सावधान! SOCIAL MEDIA वर दररोज 2 तासांपेक्षा जास्त वेळ; मोजावी लागेल मोठी किंमत

सावधान! SOCIAL MEDIA वर दररोज 2 तासांपेक्षा जास्त वेळ; मोजावी लागेल मोठी किंमत

सध्याच्या कोरोना (Corona) महासाथीच्या पार्श्वभूमीवर या संशोधनातून स्पष्ट झालेले निष्कर्ष विचारात घेण्यासारखे आहेत. सध्या एखाद्या व्यक्तीच्या संपर्कात राहण्यासाठी प्रत्यक्ष भेटीऐवजी सोशल मीडियाचा (Social media) अधिक वापर केला जात आहे.

  • Share this:

समुंबई, 12 डिसेंबर : तुम्ही जर फेसबुक (Facebook), इन्स्टाग्राम (Instagram), स्नॅपचॅट (Snapchat) किंवा ट्विटर  (Twitter) सारख्या सोशल मीडिया (Social Media) साईटसवर प्रमाणापेक्षा अधिक वेळ घालवत असाल तर ही बाब तुमच्या मानसिक आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. सोशल मीडियावर अधिक वेेळ खर्च केल्यानं नैराश्याचा (Depression) धोका वाढू शकतो, असं अमेरिकन संशोधकांनी स्पष्ट केलं आहे.

जे लोक दिवसभरात पाच तासांहून अधिक वेळ सोशल मीडियावर खर्च करतात, त्यांना सहा महिन्यांच्या आतच नैराश्य (Depression) जडण्याची शक्यता असते. जे लोक दिवसभरात दोन तासांपेक्षाही कमी वेळ सोशल मीडियावर (Social Media) खर्च करतात, त्यांच्या तुलनेत जादा वापर करणाऱ्यांना नैराश्याचा सामना करावा लागण्याची शक्यता सुमारे अडीच पटींनी अधिक असते, असं संशोधकांना आढळून आलं आहे.

अमेरिकन जर्नल आफ प्रिव्हेन्टिव्ह मेडिसीन (American Journal Of Preventive Medicine) या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार, या संशोधनाकरिता 18 ते 30 वयोगटातील 1000 अमेरिकन युवकांकडून नैराश्य (Depression) आजाराच्या अनुषंगाने प्रश्नावली भरून घेण्यात आली. फेसबुक (Facebook), ट्विटर (Twitter), स्नॅपचॅट (Snapchat), इन्स्टाग्राम (Instagram) यासारख्या सोशल मीडियाच्या साईटसवर तुम्ही किती वेळ खर्च करता हे देखील या युवकांना प्रश्नावलीत नमूद करण्यास सांगण्यात आलं.

जे युवक दररोज दोन तासांपेक्षा कमी वेळ सोशल मीडियावर खर्च करतात त्यांच्या तुलनेत जे युवक सोशल मीडियाचा (Social media) दररोज पाच तासांहून अधिक काळ खर्च करतात अशांना नैराश्याचा (Depression) सामना करावा लागण्याची शक्यता 2.8 पटींनी अधिक असते, असं या संशोधनात आढळून आलं.

ज्या व्यक्ती सोशल मीडियावर (Social media) अधिक वेळ व्यतीत करतात, त्यांना वैयक्तिक संबंध प्रस्थापित करताना, वैयक्तिक किंवा व्यावसायिक उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी तसंच मौल्यवान वैयक्तिक क्षण व्यतीत करताना अडचणी निर्माण होतात, असं देखील या संशोधनातून स्पष्ट झालं आहे. यापूर्वी केलेल्या संशोधनात सोशल मीडिया (Social media) लोकांना जीवनातील सकारात्मक पैलू दर्शवण्यास भाग पाडतं. मात्र ही बाब आत्मसन्मान आणि सामाजिक तुलना परिणाम करते.

हे वाचा - धक्कादायक! कोरोनाची लस घेतली आणि झालं HIV इन्फेक्शन?

युवा वर्ग, नैराश्य आणि सोशल मीडिया वापराच्या संबंधाबाबत यापूर्वी देखील संशोधन करण्यात आलं आहे. मात्र सोशल मीडियाचा वाढता वापर हा नैराश्याला किंवा नैराश्याच्या (Depression) लक्षणांसाठी कारणीभूत ठरत असल्याचं  संशोधनातून स्पष्ट अधोरेखित झाले नव्हतं. नैराश्यामुळे सोशल मीडियाचा वापर वाढतो की सोशल मीडियाच्या वापरानं नैराश्य वाढतं अशा दोन्ही बाजूंनी सखोल अभ्यास करण्यात आला. या अभ्यासांती हे दोन्ही घटक एकमेकांशी जोडले गेले आहेत हे स्पष्ट झालं. मात्र कोणती बाब प्रथम येते हे ठरवणं अवघड आहे. सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे नैराश्याचं प्रमाण वाढत असल्याने या नव्या अभ्यासातून या बाबींवर पुन्हा नव्याने प्रकाश टाकण्यात आला आहे. नैराश्याच्या सुरवातीच्या टप्प्यात सोशल मीडियाचा (Social media) वापरात कोणताही बदल झाला नसल्याचं दिसून आलं, असं अरकॅंसास विद्यापीठाचे डॉ. ब्रायन प्रिमॅक यांनी स्पष्ट केलं.

हे वाचा - Baby Jesus ला मास्क, Bubbles मध्ये Santa Claus; कोरोना काळातील Christmas

सध्याच्या कोरोना (Corona) महासाथीच्या पार्श्वभूमीवर या संशोधनातून स्पष्ट झालेले निष्कर्ष विचारात घेण्यासारखे आहेत. सध्या एखाद्या व्यक्तीच्या संपर्कात राहण्यासाठी प्रत्यक्ष भेटीऐवजी सोशल मीडियाचा (Social media) अधिक वापर केला जात आहे.

कोणत्याही तंत्रज्ञानाचा वापर हा सध्याच्या काळात उपयुक्त ठरणारा आहे. मात्र तंत्रज्ञानाचा वापर हा लोकांना एकटेपणातून बाहेर काढण्यासाठी झाला तर त्याची उपयुक्तता अधिकच वाढेल, असे डॉ. ब्रायन प्रिमॅक यांनी स्पष्ट केले.

Published by: Priya Lad
First published: December 12, 2020, 11:07 AM IST

ताज्या बातम्या