Home /News /lifestyle /

तुम्हालाही शुक्राणूची समस्या आहे? काळजी करू नका, आहारात `या` पदार्थांचा समावेश करा

तुम्हालाही शुक्राणूची समस्या आहे? काळजी करू नका, आहारात `या` पदार्थांचा समावेश करा

Low Sperm Count: तुमच्या आहाराचा तुमच्या प्रजनन क्षमतेवर मोठा परिणाम होतो. व्यस्त जीवनशैलीमुळे लोकांच्या शुक्राणूंची संख्या सातत्याने कमी होत आहे. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्या खाल्ल्याने शुक्राणूंची संख्या खूपच कमी होते.

पुढे वाचा ...
    मुंबई, 7 जुलै : गेल्या काही वर्षांत जीवनशैलीत (Lifestyle) बदल झाल्यामुळे तसंच ताण-तणाव वाढल्याने लोकांना गंभीर शारीरिक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. हृदयविकार, डायबेटिस हे आजार आता कमी वय असलेल्या लोकांमध्येही दिसून येत आहेत. यासोबतच तरुणांना एका आरोग्याशी निगडित गंभीर समस्येला तोंड द्यावं लागत आहे. पुरुषांमध्ये शुक्राणुंची संख्या (Sperm Count) कमी होताना दिसत आहे. त्यामुळे मूल होण्यात अडचणी येत आहेत. बहुतांश पुरुष आपल्या स्पर्म अर्थात शुक्राणुंच्या आरोग्याकडं विशेष लक्ष देत नसल्याचं दिसून येतं. त्यामुळे ही समस्या दिसून येते. बदलती जीवनशैली आणि चुकीचा आहार (Diet) या कारणांमुळे पुरुषांमध्ये शुक्राणुंची संख्या कमी होत असल्याचं तज्ज्ञ सांगतात. आहारात योग्य बदल केल्यास तसंच काही पदार्थांचं जाणीवपूर्वक सेवन केल्यास शुक्राणुंची संख्या योग्य राहू शकते. `आज तक`ने याविषयीची माहिती दिली आहे. खरं तर शुक्राणुंची संख्या कमी होणं ही मोठी समस्या आहे. गेल्या 38 वर्षांत पुरुषांमध्ये शुक्राणुंची संख्या 59 टक्क्यांपर्यंत कमी झाल्याचं एका अभ्यासातून दिसून आलं आहे. शुक्राणूंची संख्या कमी झाल्यानं पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर (Fertility) परिणाम होत आहे. त्यामुळे साहजिकच मूल होण्यात अडचणी येत आहेत. ही समस्या का निर्माण होत आहे, याचं स्पष्ट कारण अद्याप दृष्टिक्षेपात आलेलं नाही. मांडीवर लॅपटॉप घेऊन काम केल्यानं शुक्राणुंची संख्या कमी होते, असं काही लोक म्हणतात. दुसरीकडे, काही तज्ज्ञांच्या मते, खिशात स्मार्टफोन ठेवल्यानं त्यातून जी ऊर्जा बाहेर पडते, त्यामुळे शुक्राणुंवर प्रतिकूल परिणाम होतो. ही बाब लठ्ठपणासाठी (Obesity) देखील कारणीभूत ठरते. शुक्राणुंची संख्या कमी होण्यामागं अनेक कारणं असू शकतात. आहारात चुकीच्या पदार्थांचा समावेश केल्यानं अनेक शारीरिक समस्या निर्माण होतात. काही विशिष्ट पदार्थांचं सेवन केल्यास त्याचा शुक्राणुंच्या संख्येवर प्रतिकूल परिणाम होतो, असं काही अभ्यासांमधून समोर आलं आहे. तसंच काही पदार्थ खाल्ल्यानं शुक्राणुंची संख्या वाढूदेखील शकते. शुक्राणुंची संख्या वाढण्यासाठी पुरुषांनी सेंद्रिय भाज्या (Organic Vegetable) आहारात समाविष्ट करावा. मात्र, खाण्यापूर्वी हा भाजीपाला स्वच्छ धुवून घ्यावा. प्रक्रियायुक्त मांसाऐवजी मासे (Fish) खावेत. तळलेले पदार्थ आणि जंक फूड (Junk Food) कमी प्रमाणात खावेत. वजन जास्त असेल तर ते नियंत्रणात ठेवावं. 2012 मध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनात 21 ते 35 वयोगटातल्या 117 पुरुषांचा समावेश करण्यात आला होता. या सर्व पुरुषांना 12 आठवडे रोज अक्रोड खायला दिले. संशोधनापूर्वी आणि संशोधनानंतर अभ्यासकांनी पुरुषांच्या स्पर्म पॅरामीटरचं विश्लेषण केलं. अक्रोड (Walnut) खाल्ल्यानंतर पुरुषांच्या शुक्राणुंच्या संख्येमध्ये सुधारणा दिसून आली. अक्रोडमध्ये ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड्स असतात. ओमेगा -3 फॅटी अ‍ॅसिड्समुळे पुरुषांच्या अंडकोषांमधलं ब्लड सर्क्युलेशन सुधारतं. त्यामुळे शुक्राणुंचं प्रमाण आणि उत्पादन दोन्ही वाढतं. म्हणून पुरुषांनी लोणचं खायचं नसतं; प्रॉब्लेम होण्यापूर्वीत व्हा अलर्ट मासे खाल्यानेपण ओमेगा -3 फॅटी अ‍ॅसिड मुबलक प्रमाणात मिळतं. त्यामुळे पुरुषांनी रेड किंवा प्रक्रियायुक्त मांसाऐवजी मासे खाल्ले तर शुक्राणुंशी निगडित समस्या दूर होतात. एका फर्टिलिटी क्लिनिकमध्ये 250 लोकांवर एक संशोधन केलं गेलं. त्यात जे लोक भरपूर प्रमाणात फळं आणि भाज्या खात होते, त्यातही हिरव्या पालेभाज्या आणि बीन्स प्राधान्यानं खात होते, त्यांच्या शरीरातला शुक्राणुंचा दर्जा उत्तम असल्याचं दिसून आलं. तसंच त्यांच्यामधली शुक्राणुंची गती ही जे लोक या पदार्थांचं सेवन करत नव्हते त्यांच्या तुलनेत उत्तम असल्याचं दिसून आलं. यात आश्चर्यकारक काहीच नाही. कारण वनस्पतींमध्ये को-एंझाइम Q10, व्हिटॅमिन सी आणि लाइकोपीनसारखे अँटिऑक्सिडंट असतात. शुक्राणुंची संख्या वाढवण्यासाठी हे सूक्ष्म पोषक घटक अतिशय फायदेशीर मानले जातात. पुरुषांमधल्या शुक्राणुंवर तसंच प्रजनन क्षमतेवर काही पदार्थांच्या सेवनामुळे प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. दूध भलेही शरीरासाठी सर्वोत्तम असलं तरी शुक्राणुंसाठी ते फारसं लाभदायक नसतं. हाय फॅट डेअरी प्रॉडक्टसचं (High Fat Dairy Products) सेवन केल्यानं पुरुषांमधल्या शुक्राणुंच्या हालचाली कमी होतात तसंच त्यांच्या आकारमानात असमानता येते, असं एका अभ्यासातून स्पष्ट झालं आहे. सोया उत्पादनांमध्ये (Soya Product) फायटोअ‍ॅस्ट्रोजेन-अ‍ॅस्ट्रोजेनसारखी संयुगं असतात. ही वनस्पतीतून त्यात येतात. बोस्टनमधल्या फर्टिलिटी क्लिनिक मध्ये 99 पुरुषांवर एक संशोधन करण्यात आलं. त्यात सोया उत्पादनांचं अधिक प्रमाणात सेवन करणाऱ्या पुरुषांमध्ये शुक्राणुंची संख्या कमी झाल्याचं दिसून आलं. किस केल्यानं आपलं आयुष्य पण वाढतं; चुंबनाचे आहेत इतके आरोग्य फायदे प्रक्रियायुक्त मांस अर्थात प्रोसेस्ड मीट (Processed Meat) खाल्ल्यानं अनेक आजारांचा धोका वाढतो, असं अनेक संशोधनांमधून समोर आलं आहे. प्रक्रियायुक्त मांसात हॉट डॉग, सलामी, बीफ आणि बेकनसारख्या पदार्थांचा समावेश असतो. हे पदार्थ खायला चांगले लागत असले तरी आरोग्यासाठी धोकादायक असतात. प्रक्रियायुक्त रेड मीट खाल्ल्यानं शुक्राणुंची संख्या आणि हालचाल कमी होते, असं अनेक संशोधनांमधून दिसून आलं आहे. आरोग्यविषयक तज्ज्ञांच्या मते, ट्रान्स फॅटमुळे (Trans Fat) हृदयविकाराचा धोका वाढतो. शरीरात ट्रान्स फॅटचं प्रमाण वाढल्यास शुक्राणुंची संख्या कमी होऊ लागते, असं 2011 मध्ये झालेल्या एका स्पॅनिश संशोधनातून दिसून आलं आहे. त्यामुळे आहारात योग्य पदार्थांचा समावेश केला तर पुरुषांमधली शुक्राणुंशी निगडीत समस्या दूर होऊ शकते.
    First published:

    Tags: Health Tips, Sexual health

    पुढील बातम्या