नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर : हिवाळ्याच्या आगमनाने लोकांची जीवनशैली पूर्णपणे बदलते. कडाक्याच्या थंडीपासून शरीराचे रक्षण करण्यासाठी लोक लोकरीचे कपडे वापरतात. थंडीमुळे आपल्या आहारातही बदल करावा लागतो. हिवाळ्यात आढळणाऱ्या काही खास गोष्टी कडाक्याच्या थंडीपासून आपले संरक्षण करतात. या गोष्टींमुळे केवळ तुमचे शरीर उबदार राहते, असे नाही तर आरोग्यासाठी आवश्यक पोषक तत्त्वेही मिळतील. सुपरफूड मानल्या जाणाऱ्या या काही गोष्टी खाल्ल्याने हिवाळ्यात आजारी पडण्याची शक्यताही (Winter Superfoods) कमी असते.
रताळे - रताळे हिवाळ्यात खाणं खूप फायदेशीर ठरतं. त्यात असलेल्या कॅलरीज आणि उच्च पोषक तत्वांमुळे शरीराला प्रचंड ऊर्जा मिळते. रताळे फायबर, व्हिटॅमिन ए आणि पोटॅशियमचा चांगला स्रोत मानला जातो. याच्या नियमित सेवनाने बद्धकोष्ठता, रोगप्रतिकारशक्ती आणि जळजळ यांसारख्या समस्या दूर होतात.
शलजम आणि त्याची पाने - स्टार्च या घटकाने समृद्ध असलेल्या शलजममध्ये आढळणारे एक अँटिऑक्सिडेंट जे कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा धोकाही कमी करते. हे व्हिटॅमिन-के आणि व्हिटॅमिन-ए चाही चांगला स्रोत आहे. तज्ज्ञ म्हणतात की, सलगमची पाने आपल्या एकूणच हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्यासाठी चांगली असतात. त्यामुळे हाडे मजबूत होतात आणि पचनक्रिया सुधारते.
बाजरी- बाजरीमध्ये उत्तम चरबी, प्रथिने आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. यामध्ये जास्त प्रमाणात आयर्न असल्यामुळे अॅनिमियामध्ये खूप फायदा होतो. याचे नियमित सेवन हाडे मजबूत करण्याचे काम करते. बाजरीचे लाडू किंवा बाजरीची रोटी बनवून तुम्ही याचे सेवन करू शकता.
खजूर - हिवाळ्यात मिळणारे खजूर हे कमी चरबीयुक्त अन्न आहे. यामुळे वजनही वाढत नाही. पोषक घटकांचे पॉवर हाऊस असलेले खजूर जिमला जाणाऱ्यांसाठी एक उत्तम आहार आहे. रोजच्या आहारात हे खाल्ल्याने हिवाळ्यात शरीर उबदार राहते.
हे वाचा - वारंवार डिवचत होता व्यक्ती; सापानं अचानक केला हल्ला अन्…; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO
बदाम-अक्रोड- बदाम आणि अक्रोडाचा संतुलित आहार आपली मज्जासंस्था सक्रिय ठेवते. इन्सुलिन प्रक्रिया सुधारते आणि हृदयाचे आरोग्य देखील सुधारते. अक्रोडमध्ये असलेले ओमेगा-३ फॅटी अॅसिडचे प्रमाण आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यासाठी जर्दाळूचेही सेवन करू शकता.
नाचणी- हिवाळ्यात नाचणीमुळे आपल्या आरोग्यालाही खूप फायदा होतो. जर तुम्ही शाकाहारी आहार घेत असाल तर शरीरात कॅल्शियमचा पुरवठा करण्यासाठी तुम्ही नाचणीची निवड करू शकता. याशिवाय नाचणी केवळ मधुमेहावर नियंत्रण ठेवत नाही तर अॅनिमियामध्येही आराम देते. हे निद्रानाश, चिंता आणि नैराश्यामध्ये देखील खूप प्रभावी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Superfood, Winter session