मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

लता मंगेशकरांना म्हटलं Overrated! सोशल मीडियावर खळबळ; नेटकऱ्यांनी झापलं!

लता मंगेशकरांना म्हटलं Overrated! सोशल मीडियावर खळबळ; नेटकऱ्यांनी झापलं!

एका ट्वीटर वापरकर्तीने (Twitter User) गुरुवारी सायंकाळी भारताची गानकोकिळा (Gankokila) लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांना 'ओव्हररेटेड' (Overrated) म्हटलं आहे. त्यामुळे प्रसिद्ध गायिका (Prominent singer) लता मंगेशकर ट्वीटरला ट्रेंड झाल्या असून एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

मुंबई, 15 जानेवारी: ट्विटरवर (Twitter) बऱ्याचदा असं काही तरी विचित्र घडतं. अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्याने कुणी कुणाविषयी काहीही बोलू शकतं हे खरं, पण अशी काही मतं व्यक्त केली, तर ट्रोलर्स, चाहते, जाणकार यांच्याकडून वेळीच कानउघाडणीही होते. असंच एक उदाहरण खरं तर Twitter युद्ध घडलं ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्यावरून.  एका ट्विटर यूजरने लतादीदींबद्दल केलेल्या कमेंटमुळे वादंग निर्माण झाला.

एका ट्विटर वापरकर्तीने (Twitter user) गुरुवारी सायंकाळी भारताची गानकोकिळा लता मंगेशकर (Lata mangeshkar) यांना 'ओव्हररेटेड' (Overrated) म्हटलं आहे. त्यामुळे प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर ट्वीटरला ट्रेंड (Trending) झाल्या आहेत. ओव्हररेडेत म्हणजे गरज नसताना अतिप्रसिद्धी किंवा कौतुक वाट्याला येणं. थेट लता दीदींबद्दल असं मत व्यक्त झाल्याने खळबळ उडाली.

@ikaveri युजरनेम असणाऱ्या एका व्यक्तीनं हे वादग्रस्त ट्वीट केलं आहे. तिनं आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, 'लता मंगेशकर यांचा आवाज खूप चांगला आहे, असा विचार करायला लावून भारतीय लोकांचं ब्रेन वॉश केलं आहे.'

यानंतर तिने लता मंगेशकर तिच्या आवडत्या गायिका का नाहीत, याची तिने कारणं सांगितली आहेत. त्यासाठी तिने ट्विटर थ्रेडचा वापर केला आहे.

हे ट्वीट केल्यानंतर वादाला सुरुवात झाली. काही जणांनी या व्यक्तीला पाठिंबा तर काहींनी तिच्यावर जबरदस्त टीका केली. या ट्वीटला आतापर्यंत 6.8 हजार लोकांनी लाइक केलं आहे, तर जवळपास दोन हजार जणांनी या ट्वीटला रिट्वीट केलं आहे. रिट्वीट करताना काही आपली मतंही मांडली आहेत.

पण बहुतांशी नेटकऱ्यांनी त्या ट्विटर वापरकर्तीचे कान उपटले आहेत. यामध्ये गायक अदनान सामी आणि बॉलीवूड दिग्दर्शक-लेखक विवेक अग्निहोत्री यांनीही तिला शाब्दिक फटकारे मारले आहेत.

यावेळी लता मंगेशकर यांना पाठिंबा दर्शवताना म्हटलं की, 'लता मंगेशकर हे एक त्यापैकी महत्त्वाचं कारण आहे, ज्यामुळे माझा सरस्वती देवतेवर विश्वास आहे.

अदनान सामीने अलिकडेच ट्वीटरवर एक फोटो ट्वीट केला आहे, ' यामध्ये लता मंगेशकर, आशा भोसले आणि पाकिस्तानी गायक नूर जहाँ यांचा त्रिवेणी संगम जुळून आला आहे.

या मंत्रमुग्ध करणाऱ्या फोटोला नेटिझन्स कडून खूप पसंती मिळाली आणि रीट्वीही मिळाले आहेत. तर अनेकांनी या संगीतातील त्रिकुटाची प्रशंसा केली आहे.

First published: