हाच खिलाडी नंबर 1! VIDEO पाहून विजेत्याऐवजी हरलेल्या खेळाडूचंच सर्वांनी केलं कौतुक

हाच खिलाडी नंबर 1!  VIDEO पाहून विजेत्याऐवजी हरलेल्या खेळाडूचंच सर्वांनी केलं कौतुक

एखादा खेळाडू स्पर्धा हरला तर लोकं त्याच्याविरोधात किती काय काय बोलतात. मात्र या खेळाडूच्या बाबतीत मात्र उलटं झालं आहे. हा खेळाडू स्पर्धा हरला तरी विजेत्याऐवजी त्याच्यावरच कौतुकाचा वर्षाव होतो आहे.

  • Share this:

माद्रिद, 21 सप्टेंबर : स्पर्धा कोणतीही असो आपणच जिंकावं असं प्रत्येक स्पर्धकाला वाटतं. काही जण खेळताना चिटिंग करतात तर काही जण प्रतिस्पर्धीच्या एका चुकीमुळे जिंकण्याच्या मिळालेल्या संधीचं सोनं करतात. मात्र स्पेनमध्ये झालेल्या एका स्पर्धेत मात्र याबाबतीत उलटंच घडलं आहे. एका स्पर्धकाने जिंकण्याची संधी स्वत:हून सोडून दिली. इतकंच नव्हे तर हा खेळाडू हरला म्हणून कुणी त्याला डिवचलं नाही तर विजेत्याऐवजी या हरलेल्या खेळाडूवरच कौतुकाचा वर्षाव होतो आहे.

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल (social media viral video) होतो आहे. स्पेनमधील  2020 सॅन्तंदर ट्रायथलॉनचा (Santander Triathlon) हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओत स्पेनचा डियागो मेंट्रिडा (Spanish triathlete Diego Méntriga) आणि ब्रिटनचा जेम्स टिगल (British triathlete James Teagle) यांच्यामध्ये रेस सुरू आहे.  ज्यामध्ये डियागो जिंकता जिंकता स्वत: हरला आणि खेळातील आपला प्रामाणिकपणा त्याने दाखवून दिला.

व्हिडीओत आपण पाहू शकतो जेम्स टिगल फिनिश लाइनच्या आधीच एका बॅरिअरला धडकला आणि आपला मार्ग विसरतो. त्यामुळे मेंट्रिडा फिनिश लाइनजवळ पोहोचतो. मेंट्रिडाजवळ जिंकण्याची पूर्ण संधी होती. मात्र त्याने तसं केलं नाही. मेंट्रिडाने जेव्हा मागे वळून पाहिलं तेव्हा जेम्स बॅरिअरला धडकल्याने मागे राहिला होता. त्यामुळे त्याने त्याच क्षणी फिनिश लाइन ओलांडण्यापासून स्वत:ला रोखलं. फिनिश लाइनजवळ थांबून तो आपल्या प्रतिस्पर्धीची प्रतीक्षा करत राहिला. अखेर मेंट्रिडाऐवजी जेम्सच या स्पर्धेत जिंकला.

हे वाचा - पंजाब जिंकणार होता सामना? Umpire च्या चुकीवर सेहवागसह प्रीती झिंटाही चिडली

हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. खरंतर तसं हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सुरुवातीला प्रत्येक जण मेंट्रिडाच्या विरोधातच बोलेल. त्यानं हातात संधी असताना सोडली, त्यानं असं का केलं वगैरे वगैरे. मात्र मेंट्रिडाने असं का केलं, याचं कारण सांगितल्यावर तुम्हालाही त्याचं कौतुक वाटेल.

मेंट्रिडाला जिंकण्यापेक्षा महत्त्वाचा होता तो खेळातील प्रामाणिकपणा. "स्पर्धेमध्ये पूर्णवेळ जेम्स माझ्या पुढे होता. त्यामुळे तोच या स्पर्धेचा खरा विजेता आहे. म्हणून जेव्हा मी पाहिलं की तो मार्ग विसरला तेव्हा मी थांबलो", असं त्याने सांगितलं.

हे वाचा - विराटच्या फेव्हरेट फलंदाजानं दिला श्रेयस अय्यरला धोका, फक्त एक चौकार मारून बाद

मेंट्रिडाच्या या प्रामाणिकपणाचं सर्वांनीच कौतुक केलं. स्पर्धेतही त्याला विजेत्या जेम्सप्रमाणेच 300 युरोचं बक्षीस देण्यात आलं आणि तिसरं स्थान देण्यात आलं. असं पाहिलं तर मेंट्रिडा ही स्पर्धा हरला मात्र खऱ्या अर्थाने तोच विजेता ठरला आहे.

Published by: Priya Lad
First published: September 21, 2020, 3:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading