व्यायाम करताय? ही काळजी नक्की घ्या

व्यायाम करताय? ही काळजी नक्की घ्या

व्यायाम करण्यासाठी आणि तुमची व्यायामाची क्षमता वाढवण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स

  • Share this:

09 जुलै : आजकालच्या या बदलत्या लाईफस्टाईलमध्ये शरीराला फिट ठेवणंही तितकच महत्त्वाचं आहे. पण आपल्या रोजच्या कामांमुळे आपल्या शरीराची काळजी घेण्यासाठी वेळच मिळत नाही आणि जरी मिळाला तरी आपल्या शरीराचं दुखणं आपल्याला साथ देत नाही.

जर तुम्हीही या समस्यांनी त्रासलेले आसाल, तर व्यायाम करण्यासाठी आणि तुमची व्यायामाची क्षमता वाढवण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स...

1) व्यायाम करताना शरीरावर जास्त जोर देऊ नये

व्यायामाच्या सुरवातीला शरीरावर जोर दिला तर त्याने शरीराला त्रास होऊ शकतो. त्यामुळे हळू-हळू तुमची व्यायामाची क्षमता वाढवा, त्याने सहनशक्ती वाढेल आणि शरीराच्या दुखण्यापासूनही वाचाल.

2) व्यायाम करण्याआधी वॉर्मअप करणं अतिशय महत्त्वाचं

व्यायामाआधी वॉर्मअप शरीरात उब निर्माण करते ज्याने शरीराची क्षमता वाढते. तुम्ही जर नियमित व्यायाम करत असालं तर व्यायामाआधी 10 मिनिटं व्यायाम करायला विसरू नका.

3) व्यायाम करताना योग्य कपडे घालणे

बऱ्याच वेळेस आपण कोणत्याही कपड्यावर व्यायाम करतो पण ते शरीराला त्रासदायक आहे. व्यायाम करताना आरामदायक कपडे आणि पायात बूट घालणं हे खुप महत्त्वाचं आहे.

4) व्यायाम करताना काही वेळ विश्रांती घेणं ही गरजेच आहे.

व्यायाम करताना थोडीशी विश्रांती घेतल्याने शरीरातील थकवा दूर होतो आणि त्याने आणखी व्यायाम करण्यास ऊर्जा मिळते.

5) पौष्टिक आहार करणे

शरीराची क्षमता वाढवण्यासाठी रोज योग्य प्रमाणात आपण पौष्टिक आहार करणं महत्त्वाचं आहे, आणि सगळ्यात आवश्यक म्हणजे तेलकट-तुपकट आणि जंक फूड खाणं शक्यतो  टाळा.

6) आपल्या रोजच्या व्यायामाच्या कामगिरीवर नजर असूद्या

रोज आपण किती व्यायाम करतो यावर नजर ठेवा. याने स्वतःला सुधारण्यास मदत होईल.

First published: July 9, 2017, 9:33 PM IST

ताज्या बातम्या