मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Kitchen Tips: माशांच्या रेसिपीमुळे सर्वत्र वास येतोय? या ट्रिक्सने चुटकी सरशी दुर्गंधी घालवा

Kitchen Tips: माशांच्या रेसिपीमुळे सर्वत्र वास येतोय? या ट्रिक्सने चुटकी सरशी दुर्गंधी घालवा

मासे शिजवल्यानंतर (Coking Fish without smell) स्वयंपाकघर साफ केल्यानंतरही वास राहतो. हा वास दूर करण्यासाठी काही युक्त्या खूप प्रभावी आहेत. यामुळे दुर्गंधीही दूर होईल.

    नवी दिल्ली, 26 डिसेंबर : स्वयंपाकघर घरातील सर्व मंडळींसाठी अन्न तयार होत असल्यानं ते नेहमी स्वच्छ ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. तसंच, स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तींसाठीही स्वयंपाकघरातील वातावरण (Simple Kitchen Tips) चांगलं ठेवणं खूप महत्वाचं आहे. स्वयंपाकघर अस्वच्छ राहीलं किंवा तिथं एक दुर्गंधी येत असेल तर त्याचा स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होतो. विशेषत: ज्या घरांमध्ये मांसाहारी अन्न बनवलं जातं, त्यांनी खूप काळजी घेणं आवश्यक आहे. अशा स्वयंपाकघरांत बॅक्टेरिया, विषाणू पोहोचण्याची आणि दुर्गंधी येण्याची दाट शक्यता असते. मासे बनवल्यानंतर येणारी दुर्गंधी कशी थांबवावी, हे आज जाणून घेऊ. या युक्त्यांसह माशांचा वास काढून टाका 'झी न्यूज'ने दिलेल्या बातमीनुसार, मासे शिजवल्यानंतर (Coking Fish without smell) स्वयंपाकघर साफ केल्यानंतरही वास राहतो. हा वास दूर करण्यासाठी काही युक्त्या खूप प्रभावी आहेत. यामुळे दुर्गंधीही दूर होईल. तसंच, स्वयंपाकघरातील वातावरण नेहमी प्रसन्न आणि सुगंधी असेल. सर्वप्रथम, स्वयंपाकघरातील जिथून वास येत आहे, ती जागा शोधा. कारण गॅस-शेगडीखाली पडलेला मासळीचा एक छोटा तुकडादेखील संपूर्ण स्वयंपाकघरात दुर्गंधी पसरवण्यास पुरेसा ठरतो. हे वाचा - High Blood Sugar: मधुमेहाच्या रुग्णांनी कोरफडीसोबत खावी ही एक गोष्ट; नेहमी साखर राहील नियंत्रणात तसंच मासे ठेवलेल्या ठिकाणाहून काढून बाजूला घेतल्यानंतरही बराच वेळ वास राहतो. अशी जागा योग्य प्रकारे स्वच्छ करणं आवश्यक आहे. माशांना वास येत असलेल्या भागावर लिंबाच्या रसाचे काही थेंब टाका आणि थोडा वेळ तसंच ठेवा. त्यानंतर तिथं गरम पाणी टाका. थोड्या वेळानं वास निघून जाईल. हे वाचा - Weight Loss Tea: दालचिनीसोबत घरातीलच या गोष्टी घालून बनवा स्पेशल चहा; झपाट्यानं वजन होईल कमी माशांचा वास दूर करण्यासोबतच, स्वयंपाकघर नेहमी प्रसन्न राहण्यासाठी तुम्ही हर्बल पाऊच किंवा सुगंधी तेलं किचनमध्ये ठेवू शकता. यामुळे स्वयंपाकघर नेहमी प्रसन्न राहतं आणि तिथं सुगंध दरवळत राहतो. ज्या भागातून माशाचा वास येत आहे, त्या भागावर कापसाच्या गोळ्यावर सुगंधी तेल लावून ठेवून द्या. काही वेळात वास निघून जाईल.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Lifestyle, Recipie

    पुढील बातम्या