मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

दुधासोबत जिलेबी खाताय? जाणून घ्या चकित करणारे फायदे

दुधासोबत जिलेबी खाताय? जाणून घ्या चकित करणारे फायदे

कुठलाही सण असो किंवा एखादा खास कार्यक्रम, मिठाई (Sweets) हा त्याचा अविभाज्य भाग आहे.

कुठलाही सण असो किंवा एखादा खास कार्यक्रम, मिठाई (Sweets) हा त्याचा अविभाज्य भाग आहे.

कुठलाही सण असो किंवा एखादा खास कार्यक्रम, मिठाई (Sweets) हा त्याचा अविभाज्य भाग आहे.

 मुंबई,  कुठलाही सण असो किंवा एखादा खास कार्यक्रम, मिठाई (Sweets) हा त्याचा अविभाज्य भाग आहे. आपण अगदी चवीनं विविध प्रकारच्या मिठाईचा आनंद घेतो; मात्र मिठाई जास्त प्रमाणात खाणं आरोग्यासाठी चांगलं नसल्याचंदेखील सांगितलं जातं. मिठाईमध्ये असलेल्या साखर, मैदा यांसारख्या खूप फॅट्स असलेल्या पदार्थांमुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात, असंही सांगितलं जातं; मात्र एक अशी मिठाई आहे, जी दुधासोबत खाल्ली, तर आरोग्यासाठी अनेक फायदे मिळतात. तो पदार्थ म्हणजे जिलेबी (Jalebi). जिलेबी आणि दूध (Milk) एकत्र करून खाणं आरोग्यदायी असतं. झी न्यूजने याबद्दलची माहिती प्रसिद्ध केली आहे. दुधासोबत जिलेबी खाल्ली, तर काय फायदे होऊ शकतात, हे पाहू या. डोकेदुखी सुरू झाली तर आपल्याला प्रचंड त्रास होतो. डोकेदुखीमुळे आपण आपल्या कामावर लक्ष केंद्रित करू शकत नाही. डोकेदुखीच्या समस्येवर जिलेबी हा उत्तम उपाय आहे. तज्ज्ञांच्या मते, सकाळी दुधासोबत जिलेबी (Benefits of Jalebi) खाल्ल्याने डोकेदुखीवर आराम पडू शकतो. सकाळच्या नाश्त्यावेळी दूध आणि जिलेबी खाल्ली तर मायग्रेनचा त्रासही कमी होण्यास मदत होऊ शकते. (हे वाचा:या भाज्या आणि फळांमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण आहे विपुल; आरोग्यासाठी आहेत मोठे फायदे) काही जणांची शरीरयष्टी अतिशय किरकोळ असते. खूप प्रयत्न करूनही त्यांचं वजन वाढत (Weight gain) नाही. अशा व्यक्तींसाठी दूध आणि जिलेबी हा एक चांगला पर्याय आहे. जिलेबी गोड असते आणि त्यात जास्त प्रमाणात कॅलरीज असतात. अनेक पोषणमूल्यं असलेल्या दुधासोबत जिलेबी खाल्ली, तर नक्कीच जास्त फायदा होतो. दररोज एक ग्लास दुधासोबत जिलेबी खाल्ल्यानं वजन वाढण्यास मदत होते. धकाधकीच्या दैनंदिन जीवनात अनेकदा आपल्याला तणावाचा सामना करावा लागतो. तणाव दूर करण्यासाठी जिलेबीचा आहारात समावेश असणं फायद्याचं असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. दूध आणि जिलेबी एकत्र खाल्यानं एकाग्रता वाढू शकते आणि तणावदेखील दूर होऊ शकतो. कारण, जिलेबी आपल्या शरीरातले स्ट्रेस हॉर्मोन्स कमी करण्यात मदत करते. (हे वाचा:डायबेटिजच्या भीतीने तुम्हीही गोड खाणं पूर्णपणे बंद केलंय का? मग हे वाचाच) गरम दुधामध्ये जिलेबी बुडवून खाल्ल्यानं दमा, सर्दी आणि खोकल्यासारख्या श्वसनाच्या आजारांवर आराम मिळू शकतो. तज्ज्ञांच्या मते, जिलेबी आरोग्यासाठी चांगली आहे आणि दूध व जिलेबी एकत्र केल्यास 'सुपरफूड'चं (Super Food) काम करतं; मात्र याचा अर्थ असा नाही की, आपण त्याचं अतिरिक्त सेवन करावं. या गोष्टी मर्यादित प्रमाणात आहारात असल्यास उपयोग होऊ शकतो. तसंच, हे कोणत्याही आजारावरचं औषध नव्हे, हेही लक्षात घ्यावं. मधुमेह असलेल्या व्यक्तींनी दूध आणि जिलेबी खाण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यावश्यक आहे.
First published:

Tags: Food, Health Tips, Lifestyle

पुढील बातम्या