Haunted hotel! इथं भूत सर्व्ह करतात फूड; पाहून फुटेल घाम, थरथर कापाल

Haunted hotel!  इथं भूत सर्व्ह करतात फूड; पाहून फुटेल घाम, थरथर कापाल

तुम्ही नेहमी फिल्ममध्ये पाहिलेलं भूतांचं असं हॉटेल (haunted restaurant) प्रत्यक्षातही आहे.

  • Share this:

माद्रिद, 05 नोव्हेंबर : एखादं हॉटेल (hotel) कित्येक वर्षांपासून ओस पडलेलं आहे. तिथं भूतं असतात आणि त्या भीतीमुळे त्या हॉटेलमध्ये कुणीच जात नाही. ज्या व्यक्तीला याबाबत माहिती नसतं ती व्यक्ती या हॉटेलमध्ये जाते आणि हॉटेलमध्ये गेल्यानंतर मात्र या हॉटेलमध्ये भूतं आहेत हे समजताच त्या व्यक्तीची काय अवस्था होते हे आपण कित्येक फिल्ममध्ये पाहिलं आहे. मात्र समजा तुम्ही प्रत्यक्षात अशा एका हॉटेलमध्ये पोहोचलात जिथं भूतं आहेत, तर तुमची काय अवस्था होईल.

तुम्ही नेहमी फिल्ममध्ये पाहिलेलं भूतांचं असं हॉटेल प्रत्यक्षातही आहे. या हॉटेलचं वातावरण इतकं भयानक आहे की हॉटेलमध्ये पाय ठेवताच तुम्हाला घाम फुटेल. खाण्यासाठी टेबलवर बसल्यानंतर तुम्ही हसत हसत नाही तर थरथर कापत खाल. असं हॉटेल आहे ते स्पेनमधील (spain) ला मासिया एंकांटडा.

सतराव्या शतकात जोसफ मा रिएसनं मासिया आणि सुरोकानं मासिया सेंटा रोजा बनवलं. पुढे या संपत्तीवरून कौटुंबिक वाद झाला आणि रिएस आणि सुरोका यांनी नाणं उडवून आपलं नशीब आजमवलं. रिएस आपली संपत्ती हरला. मात्र त्यानंतर दोघांनीही हे घर सोडलं आणि आपल्या कुटुंबासाठी नवी संपत्ती निर्माण केली. मासिया सेंटा रोजा पडीक इमारत राहिली. त्यानंतर सुरोका कुटुंबानं 1970 मध्ये इथं रेस्टॉरंट तयार केलं. सुरोकाच्या कुटुंबाला हे ठिकाण शापित असल्याचं वाटायचं. त्यामुळे या रेस्टॉरंटला भूताच्या निवासाप्रमाणे रूप देण्यात आलं. एखाद्या भूताच्या रेस्टॉरंटसारखं भयानक रेस्टॉरंट तयार करण्यात आलं.

हे वाचा - पांढरे केस, फॅशन म्हणून नाही तर भीतीनं Hair colour; केसांना दिला लाल रंग

हॉटेलमध्ये जाताच रक्तानं माखलेल्या चाकूनं तुमचं स्वागत केलं जातं. त्यानंतर तुम्ही खात असताना एक शो दाखवला जातो, ज्यामध्ये भूतप्रेत आणि भयावह गोष्टी असतात. इथं भूतच लोकांचं मनोरंजन करतात. या रेस्टॉरंटमध्ये काम करणारे कर्मचारी भूताच्या वेशात असतात. वेटर भूत बनून फूड सर्व्ह करतात. हे हॉटेल फक्त तीन तासच ग्राहकांची खुलं असतं.  हॉटेलमध्ये फक्त 60 सीट्स आहेत. ज्यांची बुकिंग आधीच करावी लागते.

हे वाचा - आता हेच बाकी होतं; कोरोना काळात सुरू केलं Antivirus Tiffin Center

या हॉटेलमध्ये लोक जास्तीत जास्त घाबरतील असं सर्वकाही केलं जातं. त्यामुळे अस्थमा आणि हृदयाचे आजार असलेले रुग्ण, गर्भवती महिला, अपंग व्यक्ती आणि 14 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना इथं येण्यास मनाई आहे. तसंच सोबत मोबाईल, कॅमेरा अशा वस्तूही तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही.

Published by: Priya Lad
First published: November 5, 2020, 9:09 AM IST

ताज्या बातम्या