मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

मनःशांती: आनंदी राहायचंय? आपल्या मनातली स्वतःची प्रतिमा आधी सुधारा, हे वाचा कसं करायचं?

मनःशांती: आनंदी राहायचंय? आपल्या मनातली स्वतःची प्रतिमा आधी सुधारा, हे वाचा कसं करायचं?

सकारात्मक प्रतिमा असलेले लोक नेहमी आनंदी असतात. तुम्ही सुद्धा ही सवय तुमच्यात आणू शकता. आनंदी असणे ही केवळ चांगली भावना नाही; तर, यामुळे मानसिक आरोग्यही सुधारते.

सकारात्मक प्रतिमा असलेले लोक नेहमी आनंदी असतात. तुम्ही सुद्धा ही सवय तुमच्यात आणू शकता. आनंदी असणे ही केवळ चांगली भावना नाही; तर, यामुळे मानसिक आरोग्यही सुधारते.

सकारात्मक प्रतिमा असलेले लोक नेहमी आनंदी असतात. तुम्ही सुद्धा ही सवय तुमच्यात आणू शकता. आनंदी असणे ही केवळ चांगली भावना नाही; तर, यामुळे मानसिक आरोग्यही सुधारते.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 03 सप्टेंबर : नकारात्मक किंवा वाईट प्रतिमा असलेली व्यक्ती एकाकी पडते, ज्यामुळे त्याचे मानसिक आरोग्य (Mental Health) बिघडते. आपण सहसा बोलतो की, सकारात्मक लोकांच्या जवळ असणे अधिक फायदेशीर आहे आणि नकारात्मक लोकांपासून दूर राहिले पाहिजे. अशी सकारात्मक किंवा नकारात्मक प्रतिमा आपलीही असू शकते. जर तुमची लोकांच्या नजरेतील प्रतिमा वाईट असेल तर ती सुधारली जाऊ शकते.

आपली प्रतिमा सुधारल्यामुळे आपल्याविषयीचे इतरांचे मत चांगले होईलच. शिवाय, यामुळे तुमच्या मानसिक आरोग्यालाही (Mental Health) फायदा होईल. कारण, नकारात्मक किंवा वाईट प्रतिमा असलेली व्यक्ती नेहमी दुःखी आणि तणावग्रस्त असते. यामुळे त्याचे मानसिक स्वास्थ्य बिघडू शकते. तर, आपली प्रतिमा कशी सुधारता येईल ते जाणून घेऊ.

1. सकारात्मक प्रतिमा असलेले लोक नेहमी आनंदी असतात. तुम्ही सुद्धा ही सवय तुमच्यात आणू शकता. आनंदी असणे ही केवळ चांगली भावना नाही; तर, यामुळे मानसिक आरोग्यही सुधारते.

2. परिस्थिती माणसाला तणावग्रस्त बनवते. यामुळे ती व्यक्ती रागात असते किंवा अनियंत्रित होते. हे नकारात्मक व्यक्तीचे लक्षण आहे. परिस्थिती कितीही भयंकर असली तरी शांत राहण्याचा प्रयत्न करा. हे आपल्याला अधिक चांगली पावले उचलण्यास सक्षम करेल.

हे वाचा - मोठी बातमी! बलाढ्य अमेरिकेलाही तालिबाननं झुकवलं? ‘या’ कामासाठी घ्यावी लागली तालिबान्यांचीच मदत

3. नकारात्मक व्यक्ती नेहमी केवळ स्वतःचाच विचार करते आणि स्वतःचीच काळजी घेते. इतरांचाही विचार करा. कारण, आपले सर्वांचेच सुख-दु:ख आणि वेदना एकमेकांच्या सुख-दुःखांशी आणि भावनांशी जोडलेले असतात. जर तुम्ही इतरांच्या दुःखात सहभागी झालात किंवा ते कमी केलेत तर, तुमची प्रतिमा खूप सुधारेल.

हे वाचा - बापरे.. क्षणार्धात कोसळली भिंत, तीन तरुण थोडक्यात वाचले; थरारक Video व्हायरल

4. तुमची प्रतिमा कधीही ‘फसवाफसवी करणारी व्यक्ती’ अशी असू नये. इतरांची फसवणूक करणे अत्यंत वाईट आहे. कारण, कोणत्याही व्यक्तीला त्याच्या अवतीभोवती फसवणूक करणारी किंवा लबाड व्यक्ती नको असते. म्हणूनच तुम्ही असे कोणतेही काम करू नये, ज्यामुळे कोणाचा विश्वास तुटेल. जर तुम्ही या टिप्स पाळल्या तर तुमची प्रतिमा नक्कीच सुधारेल.

टीप - येथे दिलेली माहिती वैद्यकीय सल्ल्याला कोणत्याही प्रकारे पर्याय नाही. ही केवळ जागरूकता करण्याच्या उद्देशाने दिली जात आहे.

First published:

Tags: Health, Health Tips, Mental health