Home /News /lifestyle /

OMG! गेल्या 10 वर्षांतच झाली शेकडो मुलं; 66 वर्षांचा आजोबा बनला 138 मुलांचा बाबा

OMG! गेल्या 10 वर्षांतच झाली शेकडो मुलं; 66 वर्षांचा आजोबा बनला 138 मुलांचा बाबा

66 year old Man become father of 129 kids in 10 years : 66 वर्षांच्या या व्यक्तीला एकूण 150 मुलांचे वडील होण्याची इच्छा आहे.

    लंडन, 26 जानेवारी : एकदा का वयाची साठी ओलांडली की मग शरीराची दुखणी, आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. या वयात मूल जन्माला घालण्याचा तर कुणी विचारही करत नाही.  असं असताना या व्यक्तीने तर सर्वांनाच धक्का दिला आहे. 66 वर्षांच्या या व्यक्तीने गेल्या 10 वर्षांतच शेकडो मुलांना जन्म दिला आहे (66 year old Man become father of 129 kids in 10 years). ही व्यक्ती 138 मुलांचा बाबा आहे. यूकेतील 66 वर्षांचे क्लाइव जोन्स (Clive Jones) 138 मुलांचे बायोलॉजिकल वडील आहेत (Man Biological father of 129 kids). त्यापैकी 129 मुलांचा जन्म झाला आहे आणि आणखी 9 मुलं जन्माला येणार आहेत. एकूण 150 मुलांचे वडील होण्याची त्यांची इच्छा आहे. त्यानंतर ते आपल्या या कामावर फूलस्टॉप लावणार आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या वयात इतक्याच वर्षात इतक्या मुलांचा बाबा होणं ही सोपी गोष्ट नाही. या व्यक्तीने नेमकं केलं तरी काय, तर क्लाइव्ह हे स्पर्म डोनर आहेत. असे काही पुरुष असताना जे काही कारणामुळे वडील होऊ शकत नाही. असे पुरुष स्पर्म डोनर्सची मदत घेतात.  क्लाइव्ह हे स्पर्म डोनेशनमार्फतच (Sperm donation)  शेकडो मुलांचे वडील बनले आहेत. हे वाचा - आश्चर्य! 9 महिने नव्हे तर 2000 वर्षे आईच्या पोटात होतं बाळ; बाहेर काढताच... 10 वर्षांपूर्वी त्यांनी वर्तमानपत्रात एक लेख वाचला आणि त्यांना ही कल्पना सुचली. मूल नसलेल्या लोकांना किती वेदना सहन कराव्या लागतात हे त्यांनी पाहिलं आणि तेव्हाच हे काम हाती घेतलं. महत्त्वाचं म्हणजे ते यासाठी एक पैसाही घेत नाही. क्लाइव्ह सांगतात, कुणाचं तरी कुटुंब बनतं आहे, कुणाला तरी आनंद होतो आहे हे पाहून आपल्यालाही आनंद मिळतो. पण हे सर्व क्लाइव्ह यांच्यासाठी सोप नव्हतं. द सनच्या रिपोर्टनुसार क्लाइव्ह अधिकृतरित्या स्पर्म डोनर नाही बनू शकत कारण ब्रिटनमध्ये स्पर्म डोनरसाठी वयाची मर्यादा जास्तीत जास्त 45 आहे. त्यामुळे क्लाइव्ह फेसबुकमार्फत आपल्या ग्राहकांच्या संपर्कात येतात. आपल्या व्हॅनच्या माध्यमातूनच ते स्पर्म डोनेशनचं काम करतात. यामुळे ते अडचणीतही सापडले आहेत. ह्युमन फर्टिलाइजेशन अँड अँब्रयोलॉजी अथॉरिटीने क्लाइव्ह यांना इशाराही दिला होता. हे वाचा - प्रेग्नंट होताच समोर आलं पार्टनरचं 20 वर्षांपूर्वीचं गुपित; महिला हादरली अथॉरिटीच्या मते,  स्पर्म डोनर्स आणि रुग्णांना ब्रिटनच्या लाइसेंस्ड क्लिनिकच्या माध्यमातून स्पर्म डोनेशन आणि खरेदी करावी लागेल. क्लिनिकच्या माध्यमातून डोनर आणि ग्राहक दोघांनाही स्पर्म डोनेशनचा परिणाम आणि इतर आवश्यक माहिती सांगितली जाऊ शकते. असं असताना क्लाइव्ह आपल्या व्हॅनमधूनच स्पर्म ग्राहकांपर्यंत पोहोचवतात.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Lifestyle, Viral

    पुढील बातम्या