Home /News /lifestyle /

Hair Care : केस खूप गळण्याचे कारण असू शकते व्हिटॅमिन 'ई' ची कमतरता, आहारात समाविष्ट करा हे पदार्थ

Hair Care : केस खूप गळण्याचे कारण असू शकते व्हिटॅमिन 'ई' ची कमतरता, आहारात समाविष्ट करा हे पदार्थ

तुमचे केस गळत असतील (Hair Fall Problem) तर याचा अर्थ तुमच्या शरीरात कुठेतरी व्हिटॅमिन ईची कमतरता (Vitamin E Deficiency) आहे. यासाठी आपल्या आहाराची काळजी घेण्याबरोबरच, आपल्याला व्हिटॅमिन ईचे प्रमाण वाढवणे आवश्यक आहे.

  मुंबई, 25 जून : व्हिटॅमिन ईच्या कमतरतेमुळे जास्त केस गळतात. सतत केस गळताना पाहून लोक अस्वस्थ होतात. मात्र इलाज कळत नाही. अशावेळी लोक सर्व प्रकारचे उपाय करून बघतात. पण उपयोग होत नाही. यासाठी व्हिटॅमिन ईचे (Vitamin E) सेवन करणे आवश्यक आहे. वेब एमडीच्या मते, व्हिटॅमिन ई सामान्यतः त्वचा उत्तम ठेवण्यासाठी वापरले जाते. परंतु व्हिटॅमिन ई केसांसाठी देखील उपयुक्त ठरते. तुमचे केस गळत असतील (Hair Fall Problem) तर याचा अर्थ तुमच्या शरीरात कुठेतरी व्हिटॅमिन ईची कमतरता (Vitamin E Deficiency) आहे. अशा परिस्थितीत, आपल्या आहाराची काळजी घेण्याबरोबरच, आपल्याला व्हिटॅमिन ईचे प्रमाण वाढवणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला शरीरातील व्हिटॅमिन ईचे प्रमाण वाढवण्यासाठी काही उपाय सांगणार आहोत. केसगळतीचे कारण केस गळण्याची अनेक कारणे असू शकतात, जसे की प्रदूषण, चुकीचे अन्न आणि अस्वास्थ्यकर जीवनशैली. जेव्हा केस गळणे सुरू होते, तेव्हा लोक अनेक प्रकारचे केस उत्पादने वापरण्यास सुरवात करतात, परंतु हे लोक केस गळण्याचे खरे कारण शोधत नाहीत. केस गळण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे शरीरातील पोषणाची कमतरता. जेव्हा शरीरात आवश्यक पोषक तत्वांची कमतरता असते तेव्हा शरीराच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या समस्या दिसून येतात. त्यापैकी एक म्हणजे केस गळणे.

  वजन कमी करण्यासाठी दररोज प्या 'हा' रस; काही दिवसांतच फरक दिसून येईल

  पोषणाच्या कमतरतेमुळे केस गळतात. त्यामुळे व्हिटॅमिन ई द्वारे तुमच्या शरीराचे आणि केसांचे पोषण करण्यासाठी भरपूर फळे किंवा व्हिटॅमिन ई असलेले पदार्थ (Vitamin E Rich Food) खाणे गरजेचे आहे. अशी फळे आणि पदार्थ खाल्ल्याने तुमचे केस मजबूत होतील आणि त्याच वेळी आवश्यक पोषण शरीराच्या इतर भागांमध्येही पोहोचेल. व्हिटॅमिन ईचे मुख्य स्त्रोत हार्वर्डच्या मते बदाम हे व्हिटॅमिन ई चा चांगला स्रोत आहे. सूर्यफुलाच्या बिया देखील व्हिटॅमिन ईचा उत्तम स्रोत मानल्या जातात. याशिवाय हिरव्या भाज्यांचे नियमित सेवन करा, कारण त्यात व्हिटॅमिन ई देखील भरपूर प्रमाणात असते. तसेच, तुम्ही पीनट बटर, किवी, ब्रोकोली, टोमॅटो, ओरेगॅनो, ऑलिव्ह इत्यादींचे सेवन करून व्हिटॅमिन ई (Sources Of Vitamin E) वाढवू शकता.

  'ब्रेकअप के बाद' धक्क्यातून सावरणारं Breakup Funeral Rituals; काय आहे हे आणि कसं करायचं पाहा

  या सर्व पदार्थांचे सेवन केल्याने तुम्ही तुमच्या शरीरातील व्हिटॅमिन ईच्या कमतरतेवर मात करू शकता आणि त्याचबरोबर तुमचे गळणारे केस निरोगी, मजबूत आणि दाट बनवू शकता.
  Published by:Pooja Jagtap
  First published:

  Tags: Health Tips, Lifestyle

  पुढील बातम्या