माद्रिद, डिसेंबर : एखादं औषध (medicine) दिल्यानंतर काही जणांवर त्याचे दुष्परिणाम (side effect) होतात. मात्र जे औषध दिलं ते औषधच चुकीचं असेल तर त्याचे किती गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात, त्याचं उदाहरण म्हणजे स्पेनमध्ये (spain) घडलेली घटना. जिथं मुलांना पोटदुखी आणि गॅससाठी औषध देण्यात आलं आणि त्यांचं शरीर अनावश्यक केसांनी भरलं.
उत्तर स्पेनच्या कँडाब्रिया (Cantabria) च्या टोरेलावेगा (Torrelavega) शहरात ही धक्कादायक घटना घडली आहे. स्पेनमध्ये डॉक्टरांनी मुलांना पोटदुखी आणि गॅसचं औषध दिलं. पोटदुखीचं मात्र त्याचे दुष्परिणाम भलतेच झाले. मुलांच्या शरीरावर भरपूर प्रमाणात केस आले. फक्त एका मुलाला नाही तर 20 मुलांना ही समस्या उद्भवली.
स्थानिक प्रशासनानं दिलेल्या माहितानुसार मुलांना पोटात वेदना होत होत्या आणि गॅसची समस्या होती. त्यावेळी त्यांना ओमेप्राजोल (Omeprazole) औषध देण्यात आलं. हे औषध घेतलेल्या मुलांच्या शरीरावर अचानक केस वाढू लागले. याचा तपास केला असता औषध कंपनीचा मोठा निष्काळजीपणा समोर आला. ओमेप्राजोल (Omeprazole) औषधाच्या बाटली मिनोजिडिल (Minoxidil) औषध होतं.
मिनोजिडिल हे केस वाढण्याचं औषध आहे. मिनोजिडिल सिरपच्या बाटल्यांवर ओमेप्राजोलचं लेबल लावून ग्रानाडा, कँटाब्रिया आणि वॅलेंसिया परिसरातील मेडिकल स्टोअरमध्ये ही औषधं पुरवण्यात आली.
हे वाचा - BF च्या लग्नामुळे सुडानं पेटली GF; नवरीच्या डोळ्यात फेविक्विक टाकत कापले केस
डेली मेलच्या रिपोर्टनुसार आता या मुलांना हाइपरट्रिचोसिस (Hypertrichosis) आजार बळावला आहे. या आजारात शरीरावर अनावश्यक केस वाढू लागतात. याला वेयरवूल्फ सिंड्रोम (Werewolf Syndrome) असंही म्हटलं जातं. प्रशासनानं आपली चूक स्वीकार केली आहे आणि मुलांवर उपचार सुरू केले आहेत आणि औषधं परत मागवली आहेत.