आयुर्वेदिक उपचारांनीही कोरोनावर करता येऊ शकते मात; शास्त्रज्ञांनी शोधून काढले नैसर्गिक घटक

आयुर्वेदिक उपचारांनीही कोरोनावर करता येऊ शकते मात; शास्त्रज्ञांनी शोधून काढले नैसर्गिक घटक

अभ्यासानुसार काही नैसर्गिक आणि आणि वनौषधी संयुगं SARS-CoV-2 वर उपचार करण्यास परिणामकारक आहेत.

  • Last Updated: Nov 25, 2020 02:48 PM IST
  • Share this:

जेव्हापासून कोविड 19  (covid 19) च्या महासाथीचा प्रसार सुरू झाला आहे तेव्हापासून जगभरात या आजारावर सर्वोत्तम औषधोउपचार शोधण्यासाठी अथक प्रयत्न सुरू आहेत. सध्या अनेक कोरोना लशींच्या (corona vaccine) चाचण्या यशस्वी होण्याच्या अंतिम टप्प्यात आलेल्या असल्या तरी या आजारावर परिणामकारक उपचार मिळणं या घडीला आवश्यक आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.

फ्रंटटियर ऑफ फार्माकॉलोजी या जर्नलमध्ये नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या एका नव्या अभ्यासानुसार परिणामकारक उपचार प्रणाली मिळवण्यासाठी जर काही नैसर्गिक आणि वनौषधी संयुगांचा उपयोग सार्स-कोव्ह-2 (SARS-CoV-2) या विषाणूला प्रतिबंध करण्यास करायला हवा. जर ही संयुगं या विषाणूचा प्रतिबंध परिणामकारकपणे करू शकली तर आपल्याला कोव्हिड 19 या आजारावर उपचार कण्यासाठी एक नवीन उपचार प्रणाली प्राप्त होईल.

कोविड 19 च्या उपचाराची नैसर्गिक पद्धत

चीन आणि अमेरिकेत केलेल्या अभ्यासात या संशोधकांनी असं म्हटलं आहे की, नैसर्गिक आणि वनौषधीच्या संयुगांमध्ये इतर औषधांपेक्षा कमी प्रमाणात विषद्रव्यं असतात आणि याच कारणासाठी जगभरात त्यांचं सेवन व्यापक प्रमाणात केलं जातं. नैसर्गिक संयुगामध्ये प्रतिबंधात्मक गुणधर्म असल्यानं त्याने कोव्हिड 19 बाधित रुग्णांचं श्वसन तर सहज होतंच पण त्यांच्यात अक्युट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम होण्यास प्रतिबंध होतो.

हे वाचा - आता AYURVEDIC OPERATION ही करता येणार; कशी होणार शस्त्रक्रिया वाचा

भारताच्या आयुष मंत्रालयानंदेखील एक ऑक्टोबर 2020 मध्येच आयुर्वेदिक उपचार प्रणाली जाहीर केली आहे, ज्यात नैसर्गिक संयुगं असलेल्या आणि विषाणूविरोधी गुणधर्म असलेल्या अश्वगंधा, मुलेठी, च्यवनप्राश इत्यादींचा समावेश करण्यात आला आहे. अनेक अभ्यासांतून असंही दिसून आलं आहे की पारंपारिक चिनी औषधांमध्ये वापरला जाणारी पानं आणि मुळांमधील अश्वगंधा आणि जरदाळू हे फ्लेवोनोईड यांनी समृद्ध असतं. त्यानं फुफ्फुसाला हानी पोहोचवणाऱ्या आजारांशी लढा देता येतो.

कुठली नैसर्गिक संयुगं उपयुक्त आहेत

या नव्या अभ्यासात वर उल्लेख करण्यात आलेल्या नैसर्गिक संयुगावर ध्यान केंद्रीत करण्यात आलं आणि असं सुचवण्यात आलं की या औषधांचा उपयोग आधीपासूनच मोठ्या प्रमाणावर पारंपारिक उपचार करताना केला जातो आहे आणि ते बाजारात विक्रीसाठी सहजतेनं उपलब्धही आहेत. या अभ्यासात असं सूचित करण्यात आलं आहे की या पदार्थांमधील संयुगांमध्ये कोव्हिड 19 च्या वाढत्या प्रादुर्भावाची गती कमी करण्याची क्षमता आहे. त्याने रुग्णांना रुग्णालयात कमी वेळ राहावं लागेल, तसंच सौम्य लक्षणं असणाऱ्या रुग्णांना सहजपणे हाताळता येईल.

हे वाचा - कोरोना विषाणूचे Super Spreaders सापडले! चोंदलेलं नाक आणि दातांशी आहे संबं

या अभ्यासानुसार पुढील नैसर्गिक आणि आणि वनौषधी संयुगं SARS-CoV-2 वर उपचार करण्यास परिणामकारक आहेत.

1) अशा वनस्पती ज्यात एस्ट्रोजेन किंवा फायटोएस्ट्रोजेन आहेत. हे हळद, ज्येष्ठमध, अल्फालफा, हॉप्स या वनस्पतींमध्ये आढळतं. त्याने सार्स कोव्ह 2 च्या काटेरी प्रोटीनला लक्ष्य करून मानवी पेशीशी जोडले जाण्यापासून थांबवता येऊ शकतं.

2) अश्वगंधाची पानं ट्रान्समेम्ब्रेन प्रोटीस सेरीन 2 या द्रव्याच्या निर्मितीस प्रतिबंध करू शकतं. त्यानं शरीरातील स्वस्थ्य पेशीमध्ये विषाणूचा प्रवेश होण्यास पायबंद बसेल.

3) आलं आणि गलंगल यात असलेली काही संयुगं शरीरातील पेपेनसारख्या प्रोटेससोबत जोडले जातात आणि सार्स कोव्ह 2 च्या प्रोटीनला तोडण्यात मदत होते.

4) क्वेरसेटीन आणि गेलिक अॅसिड हृी फायटोकेमिकल संयुगं आहेत. ती द्राक्ष, स्ट्रॉबेरी, चेरी, ब्रोकोली या सारख्या फळ आणि भाज्यांमध्ये आढळून येतात. या संयुगांनी आर एन ए याववर अवलंबून असलेल्या आर एन ए पॉलीमर्स या स्त्रावास प्रतिबंधित करता येतं. त्यामुळे कोरोना विषाणूचा शरीरातील प्रसारास थांबवता येतो.

एकीकडे या अभ्यासात वरील वनौषधीवर संशोधन करण्यात आलं. तर इतर अनेक अभ्यासात दुसऱ्या नैसर्गिक उत्पादनाचा कोव्हिड 19 च्या प्रादुर्भावावर आणि आजारावर कसा परिणाम होतो याचा अभ्यास केला जात आहे.

अधिक माहितीसाठी वाचा आमचा लेख - ताप

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: November 25, 2020, 2:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading