• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • Glowing skin tips : थंडीत चेहऱ्याला रात्रीच्यावेळी लावा या फक्त 4 गोष्टी; दिसेल जबरदस्त परिणाम

Glowing skin tips : थंडीत चेहऱ्याला रात्रीच्यावेळी लावा या फक्त 4 गोष्टी; दिसेल जबरदस्त परिणाम

सध्याच्या काळात वाढते प्रदूषण, जास्त घाम येणं, खराब आहार आणि शरीरातील पोषक तत्वांची कमतरता यामुळे लोकांना त्वचेच्या (skin problems) अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत.

 • Share this:
  नवी दिल्ली, 09 नोव्हेंबर : जर तुम्हाला हिवाळ्यात सुंदर, चमकणारा चेहरा हवा असेल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. सध्याच्या काळात वाढते प्रदूषण, जास्त घाम येणं, खराब आहार आणि शरीरातील पोषक तत्वांची कमतरता यामुळे लोकांना त्वचेच्या (skin problems) अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत, बहुतेक चेहऱ्याच्या त्वचेच्या समस्या म्हणजे मुरुम, डाग, सुरकुत्या आणि फ्रिकल्स असतात. सर्वसाधारणपणे यामुळे चेहरा डल दिसू (Glowing skin tips) लागतो. त्वचा रोग तज्ज्ञांच्या मते, चेहऱ्याच्या त्वचेची काहीशी देखभाल केल्यास या समस्यांपासून सुटका मिळू शकते. रात्रीच्या वेळी काही घरगुती फेस पॅक (Face Pack) लावून तुम्ही तुमची सुंदर आणि चमकदार त्वचा परत मिळवू शकता. जाणून घेऊया काही उपयुक्त फेसपॅकबद्दल. चेहऱ्याचे सौंदर्य वाढवणारे फेस पॅक 1. कोरफड आणि ग्लिसरीन हा फेस मास्क बनवण्यासाठी एलोवेरा जेलमध्ये ग्लिसरीन मिसळा. नंतर चेहऱ्यावर लावा. आता 20 मिनिटे सुकल्यानंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा. कोरफडीमध्ये असलेले एलोइन घटक नॉनटॉक्सिक हायपरपिग्मेंटेशन काढून टाकण्यास मदत करतात, ज्यामुळे त्वचा चमकदार होते. बदामाचा फेस पॅक यासाठी 4-5 बदाम रात्री दुधात भिजवून ठेवावेत. सकाळी बदाम सोलून त्याची पेस्ट चेहऱ्यावर लावा. रात्रीच्या वेळी तुम्ही या फेस पॅकचा पातळ थर चेहऱ्यावर लावू शकता. त्यानंतर सकाळी उठून चेहरा धुवा. बदामामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट त्वचेतील विषारी घटक काढून टाकतात आणि त्वचा चमकदार होते. हे वाचा - माझा होशील ना मालिकेतील अभिनेत्रीला मंदिर प्रवेश नाकारला ; Video पोस्ट करत सांगितलं कारण 3. ओट्स आणि मध ओट्स आणि मध मिक्स करा आणि काही वेळ तसेच राहू द्या. त्यानंतर रात्री झोपण्यापूर्वी ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. रात्रभर असेच राहू द्या, सकाळी उठून ताज्या पाण्याने चेहरा धुवा. हा फेस मास्क त्वचेतील आर्द्रता टिकवून ठेवतो तसेच त्वचेला नुकसान होण्यापासून वाचवतो. हे वाचा - महिला आयोगाच्या मेसेजमुळे SEX रॅकेट उघडकीस! स्पा सेंटरमधून समोर आली 150 हून अधिक कॉल गर्ल्सची रेट लिस्ट 4. टोमॅटो आणि लिंबू हा फेस मास्क बनवण्यासाठी टोमॅटो बारीक करा. आता त्यात दोन चमचे लिंबाचा रस घाला. आता ही पेस्ट चेहरा आणि मानेवर लावा. 20 मिनिटे वाळल्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा. लिंबू टॅनिंग दूर करून त्वचा उजळतो. चांगला परिणाम मिळविण्यासाठी तुम्ही हा फेस मास्क आठवड्यातून तीनदा वापरू शकता. (या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यजू 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
  Published by:News18 Desk
  First published: