मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

...म्हणून त्याने 'तेरा मुझसे है पहले का नाता...' गाऊन कोरोनाग्रस्त आईला अलविदा केलं; कारण ऐकून आवरणार नाही अश्रू

...म्हणून त्याने 'तेरा मुझसे है पहले का नाता...' गाऊन कोरोनाग्रस्त आईला अलविदा केलं; कारण ऐकून आवरणार नाही अश्रू

कोरोनाग्रस्त आई मरणाच्या दारात असताना तिच्यासाठी व्हिडीओ कॉलवरून 'तेरा मुझसे है पहले का नाता...' गाणं गाणाऱ्या त्या मुलाने आता सोशल मीडियावर आपला व्हिडीओ शेअर केला आहे.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 18 मे :  'तेरा मुझसे है पहले का नाता कोई...', (Tera mujhse hai pehle ka naata koi) हे गाणं तुम्ही आता ऐकलं की तुमच्या डोळ्यासमोर ती फिल्म नाही तर काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेली काळीज पिळवटून टाकणारी अशी बातमी समोर येईल. एका लेकाने मृत्यूशय्येवर असलेल्या आपल्या कोरोनाग्रस्त आईसाठी गायलेलं हे गाणं (Son sang for corona positive mother). आई मरणाच्या शेवटच्या घटका मोजत असताना मुलाने हे गाणं गात तिला अलविदा केलं. एका डॉक्टरने सोशल मीडियावर ही पोस्ट केली आणि पोस्ट वाचणारा प्रत्येक जण भावुक झाला. आता हाच मुलगा सर्वांसमोर आला आहे. त्याने सोशल मीडियावर स्वतःचा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात पुन्हा त्याने आपल्या आईसाठी हे गाणं गायलं आणि त्यामागील कारणही सांगितलं आहे.

डॉ. दीपशिखा घोष यांनी आपल्या ट्विटरवर ही पोस्ट केली होती. व्हिडीओ कॉलवर एका मुलाने आपल्या आईसाठी हे शेवटचं गाणं गायलं होतं.  सोहम चॅटर्जी असं या मुलाचं नावं आहे. सोहमने आपल्या इन्स्टाग्रामवर आपल्या आईसाठी एक पोस्ट केली आहे. त्यात त्याने आपल्या आईच्या मृत्यूपूर्वी गायलेलं गाणं तिच्या मृत्यूनंतर पुन्हा गायलं आहे.

हा व्हिडीओ पोस्ट करताना सोहमने कॅप्शनमध्ये सांगितलं आहे, संगीत हा माझ्या आणि माझ्या आईमधील एक धागा होता. एकमेकांबद्दल असलेला आदर आणि प्रेम व्यक्त करण्याचा आमचा हा एक मार्ग होता. हे गाणं आपलं आहे आणि कोणत्याही मान्यतेशिवाय ते आपलं लाहिल. आईला माहिती आहे. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. तुझ्याशिवाय आयुष्य खूपच कठीण आहे.

हे वाचा - सोबतच जन्मले अन् जगाचा निरोपही सोबतच घेतला, कोरोनानं जुळ्या भावांचा मृत्यू

तसंच सोहम या व्हिडीओच्या सुरुवातीला गाणं म्हणतो आणि पुढे याच व्हिडीओतून आपल्या भावनाही व्यक्त करतो. "मी आजही आईला पुन्हा बोलवण्याचा प्रयत्न करतो आहे. पण अनेकदा नशीबासमोर तुमचं काही चालत नाही. जे व्हायचं आहे ते होतंच. आम्ही त्यांना वाचवू नाही शकलो पण आम्ही तिच्यावर किती प्रेम करायचो हे तिला माहिती असावं अशी आशा मला आहे. आई हे तुझ्यासाठी"

हे वाचा - Positive Story: कोरोना झाला तर घाबरू नका, या 100 पार केलेल्या आजी-आजोबांकडे पाहा

"ती मला पाहत असेल अशा गोष्टींवर मी विश्वास ठेवत नाही. पण मी जेव्हा रडतो तेव्हा मला वाटतं की आई रडते आहे, मी नाही. जशी ती रडायची, तसाच मी रडतो आहे. ती माझ्याच शरीरात आहे", असं म्हणत तो सर्वांनी दिलेल्या प्रेमाबद्दल आपले आभारही व्यक्त करतो.

First published:

Tags: Coronavirus, Mother, Parents and child, Relationship, Son, Viral