मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

आषाढ महिन्यामध्ये करा सूर्यदेवाची पूजा; शत्रूंवर मिळेल विजय

आषाढ महिन्यामध्ये करा सूर्यदेवाची पूजा; शत्रूंवर मिळेल विजय

सूर्योदयाच्या वेळी सूर्याला जल अर्पण केल्यामुळे शत्रूवर विजय मिळवता येतो.

सूर्योदयाच्या वेळी सूर्याला जल अर्पण केल्यामुळे शत्रूवर विजय मिळवता येतो.

आषाढ महिन्यात सूर्योदयाच्या वेळी सूर्याला जल अर्पण केल्यामुळे शत्रूवर विजय मिळवता येतो. आत्मविश्वास वाढावा आणि सकारात्मक (Positivity) यावी यासाठी सुर्याची उपाना करावी.

  • Published by:  News18 Desk

दिल्ली ,29 जून : आषाढ महिन्यामध्ये सूर्य देवाच्या पूजेला (Suryadev Pooja) अतिशय महत्त्व आहे. आषाढ महिन्यात (Month of Ashadh) सूर्योदयाच्या वेळी सूर्याला अर्ध्य देण्याची पद्धत आहे. सूर्याच्या उपासनेमुळे आजार दूर होतात आणि आयुष्य वाढतं अशी धारणा आहे. सूर्योदयाच्या वेळी सूर्याला जल अर्पण केल्यामुळे शत्रूवर विजय मिळवता येतो. आत्मविश्वास वाढावा आणि सकारात्मक (Positivity) यावी यासाठी सुर्याची उपाना करावी.

या महिन्यामध्ये सूर्याची पूजा केल्यामुळे भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात. संतती सुख मिळतं. काही चुकांमुळे झालेली पाप देखील संपतात अशी धारण आहे. या महिन्यांमध्ये दही, लोणचं यासारखे आंबट पदार्थ तळलेले खाऊ नयेत. विष्णूची उपासना करून, घरात होम-हवन आणि सकाळ-संध्या देवाला दिवा लावावा. आषाढ महिनामध्ये विष्णूच्या वामन अवताराची पूजा केल्याने मनातल्या इच्छा पूर्ण होतात. लहान मुलांना वामनाचा अवतार समजून जेवू घालाव. या महिन्यात येणाऱ्या दोन्ही एकादशीच्या दिवशी वामनाची पूजा करून अन्न आणि जलदान करावं. आषाढ महिन्यात गुरुची उपासना केल्याने देखील फायदा मिळतो.

(साप्ताहिक राशीभविष्य : कुणाला धनलाभ, कुणाला प्रवास योग; कसा असेल तुमचा हा आठवडा?)

आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर, आषाढ महिन्यामध्ये सूर्याची उपासना करावी. सूर्याला जल अर्पण करताना काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात नाहीतर कामात अडचणी निर्माण होऊ शकतात. प्रत्येक रविवारी सूर्याचं पूजन करून 108 वेळा सूर्य मंत्र म्हटल्याने लाभ मिळतो. सूर्य मंत्राचा जाप केल्यामुळे आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होतात.

(राशीभविष्य: कुंभ आणि तुला राशीसाठी दिवस चांगला, वृषभ आणि मकर राशी मात्र जपून रहा)

सूर्यास्ताला अर्ध्या

सुर्योदयाप्रमाणेच सूर्यास्ताच्यावेळी सूर्याची उपासना आणि पूजा करता येऊ शकते. सूर्यषष्ठीच्या दिवशी सूर्यास्ताच्या वेळी सूर्याची पूजा केली जाते. त्यालाच छटपूजा देखील म्हटले जातं. या दिवशी सूर्याला अर्ध्य दिल्यामुळे या सगळ्या जन्माची पापं नष्ट होतात असं म्हटलं जातं.

(तुटलेली हाडं जोडणारं हनुमान मंदिर; कुठे आहे माहिती आहे?)

सूर्य पूजेचे तीन प्रहर

दिवसातले तीन प्रहर सूर्योपासनेची पद्धत आहे. सकाळी सूर्य उपासना केल्यामुळे आरोग्याची प्राप्ती होते. दुपारी सूर्याची पूजा केल्यामुळे मानसन्मान वाढतो. संध्याकाळी सूर्याची उपासना केली तर सुखसंपत्ती वाढते.(Disclaimer: या लेखामधली तपशील आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. news18lokmat.com त्याची पुष्टी करत नाही. याला शास्त्रीय आधार नाही.)

First published:

Tags: Lifestyle