दररोज लग्नाचा ड्रेसच घालते ही महिला, कारण ऐकून तुम्हीही कराल कौतुक!

दररोज लग्नाचा ड्रेसच घालते ही महिला, कारण ऐकून तुम्हीही कराल कौतुक!

विशेष म्हणजे दररोज लग्नाचा ड्रेस घालण्या मागचं कारण हे भारताशी जोडलेलं आहे.

  • Share this:

दक्षिण ऑस्ट्रेलियातील एडेलेड शहरातील एक महिला रोज तिच्या लग्नाचा ड्रेस घालते. हे ऐकायला कितीही विचित्र वाटत असलं तरी हे खरंय... मार्केटमध्ये जाणं असो किंवा जिममध्ये जाताना किंवा इतर कोणत्याही वेळी ती फक्त लग्नाचा ड्रेस घालते. 43 वर्षीय या महिलेचं नाव टॅमी हॉल असं असून ती पर्यावरणवादी आहे. विशेष म्हणजे दररोज लग्नाचा ड्रेस घालण्या मागचं कारण हे भारताशी जोडलेलं आहे. टॅमी म्हणाल्या की, 2016 मध्ये त्या भारतात फिरायला आल्या होत्या.

भारतात आल्यावर त्यांना जाणीव झाली की त्या नवीन कपडे आणि चपलांवर किती खर्च करतात. त्यामुळे भारतातून मायदेशात गेल्यावर तिने अवास्तव खर्च न करण्याचा निर्णय घेतला. 2018 मध्ये त्यांचं लग्न ठरलं. लग्नाच्यावेळी त्यांनी एक पांढऱ्या रंगाचा ड्रेस शइवला होता. या ड्रेसची किंमत 985 पाउंड म्हणजे जवळपास 86 हजार रुपये एवढी होता. द सनने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, टॅमीने सांगितले की, एका ड्रेससाठी एवढा खर्च करणं योग्य नव्हतं. अखेर ड्रेसमध्ये गुंतवलेले पैसे वसूल करण्यासाठी टॅमी दररोजच्या इतर कपड्यांप्रमाणे लग्नाचा ड्रेस वापरते.

टॅमी पुढे म्हणाल्या की, जेव्हा मी लग्नाचा हा ड्रेस घालून बाहेर पडते तेव्हा लोक मला याचं कारण विचारतात. ते विचार करत असतील की या जड ड्रेस ऐवजी कोणताही हलका ड्रेस घातला जाऊ शकतो. पण मला माझ्या लग्नाचा ड्रेस दररोज घालायला आवडतो. आता टॅमी, मातीचं काम असो किंवा एखाद्या सार्वजनिक ठिकाणी जाणं असो ती लग्नाचा ड्रेस घालायलाच प्राधान्य देते. एवढंच नाही तर पतीसोबतच्या पुढच्या व्हेकेशनवेळीही ती हाच ड्रेस घालायला प्राधान्य देणार असल्याचं सांगितलं.

काँग्रेस नेत्यांमधील वाद कॅमेऱ्यात कैद; उमेदवारीवरून नाराजीचा VIDEO VIRAL

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: lifestyle
First Published: Oct 4, 2019 06:56 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...