Home /News /lifestyle /

"मला फोन हवाय", कित्येक गरजूंना मदत करणाऱ्या सोनू सूदने का केलं असं TWEET?

"मला फोन हवाय", कित्येक गरजूंना मदत करणाऱ्या सोनू सूदने का केलं असं TWEET?

आतापर्यंत सोनू सूदने (Sonu sood) अनेकांना मदत केली आहे. मात्र आपल्याला फोन हवा, असं ट्वीट करण्याची वेळ त्याच्यावर का आली पाहा.

    मुंबई, 03 सप्टेंबर :  कोरोना लॉकडाऊनमध्ये बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (sonu sood) सध्या अनेक गरजूंसाठी देवदूत बनला आहे. प्रवासी मजुरांपासून सोनू सूदने जे मदतकार्य सुरू केलं आहे, ते अजूनही सुरू आहे. अनेकांना रोजगार, शिक्षण, वैद्यकीय, आर्थिक मदत  त्याने मिळवून दिली. त्याच्याकडे मदतीसाठी दररोज हजारो मेसेज येत असतात आणि या प्रत्येक मेसेजला प्रतिक्रिया देण्याचा आणि शक्य तितक्या लोकांना मदत करण्याचा तो प्रयत्न करतो. मात्र त्याला मदतीसाठी असेही काही मेसेज येतात ज्याला काहीच अर्थ नसतो आणि अशा मेसेजकडेही तो दुर्लक्ष करत नाही तर त्यांनाही प्रतिक्रिया देतो. नुकतीच एका युझरने सोनूकडे आयफोनची  (iPhone) मागणी केली आहे.  त्यावर सोनू सूदने त्याला जबरदस्त असं उत्तर दिलं आहे आणि त्याची बोलतीच बंद केली आहे. सोनूला एका तरुणाने आयफोनसाठी एक-दोन वेळा नव्हे तर तब्बल 20 वेळा ट्वीट केलं. तरुण म्हणाला, सर मला अॅपल आयफोन हवा आहे. मी 20 वेळा ट्वीट केलं आहे. सोनूने या ट्वीटला मजेशीर उत्तर दिलं आहे. सोनू म्हणाला, "मलादेखील एक फोन हवा आहे. मी त्यासाठी मी तुला 21 वेळा ट्वीट करू शकतो" एकिकडे सोनू सूद गरजूंना मदत करण्यासाठी सदैव तयार असतो तर दुसरीकडे अशा पद्धतीने मदत मागणाऱ्यांनाही काय उत्तर द्यायचं हेदेखील त्याला माहिती आहे. सोनूने दिलेलं हे उत्तर प्रत्येकाला आवडलं आहे. हे वाचा - फक्त BIG B नाही तर TV कलाकारांनीही लॉकडाऊनमध्येच घेतली कोट्यवधींची लक्झरी कार रिल लाइफमधील खलनायक रिअल लाइफमध्ये हिरो ठरला.  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशभर लॉकडाऊन लागू झाला आणि मग स्थलांतरित मजूर आपापल्या गावी परतण्यासाठी धडपडू लागले. वाहतूक बंद असल्याने त्यांनी पायीच आपल्या घरचा रस्ता धरला. त्यावेळी सोनू सूद त्यांच्यासाठी धावून आला आणि या मजुरांना गाडीने त्यांच्या घरी पोहोचवण्याची सोय गेली. महाराष्ट्रातील विविध मजुरांना त्यांच्या राज्यामध्ये सुखरूप पोहोचवल्यानंतर प्रवासी मजुरांना नवीन काम मिळावे याकरता सोनूने रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. त्याने रोजगार मिळवून देण्यासाठी अॅप लाँच केलं आणि यामार्फत त्याने या मजुरांना घराची ऑफरही दिली. हे वाचा - तरुणींनाही लाजवेल असं सौंदर्य; पन्नाशी पार अभिनेत्रींचे HOT PHOTO प्रवासी मजूरच नाही तर कोरोनाच्या परिस्थितीही आपला जीव धोक्यात घालून देशसेवा करणाऱ्या आपली ड्युटी बजावणाऱ्या मुंबई पोलिसांनाही सोनू सुदने मदत केली. मुंबई पोलिसांना त्याने 25000 फेस शिल्ड दिले. फक्त कोरोना आणि कोरोना लॉकडाऊनमुळे उद्बवणाऱ्या समस्यांचा सामना करणाऱ्यांना नव्हे तर सोनू आणि त्याच्या टीमने निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित कुटुंबालाही मदत केली. शिवाय आताही काही राज्यांमध्ये पूरग्रस्तांसाठी त्याने मदतीचा हात दिला आहे. याशिवाय अनेकांना शिक्षण, वैद्यकीय कारणांसाठीदेखील मदत केली आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Sonu Sood

    पुढील बातम्या