सोशल मीडियावरील ट्रोलिंगची शिकार झाली पॉप स्टार, राहत्या घरी केली आत्महत्या

सोशल मीडियावरील ट्रोलिंगची शिकार झाली पॉप स्टार, राहत्या घरी केली आत्महत्या

याच पॉप स्टारनं गेल्या वर्षी #NoBra मोहिमेची सुरुवात केली होती.

  • Share this:

सियोल, 15 ऑक्टोबर : सोशल मीडिया हे सध्या एक प्रकारचे व्यसन झाले आहे. त्यामुळं सोशल मीडियाच्या दुष्परिणामांकडे नेहमीच दुर्लक्ष केले जाते. सध्या सोशल मीडियाचे दुसरे नाव म्हणजे ट्रोलिंग. केवळ एका फोटोमुळं किंवा एका पोस्टमुळं तुम्ही ट्रोल होऊ शकता. नुकत्याचा जाहीर झालेल्या एका रिसर्चनुसार सोशल मीडियावर वाढत्या ट्रोलिंगमुळं आत्महत्येच्या प्रमाणात वाढ झाले आहे. दरम्यान आता एका आंतरराष्ट्रीय पॉप स्टारनं सोशल मीडियावरील ट्रोलला कंटाळून आत्महत्या केली आहे.

जगभरात #NoBra मोहिम चालवून चर्चेत आलेली इंटरनॅशनल पॉप स्टार सुलीनं (Sulli) आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. सोमवारी पॉप स्टार आणि अभिनेत्री सुलीनं वयाच्या 25 वर्षी आत्महत्या केल्यामुळं जगभरात खळबळ माजली आहे. दरम्यान, सुलीनं आत्महत्या करणापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. पोलिसांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही आहे. मात्र सुलीही काही काळापासून नैराश्येत होती. याचे कारण होते, सोशल मीडियावर तिच्या #NoBra मोहिमेला केले जाणारे ट्रोल. त्यामुळं तिच्या आत्महत्येसाठी सोशल मीडिया ट्रोलिंगला कारणीभूत ठरवले जात आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by 설리가진리 (Sulli) (@jelly_jilli) on

दरम्यान दक्षिण कोरियात गेल्या काही काळापासून #NoBra अशी मोहिम राबवली जात होती. यामुळं सुली सर्वात आधी लोकांच्या नजरेत आली. याची सुरुवात सुलीनं आपल्या इन्स्टाग्रामवरून केली. सुलीनं ब्रा न घातलेला फोटो शेअर केला होता, तिचा हा फोटो सोशल मीडियावर बराच व्हायरल ही झाला होता. दरम्यान काहींनी सुलीचे कौतुक केले होते, तर काहींना तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. सुलीबद्दल आक्षेपार्ह शब्दात कमेंट केल्या जात होत्या, त्यामुळं समाजात वेगळा बदल म्हणून सुरुवात करण्यात आलेली ही मोहिम सुलीनं बंद केली आणि ती नैराश्याची शिकार झाली.

 

View this post on Instagram

 

오늘 왜 신나?

A post shared by 설리가진리 (Sulli) (@jelly_jilli) on

पोलिसांनी सीएनएनला दिलेल्या माहितेत, "आत्महत्येप्रकरणी चौकशी सुरू आहे. सीसीटिव्ही फुटेज आम्ही पाहणार आहोत. सुलीच्या मॅनेजरचीही चौकशी केली जाणार आहे, मात्र अद्याप त्यांच्याशी कोणताही संपर्क झालेला नाही", असे सांगितले.

सुलीनं आपल्या करिअरची सुरुवात बालकलाकार म्हणून केली होती. 2009मध्ये सुलीनं पॉप बॅण्डम f(x)मध्ये सामिल होण्याचा निर्णय घेतला. सुली सोशल मीडियावर #NoBra सारखी मोहिम आणि स्त्रीयांसाठी समान हक्काची लढणारी अशी तिची ओळख आहे. सुलीनं 2019मध्ये 'नो ब्रा' मोहिमेला सुरुवात केली. स्तनाच्या कर्करोगाबाबत जागृकता निर्माण व्हावी म्हणून सुलीनं ही मोहित सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता तिच्या याच मोहिमेनं तिचा जीव घेतला. सुलीच्या आत्महत्येनंतर जगभरात ट्रोलिंगविरोधात कडक कारवाई केली जावी, अशी मागणी जोर धरत आहे.

VIDEO : धावत्या लोकलमधून चोरानं हिसकावला मोबाईल, पुढे काय घडलं तुम्हीच पाहा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 15, 2019 12:19 PM IST

ताज्या बातम्या