Home /News /lifestyle /

मुख्यमंत्र्यांच्या सुपुत्राचं नवं संशोधन, मेघालयाच्या टेकड्यांमध्ये तेजस ठाकरे यांनी पाहा काय शोधलं

मुख्यमंत्र्यांच्या सुपुत्राचं नवं संशोधन, मेघालयाच्या टेकड्यांमध्ये तेजस ठाकरे यांनी पाहा काय शोधलं

तेजस ठाकरे हे वाइल्डलाइफ फोटोग्राफर आणि जैवविविधता संशोधक आहेत. कमी वयातच त्यांनी या क्षेत्रांमध्ये आपली ओळख तयार केली आहे. त्यांच्या या नव्या संशोधनाची दखल आंतरराष्ट्रीय जर्नलनी घेतली आहे.

    मुंबई, 29 डिसेंबर : जैवविविधतेबाबत सतत संशोधन करणारे तेजस ठाकरे (Tejas Thackeray) हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे धाकटे चिरंजीव. आजवर त्यांनी विविध मासे, पाली यांच्या नवनव्या प्रजाती शोधल्या आहेत. आता तेजस यांनी शोधलेल्या अजून एका माशाच्या प्रजातीबाबतची माहिती त्यांनीच आपल्या इन्स्टा पेजच्या (Instagram page) माध्यमातून दिली आहे. तेजस यांच्या या संशोधनाची दखल आंतरराष्ट्रीय नियतकालिकानेही (international journal) दखल घेतली आहे. मेघालयातील खासी टेकड्यांतून (Khansi hills, meghalaya) तेजस ठाकरे यांच्या टीमने अत्यंत सुंदर आणि तितकाच दुर्मीळ असलेला चन्ना स्नेकहेड हा मासा शोधला आहे. चन्ना स्नेकहेड या माशाच्या प्रजातीला ऑरिस्टॉन एम. रेंडॉन्गसंगी यांचं नाव देणार असल्याचंही तेजस यांनी आपल्या या पोस्टमध्ये म्हटलंय. ऑरिस्टॉन यांनीच पहिल्यांदा या माशाची प्रजाती शोधली होती. या संशोधनात त्यांच्यासोबत जे. कृथ्वीराज, एस. गजेंद्रो, ए. उमा, एन मौलिथरन आणि एम. बॅंकिट हे सहभागी झाले होते. 'ऍक्वा इंटरनॅशनल जर्नल ऑफ इचिथॉलॉजी' या आंतरराष्ट्रीय नियतकालिकाने सप्टेंबरच्या अंकात या संशोधनाची दखल घेतलीय. सोबतच अंकाच्या मुखपृष्ठावरही त्यांनी या माशाचा फोटो घेतला आहे. सोबतच या माशाचे वर्णन करणारा शोधनिबंध लिहून तेजस यांनी 'कोपिया - अमेरिकन सोसायटी ऑफ इचिथोलॉजिस्ट अ‍ॅंड हर्पेटॉलॉजिस्ट ऑफिशियल जर्नल'ला पाठवला. या जर्नलनंही हे संशोधन प्रसिद्ध केलं.
    काही दिवसांपूर्वीच तेजस यांनी महाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वतरांगेतून स्चिस्तुरा हिरण्यकशी नावाची माशाची दुर्मिळ प्रजात शोधली होती. आजवर त्यांनी एकूण 11 दुर्मीळ वन्य प्रजातींचा शोध लावला आहे. जूनमध्येही तेजस ठाकरे यांच्या टीमचं एक संशोधन प्रसिद्ध झालं होतं. त्यांच्या टीमने पालींच्या दुर्मिळ प्रजातींचा शोध तेव्हा लावला होता. भारतात वेगवेगळ्या 50 पालींच्या प्रजाती आढळतात. त्यात आता डोळ्यांच्या गोलाकार मोठ्या बुबळांच्या या पाली त्यांच्या वेगळ्या शरीर रचनेमुळे प्राणीतज्ञांचं लक्ष वेधून घेत आहेत. तेजस ठाकरे, अक्षय खांडेकर, इशान अग्रवाल आणि सौनक पाल या चार संशोधकांनी 2014 सालीच शोधून काढल्या होत्या. मात्र गेली पाच वर्षे या दुर्मीळ प्रजातींच्या पालींवर जणुकीय तसेच इतर पालींपेक्षा या वेगळ्या का आहेत यावर प्राणी शरीर शास्त्रांच्या नियमानुसार अनेक सविस्तर संशोधन करण्यात आलं.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Fish, Son, Uddhav thackeray

    पुढील बातम्या