सियोल, 25 नोव्हेंबर : मानसिक स्वाथ्य आणि डिप्रेशन यांच्यामुळे आत्महत्या करणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यातच आता दक्षिण कोरियाची पॉप स्टार आणि अभिनेत्री गू हारा सियोलच्या आपल्या राहत्या घरात मृत अवस्थेत सापडली. 28 वर्षीय गायिका पहिल्यांदा प्रकाशझोतात आली ती 2008मध्ये. 2008मध्ये गू हारानं एका के-पॉप ग्रुपमध्ये सामिल झाली होती.
याचवर्षी मे महिन्यात गू हारानं याआधीही एकदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. पॉप स्टार असूनही गेले बरेच महिने गू हाराचे एकही गाणे प्रसिध्द झाले नव्हते, त्यामुळं तीनं आपल्या चाहत्यांची माफीही मागितली होती. मात्र अचानक गू हारनं जीवन संपवण्याचा निर्णय घेतल्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. काही महिन्यांपूर्वी गू हाराची मैत्रीण असलेल्या एका पॉप सिंगरने सोशल मीडियावरील ट्रोलना कंटाळून आत्महत्या केली होती. दरम्यान गू हाराच्या आत्महत्या प्रकरणी पोलीस पुढील चौकशी करत आहेत.
वाचा-संजय राऊतांनी फडणवीसांना दिलं थेट ओपन चॅलेंज, महाविकासआघाडीची सर्वात मोठी बातमी!
दरम्यान, याआधी गू हारानं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, त्यावेळी बॉयफ्रेंडवर अश्लील व्हिडीओ रेकॉर्ड केल्याचा आरोप केला होता. एवढेच नाही तर हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करेन अशी धमकीही गू हाराला दिली होती. त्यामुळं मे 2019मध्ये गू हारानं आत्महत्येचा पहिला प्रयत्न केला होता. त्यामुळं गू हारानं केलेल्या आत्महत्येनंतर पोलिसांनी पुन्हा एकदा बॉयफ्रेंडची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान गू हाराच्या चाहत्यांनी तिच्या बॉयफ्रेंडला अटक करण्याची मागणी केली आहे. गू हारानं आत्महत्येआधी कोणतीही चिठ्ठी लिहिलेली पोलिसांनी आढळून आलेली नाही.
वाचा-आश्चर्यकारक! 21 वर्षांच्या तरुणीनं दिला दोन डोकं, तीन हात असलेल्या बाळाला जन्म
सोशल मीडियावर गू हारा सर्वात जास्त चर्चेत असायची. तिचे 2 लाखांहून अधिक फॉलोअर आहेत. गू हाराच्या चाहत्यांनी याआधी तिच्या बॉयफ्रेंड विरोधात रेवेंश पॉर्न विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली होती. दरम्यान गू हारानं टाकलेल्या आपल्या शेवटच्या इन्स्टाग्राम पोस्टवर शुभ रात्री असे म्हणत फोटो टाकला होता. त्यामुळं चाहत्यांनी शुतभ रात्रीचा अर्थ ती आत्महत्या करण्याचे संकेत देत होती, असा लावला आहे.
वाचा-53 आमदारांचा पाठिंबा असूनही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची मनधरणी का करतेय?
मुख्य म्हणजे जागतिक मानसिक स्वाथ्य अहवालानुसार दक्षिण कोरियामध्ये जगातील इतर देशांच्या तुलनेत सर्वात जास्त आत्महत्येचे प्रकार घडतात. गू हाराच्याआधी प्रसिध्द पॉप सिंगर सुलीनं आत्महत्या केली होती. त्यामुळं आता गू-हाराच्या आत्महत्येनंतर दक्षिण कोरियाच्या पॉप जगतात हळहळ व्यक्त केली जात आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा