मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Stress Free Life : मानसिक तणाव दूर करण्यासाठी हे उपाय ठरतील फायदेशीर; डॉक्टरांनी दिला सल्ला

Stress Free Life : मानसिक तणाव दूर करण्यासाठी हे उपाय ठरतील फायदेशीर; डॉक्टरांनी दिला सल्ला

सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात आपल्याला अनेक कारणांमुळे मानसिक (Stress) तणावाला सामोरं जावं लागत आहे. त्याचा विपरित परिणाम हा आपल्या आरोग्यावरही होत असल्याने आता लोकांना सातत्याने आपल्या आयुष्यात नानाविध टेन्शनला तोंड द्यावं लागत असल्याने त्यांना आपली लाईफ ही कंटाळवाणी (Spend Time Alone To Be Stress) वाटू लागली आहे.

सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात आपल्याला अनेक कारणांमुळे मानसिक (Stress) तणावाला सामोरं जावं लागत आहे. त्याचा विपरित परिणाम हा आपल्या आरोग्यावरही होत असल्याने आता लोकांना सातत्याने आपल्या आयुष्यात नानाविध टेन्शनला तोंड द्यावं लागत असल्याने त्यांना आपली लाईफ ही कंटाळवाणी (Spend Time Alone To Be Stress) वाटू लागली आहे.

सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात आपल्याला अनेक कारणांमुळे मानसिक (Stress) तणावाला सामोरं जावं लागत आहे. त्याचा विपरित परिणाम हा आपल्या आरोग्यावरही होत असल्याने आता लोकांना सातत्याने आपल्या आयुष्यात नानाविध टेन्शनला तोंड द्यावं लागत असल्याने त्यांना आपली लाईफ ही कंटाळवाणी (Spend Time Alone To Be Stress) वाटू लागली आहे.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 27 : सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात आपल्याला अनेक कारणांमुळे मानसिक (Stress) तणावाला सामोरं जावं लागत आहे. त्याचा विपरित परिणाम हा आपल्या आरोग्यावरही होत असल्याने आता लोकांना सातत्याने आपल्या आयुष्यात नानाविध टेन्शनला तोंड द्यावं लागत असल्याने त्यांना आपली लाईफ ही कंटाळवाणी (Spend Time Alone To Be Stress) वाटू लागली आहे. त्यामुळे आता त्यातून बाहेर पडण्यासाठी ते वेगवेगळे उपाय शोधत आहे. त्यात प्रामुख्याने मेडिटेशन, सतत व्यायाम किंवा डॉक्टरांकडून होणाऱ्या उपचारांचा समावेश आहे. त्यामुळे आता हे सर्व करूनही लोकांना मानसिक तणावातून (Stress Free Life) बाहेर पडणं कठीण जात आहे, अशा वेळी लोकांना स्वत:ला वेळ देणं आणि आपल्याला होणाऱ्या समस्यांची समिक्षा करणं हा या आजारावर एक उपाय म्हणून समोर येत आहे.

आता मानसिक आजारांनी (personal life) त्रस्त असणाऱ्या लोकांसाठी ही दिलासादायक बातमी समोर आली आहे. कारण या वृत्ताला वैद्यकीय जाणकरांनीही दुजोरा दिला आहे. त्यामुळे मानसिक तणाव घालवण्यासाठी नेमकं काय करायला हवं, त्याचबरोबर आपण आपल्या लाईफमध्ये काय बदल करायला हवेत यासाठी आपण काही गोष्टी जाणून घेऊयात. दैनिक भास्करमध्ये छापून आलेल्या एका रिपोर्टनुसार आपल्याला मानसिक तणावातून बाहेर पडण्यासाठी काही विशेष गोष्टींची काळजी घेण्याची गरज असल्याचं त्यात नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे आता आपल्या आयुष्यात चाललेली काही कामं, त्यातून आपल्याला जाणवणारा तणाव आणि त्यासाठी काही उपाययोजनाही देण्यात आल्या आहेत. ज्यात प्रामुख्याने आपल्याला तणाव घालवण्यासाठी चांगली पुस्तकं वाचण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Intermittent fasting केल्यानं मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा धोका होऊ शकतो कमी

प्रसिद्ध लेखक डॅनियल कन्नमन (Daniel Kahneman) यांनी लिहिलेलं पुस्तक ‘थिंकिंग फास्ट अॅन्ड स्लो’ (Thinking Fast and Slow) नुसार आपल्याला मानसिक तणावाच्या काळात मानसिक आधाराची फार गरज असते. अशावेळी आपल्याला जर आपल्या जवळची आणि आवडीची व्यक्ती असेल तर त्यांच्याबरोबर आपल्या आयुष्यातील काही गोष्टींविषयी मनमोकळेपणाने बोलायला हवं. त्याचबरोबर जर आपल्या भावनांना वाट मोकळी करण्यासाठी आपल्या आजूबाजूला कुणी नसेल तर आपण आपल्या स्वत:ला वेळ देऊन आपल्यावर आलेल्या या परिस्थितीवर विचार करायला हवा. कारण त्याने आपल्याला आलेल्या तणावावर उपाय सापडू शकतो. त्याचबरोबर आपल्याला आपल्या आयुष्यात काय करायला हवं आणि काय नाही, याची जाण होत असते. त्यामुळे मानसिक तणावात एकटेपणा हा आपल्याला फायदेशीर ठरू शकतो.

भारतातला ऐतिहासिक Skywalk: 11 हजार फूट उंचीवरील पूल आता झाला 150 वर्षांचा

जोसेफ मर्फी (Joseph Murphy) यांचं पुस्तक पावर ऑफ द सबकॉन्शियस माइंड (Power of Subconscious Mind) नुसार आपल्याला आपल्या संकटकाळात आणि त्यातून आलेल्या तणावात काहीही वाईट विचार यायला लागतात. त्यावेळी शांत डोक्याने विचार करायला हवा. कारण त्या वेळी आपण आपल्या आयुष्याच्या कठीण काळातून जात असतो. त्यामुळे आपल्याला अधिक कणखरपणे या तणावाला सामोरं जायला हवं. त्यामुळे तणावात असताना हे पुस्तक वाचणे आपल्याला फायदेशीर ठरू शकते.

प्रसूतीनंतर तुमच्या चेहऱ्यावर काळसर ठिपके येतायत? अशी घ्या त्वचेची काळजी

कारोल ए फ्लेमिंग (Carol A Fleming) यांचं पुस्तक ‘इट्स द वे यू से इट’ (The Way You Say It) मध्ये दिलेल्या काही माहितीनुसार आपण बोललेल्या एखाद्या गोष्टीवरून आपले कौतून होते, परंतु ते फार काळ राहत नाही. त्यामुळे लोकांना जर प्रभावित करायचं असेल तर आपल्या कामातून करायला हवं. ज्याचा प्रभाव हा फार काळ राहतो आणि लोक आपला आदर करायला लागतात. त्यामुळे आता ही काही पुस्तकं मानसिक तणाव घालवण्यासाठी उपयोगी ठरत आहेत.

(Disclaimer - ही माहिती सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

First published:

Tags: Health Tips, Personal life, Stress