच पतीच्या वीर्याने आपण गर्भवती झालो असून हे मुलं आपल्याच पतीचे आहे आणि समाजात विरोध न होण्यासाठी त्यांना कायदेशीर प्रमाणपत्र देखील दिले जाते. इस्रायलविरोधात विद्रोह म्हणून आपला सहभाग म्हणून डॉक्टर यामध्ये आपला सहभाग नोंदवतात. यामध्ये हे इंफर्टिलिटी क्लिनिक(infertilityclinic) हे इराणमधील(iran) असून पॅलेस्टाईनमधील दहशतवाद्यांना इराणचा मोठा पाठिंबा आहे. यामध्ये अरब देश देश देखील त्यांना पाठिंबा देत असून इज्राईलला ते आपला सर्वात मोठा शत्रू समजतात. टॉपिक डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार अनेक डॉक्टर आणि लॅब टेक्निशियन या वीर्याला 'हीरोज ऑफ द फ्यूचर' म्हणतात.
पॅलेस्टाईनचे मंत्री Issa Qaraqe यांनी ही माहिती दिली असून इज्राईलच्या वतीने यावर अजून प्रतिक्रिया आलेली नाही. दरम्यान, या विर्याच्या स्मगलिंगच्या मदतीने आतापर्यंत 71 कैद्यांच्या पत्नी गर्भवती झाल्या असून अनेक कैद्यांना हे करताना पकडले देखील आहे. यासाठी त्यांना अंधाऱ्या कोठडीची शिक्षा देखील देण्यात येते.
First published:

Tags: Terrorism

पुढील बातम्या