ऋतू कोणताही असो तुम्हालाही पांघरुणाशिवाय झोप येत नाही का? समजून घ्या यामागील कारण

ऋतू कोणताही असो तुम्हालाही पांघरुणाशिवाय झोप येत नाही का? समजून घ्या यामागील कारण

अनेकांना पांघरुणाशिवाय झोपण्याची कल्पनाही सहन होत नाही.

  • Last Updated: Aug 11, 2020 11:26 PM IST
  • Share this:

प्रत्येकाच्या झोपण्याच्या सवयी वेगवेगळ्या असतात. काही लोकांना झोपण्यापूर्वी अंघोळ करायला आवडतं, तर काहींना विशिष्ट पद्धतीने झोपायला आवडतं. एक गोष्ट जी बहुतांश लोकांमध्ये दिसते ती म्हणजे त्यांना रात्री झोपताना पांघरुण लागतं. वातावरण कसंही असो त्यांना पांघरुणाशिवाय झोपण्याची कल्पनाच सहन होत नाही. या मानसिकतेमागेही कारण दडलेलं आहे.

जेव्हा व्यक्ती झोपते तेव्हा तिचे तापमान कमी होते आणि पहाटे 4 वाजता हे तापमान सगळ्यात कमी झालेलं असतं. ही प्रकिया झोपण्याच्या एक तास अगोदर सुरू होते आणि शरीर तापमान नियंत्रित ठेवण्याची क्षमता गमावते, जेव्हा व्यक्ती व्यक्ती रॅपिड आय मुव्हमेंट (आरईएम) स्लीप साइकलपर्यंत पोहोचते. तेव्हा पांघरूण त्या व्यक्तीचे शरीर संपूर्ण रात्री गरम ठेवण्यात मदत करते आणि थंडीने अंग कापण्यापासून वाचवते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःला पांघरुणात झाकून घेणं हे सर्किडियन लयीचा महत्त्वपूर्ण हिस्सा आहे.

myupchar.com च्या डॉ. मेधावी अग्रवाल म्हणाल्या, सर्किडियन लय हे 24 तासांचे चक्र आहे, ज्यात जैव रासायनिक, शारीरिक आणि व्यावहारिक क्रियांना नियंत्रित करून झोपेच्या चक्रावर प्रभाव पडतो. म्हणजेच ते शरीर केव्हा झोपण्यासाठी तयार आहे आणि केव्हा जागे राहील हे ठरवण्यात मदत करते. ही सवय जन्मापासून लागते आणि मोठे झाल्यावरही तशीच राहते.

हे वाचा  - तुमची झोप नाही पूर्ण; वेळीच ओळखा अपुऱ्या झोपेची लक्षणं

2015 साली जर्नल ऑफ स्लीप मेडिसीन अँड डिसऑर्डरमध्ये प्रकाशित अभ्यासात असं दिसून आलं की, वजनदार पांघरून घेऊन झोपल्यानं चांगली झोप लागते. 2020 मध्ये अमेरिकन जर्नल ऑफ ऑक्युपेशनल थेरेपीमध्ये प्रकाशित अभ्यासात असे दिसून आले की, वजनदार पांघरूण चिंता आणि अनिद्रा यापासून पीडित लोकांना शांत झोप लागण्यास मदत करू शकतं.

myupchar.com चे एम्सशी संबंधित डॉ. नबी वली म्हणाले, निद्रानाशाचा त्रास असणाऱ्यांना झोप येणं आणि झोपून राहणं कठीण जातं. निद्रानाश दिवसा झोप येणं, सुस्ती येणं, मानसिक आणि शारीरिकरित्या आजारी होणं याचं कारण बनतं.

हे वाचा  - पावसाळ्यात अजिबात खाऊ नका कच्चं सलाड; बळावतील गंभीर समस्या

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पांघरुणात मिळणारी ऊब आणि आराम आपल्याला रात्री सुरक्षितता देते. अंधाराविषयी एक भीती सगळ्यांच्या मनात असते आणि या भीतीपासून वाचण्यासाठी पांघरुण घेतलं जातं. फक्त आपण घेत असलेलो पांघरुण अशा कापडाचं असावं ज्यानं श्वास सहजपणे घेता येईल आणि घाम किंवा आर्द्रतेचा त्रास होणार नाही. ते रात्री आरामदायक वाटेल इतकं मुलायम असावं.

अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख - निद्रानाश

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: August 11, 2020, 11:26 PM IST

ताज्या बातम्या