मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Under Eye Mask: डोळ्यांखालील सूज, काळी वर्तुळ होतील गायब; या 2 गोष्टींचा आहे खूप फायदा

Under Eye Mask: डोळ्यांखालील सूज, काळी वर्तुळ होतील गायब; या 2 गोष्टींचा आहे खूप फायदा

जर तुम्हालाही हा त्रास होत असेल तर, दही आणि हळद आय मास्क (Yogurt and Turmeric Eye Mask) लावा. त्याचा खूप फायदा होईल. विशेष म्हणजे हा मास्क (Face Mask) बनवण्यास फारसा कठीणही नाही आणि...

जर तुम्हालाही हा त्रास होत असेल तर, दही आणि हळद आय मास्क (Yogurt and Turmeric Eye Mask) लावा. त्याचा खूप फायदा होईल. विशेष म्हणजे हा मास्क (Face Mask) बनवण्यास फारसा कठीणही नाही आणि...

जर तुम्हालाही हा त्रास होत असेल तर, दही आणि हळद आय मास्क (Yogurt and Turmeric Eye Mask) लावा. त्याचा खूप फायदा होईल. विशेष म्हणजे हा मास्क (Face Mask) बनवण्यास फारसा कठीणही नाही आणि...

नवी दिल्ली, 06 नोव्हेंवर: तुमचे डोळे सुजलेले दिसत असतील आणि डोळ्यांभोवती काळी वर्तुळं झाली असतील तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. दीर्घकाळ काम केल्यामुळं डोळ्यांखाली सूज (Puffiness) येण्याची समस्या आजकाल मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. याशिवाय रात्री झोप न लागल्यानं डोळ्यांखालील नाजूक त्वचेवर थकव्याचा (Under Eye Mask) परिणाम स्पष्टपणे दिसून येतो.

जर तुम्हालाही हा त्रास होत असेल तर, दही आणि हळद आय मास्क (Yogurt and Turmeric Eye Mask) लावा. त्याचा खूप फायदा होईल. विशेष म्हणजे हा मास्क (Face Mask) बनवण्यास फारसा कठीणही नाही आणि त्याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.

काय आहेत या मास्कचे फायदे

- हळद त्वचेची जळजळ कमी करते

हळद ही त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. हळदीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. शिवाय, त्यात दाहविरोधी गुणधर्मदेखील असतात. ज्यामुळं त्वचेतील कोणत्याही प्रकारची जळजळ सहजपणे दूर होऊ शकते. यामुळे त्वचेची चमक वाढते आणि सूज कमी होते.

- दही मृत त्वचा काढून टाकते

त्वचा तज्ज्ञांच्या मते, दही त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये असलेलं लॅक्टिक अॅसिड त्वचेला एक्सफोलिएट करतं. हे त्वचेखालील नाजूक त्वचेला पोषण देऊन वरील त्वचेच्या मृत पेशी काढून टाकतं. त्यामुळं डोळ्यांच्या खालच्या त्वचेला ते खूप फायदेशीर ठरतं.

हे वाचा - दिवाळीनिमित्त आशिष शेलार मित्राला भेटण्यासाठी पोहोचले कृष्णकुंजवर, राज ठाकरेंना दिलं पुस्तक Gift

अशाप्रकारे तयार करा अंडर आय मास्क

सर्वप्रथम, एका भांड्यात एक चमचा दही आणि एक चमचा हळद घ्या.

आता या दोन्ही चांगलं फेटून घ्या.

आता पाण्यानं चेहरा धुवून कोरडा केल्यावर डोळ्यांखाली लावा.

10 ते 15 मिनिटे राहू द्या.

त्यानंतर कोमट पाण्यानं चेहरा स्वच्छ करा.

काही काळ डोळ्यांखाली पिवळसरपणा राहील, पण नंतर तो आपोआप निघून जाईल.

हे वाचा - पूर्ण झोप न घेणाऱ्यांमध्ये डिप्रेशनचं प्रमाण अधिक; महिलांवर होतोय सर्वाधिक परिणाम

कसा वापरायचा मास्क

तुम्ही आठवड्यातून तीन दिवस डोळ्यांखालील मास्क लावा.

रात्री झोपण्यापूर्वी हा मास्क डोळ्यांखाली लावणं आणि स्वच्छ केल्यानंतर झोपायला जाणं चांगलं.

तुमच्या डोळ्यांखालील चमक दोन आठवड्यांत परत आल्याचं तुम्हाला दिसेल.

यासोबतच चेहऱ्यावरील सूज दूर होण्यास मदत होईल.

जर तुमची त्वचा संवेदनशील असेल तर पॅच टेस्ट केल्यानंतरच हा मास्क वापरा.

First published:

Tags: Health, Health Tips