• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • Space Tourism | अंतराळ पर्यटनामुळे पृथ्वीवर कोरोना सारखा विषाणू येण्याची शक्यता, आला तर मानवजातीसाठी धोका?

Space Tourism | अंतराळ पर्यटनामुळे पृथ्वीवर कोरोना सारखा विषाणू येण्याची शक्यता, आला तर मानवजातीसाठी धोका?

मानवाने विज्ञानाच्या जोरावर अनेक शोध लावले असले तरी मागील दोन वर्षात एका विषाणूने सर्वांच्याच नाकी नऊ आणलेत. याला कुठेतरी माणूसच कारणीभूत आहे. अशातच आता अवकाश पर्यटन (Space Tourism) सुरू करण्याची घाई तर आपण करत नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

 • Share this:
  मुंबई, 20 नोव्हेंबर : मागील दोन वर्षात कोरोना महामारीने जगभरातील मनुष्य जातीला जेरीस आणलं आहे. कधीही न थांबणारा माणूस या संसर्गजन्य आजाराने एका जाग्यावर अडकून पडला. चिंतेची बाब म्हणजे असंख्य शास्त्रज्ञ आणि वैद्यकीय प्रगतीनंतरही आपल्या मानव जातीला विषाणूंसारख्या धोकादायक जीवांना (Dangerous Organisms) सामोरे जावे लागत आहे. अजूनही परिस्थिती नियंत्रणात आलेली दिसत नाही. अशा परिस्थितीत आपण मंगळावर जाऊन अवकाश पर्यटनाच्या (Space Tourism) दिशेने पावलं टाकण्याची घाई तर करत नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण, आपण मानव देखील सूक्ष्मजीवांना अंतराळात घेऊन जातो जिथं त्यांचं जलद म्यूटेशन होऊ शकते, ज्यामुळे ते धोकादायक ठरू शकतात. त्यामुळेच जैवसुरक्षेवर (Biosecurity) काम करणे अत्यंत गरजेचे असल्याचे बोलले जात आहे. जैवसुरक्षा उपायांची गरज अलीकडेच मंगळ मोहिमांच्या हालचाली झाल्या असल्या तरी मानवाला मंगळावर जाण्यासाठी अजून वेळ आहे. पण व्यावसायिक अवकाश पर्यटन सुरू झाले आहे. 85 हून अधिक कंपन्या किंवा संस्था भविष्यात आंतरग्रहीय पर्यटनावर काम करत आहेत. परंतु, अनेक शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की पृथ्वीबाहेर वाहतूक सुरू करण्यापूर्वी जगाने काही आवश्यक जैवसुरक्षा उपाय केले पाहिजेत. शास्त्रज्ञांना भीती या शास्त्रज्ञांना भीती वाटते की आपण अनोळखी आणि एलियन जीव, विशेषत: सूक्ष्मजीव, अवकाशातून पृथ्वीवर आणू शकतो, ज्यांचा सामना करण्यासाठी आपण अद्याप तयार नाही. जर असे जीव पृथ्वीवर आले, ज्यांचे आगमन इतर मार्गांनी शक्य नाही, तर पृथ्वीचा समतोल बिघडू शकतो. असं होण्याची शक्याता कमी तज्ञांचे म्हणणे आहे की असे होण्याची शक्यता नाही. कारण आतापर्यंत पृथ्वीच्या बाहेर विशेषत: सभोवताली कोणतेही जीवन आढळले नाही. मात्र, काही लोकांना असे वाटते की हे जीवन असू शकते तर आपण त्यासाठी तयारी केली पाहिजे. सिनेमाचं शूटिंग थेट अंतराळात! या अभिनेत्री आणि दिग्दर्शकासह क्रू जाणार Space Station वर तर भविष्यात धोका.. शक्यता अशीही आहे की एखादा माणूस पृथ्वीवरील एखादा जीव (सूक्ष्मजीव) अंतराळ पर्यटनात नेऊ शकतो. तर हे देखील धोक्याचे ठरू शकते. अंतराळातील प्रयोगांनी स्पष्टपणे दिसून आले आहे की तिथं पोहोचलेल्या सूक्ष्मजीवांमध्ये वेगाने जीन म्यूटेशन होते. सूक्ष्म गुरुत्वाकर्षण परिस्थितीत एस्चेरिचिया कोलायच्या हजारो पिढ्या विकसित केल्यानंतर, संशोधकांना असे आढळले आहे की एक जीवाणू प्रतिस्पर्धीपेक्षा अधिक वेगाने विकसित झाला आहे. ज्यामध्ये उच्च प्रतिजैविक प्रतिरोधक क्षमता आढळून आली आहे. जैवसुरक्षा व्यवस्थापनाची गरज जर तो स्ट्रेन पृथ्वीवर परत आणला गेला असेल तर तो पृथ्वीवरील मानवी जीवनासाठी गंभीर धोका असू शकतो. ऑस्ट्रेलियातील अॅडलेड विद्यापीठातील आक्रमण जीवशास्त्रज्ञ फिल कॅसी म्हणतात की अशा गंभीर परिस्थितीची संभाव्यता कमी आहे. परंतु, त्यांच्याकडे अत्यंत प्रभावी क्षमता आहे आणि हेच जैवसुरक्षा व्यवस्थापनाचे मुख्य कार्य आहे. कारण, जेव्हा परिस्थिती बिघडते, तेव्हा नियंत्रित करणे अवघड असते. Lights, camera, liftoff : अंतराळात झेपावले कलाकार; Space मध्ये पहिल्यांदाच Film shooting जीवशास्त्रज्ञांची आवश्यकता इंटरनॅशनल कमिटी ऑन स्पेस रिसर्च (COSPAR) ने ग्रहांच्या संरक्षणावर एक पॅनेल स्थापन केले आहे. पण, सध्या कोणतेही सदस्य Invasive species मध्ये तज्ञ नाहीत. ऑस्ट्रेलियातील जीवशास्त्रज्ञांना वाटते की हे एक गंभीर दुर्लक्ष असेल. ते म्हणतात की आम्हाला अधिक अत्याधुनिक नियमांची आवश्यकता असेल जेणेकरुन आम्ही पृथ्वीच्या बाहेरील वातावरणातून येणारे जैवसंक्रमण थांबवू शकू तसेच संसर्ग इथूनही बाहेर जाण्यापासून रोखू शकू. अंतरराष्ट्रीय नियमों पर काम बायोसायन्समध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात, जीवशास्त्रज्ञ लिहितात की Invasive species वरील विज्ञान आणि संशोधनाची सखोल माहिती घेतल्यानंतर, ते शिफारस करतात की Invasive जीवशास्त्रज्ञ आणि खगोलभौतिकशास्त्रज्ञांनी पृथ्वी आणि त्यापलीकडील ग्रहासाठी अधिक कार्यक्षम मार्ग तयार करण्यासाठी एकत्रितपणे काम करायला हवे. जीवांच्या सुरक्षेशी संबंधित आंतरराष्ट्रीय नियमांवर काम केले पाहिजे. Sex in the space : Astronauts अंतराळात सेक्स करतात का? सध्या जीवनसुरक्षा नियम किंवा प्रोटोकॉल आपल्याला अपयशी ठरवत आहेत, जसे की 2019 मध्ये जेव्हा इस्रायली अंतराळयान चंद्रावर आदळले, तेव्हा तिथं पृष्ठभागावर टार्डिग्रेड गेले होते, ते अजूनही जिवंत असण्याची शक्यता आहे. अंतराळ पर्यटनातही असे सूक्ष्म जीव प्रवाशांच्या माध्यमातून अंतराळात पोहोचू शकतात, जे तिथं म्यूटेट होऊन अतिशय धोकादायक ठरू शकतात. अशा परिस्थितीत जैवसुरक्षेवर सखोलपणे काम करण्याची गरज आहे.
  Published by:Rahul Punde
  First published: