• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • अनोखं Drink! विमानात बनतं अधिकच चविष्ट, मिळतो ‘ढगात’ असल्याचा अनुभव

अनोखं Drink! विमानात बनतं अधिकच चविष्ट, मिळतो ‘ढगात’ असल्याचा अनुभव

जगात असं एक ड्रिंक प्रसिद्ध आहे जे केवळ विमानात (Some drinks become more tasty in air due to scientific reasons) पिणंच अनेकजण पसंत करतात.

 • Share this:
  जगात असं एक ड्रिंक प्रसिद्ध आहे जे केवळ विमानात (Some drinks become more tasty in air due to scientific reasons) पिणंच अनेकजण पसंत करतात. काही पेयं ही घरी पिण्यासाठी असतात, काही रेस्टॉरंट्समध्ये, काही बारमध्ये तर काही पेयं (Drinks and venues to drink those) ही खास विमानात पिण्यासाठी तयार होत असतात. अर्थात, कुठलंही पेय कुठेही उपलब्ध होत असलं, तरी चोखंदळ मंडळींना मात्र (Favorite drinks) स्थळकाळानुसार त्यांचं ड्रिंक निवडणं आवडतं. असंच एक ड्रिंक सध्या चर्चेत आहे, जे केवळ विमानात बसून प्यायला सर्वाधिक मजा येते. ब्लडी मेरी मेड अल्कोहोल पिणाऱ्यांना ते पिण्याचा कुठला ना कुठला बहणा हवाच असतो. ज्या ज्या ड्रिंकमध्ये अल्कोहोल असेल, ती ड्रिंक्स पिणं अनेकजण पसंत करतात. विशेषतः विमानानं नियमित प्रवास करणाऱ्यांमध्ये ब्लडी मेरी मेड हे पेय प्रसिद्ध आहे. टोमॅटोचा रस आणि व्होडका यांच्या मिश्रणातून तयार झालेलं हे ड्रिंक अनेकजणांच्या आवडीचं आहे. टोमॅटो आणि व्होडका हे पदार्थ तर या ड्रिंकमध्ये वापरले जातातच, मात्र त्याचं वेगळेपण ठरतं त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या स्पाईसेसवरून. कुठला शेफ कुठले स्पाईसेस वापरून हे ड्रिंक तयार करतो, त्यावर त्याची चव अवलंबून असते. पोट भरून ड्रिंक यात टोमॅटोचा मुबलक वापर करण्यात आला असल्यामुळे अनेक विमान प्रवासी अगदी पोट भरेपर्यंत या ड्रिंकचं सेवन करतात. हे ड्रिंक घेतल्यानंतर इतर काही खाण्याची गरजच पडत नसल्याचं प्रवासी सांगतात. हे वाचा- Car Loan घेताना या गोष्टी लक्षात ठेवा, नक्कीच फायदा होईल विमानात लागते वेगळ चव हे पेय विमानात अधिक टेस्टी लागत असल्याचं प्रवासी सांगतात. यामागे एक शास्त्रीय कारण असल्याचं सांगितलं जातं. विमानातील हवा कोरडी असते. या हवेत गोड आणि खारट या चवी ओळखण्याची क्षमता कमी झालेली असते. 2010 साली जर्मनीत झालेल्या एका संशोधनातून ही बाब समोर आली होती. त्यामुळे हे पेय जमिनीवर असताना अनेकांना आवडत नाही. मात्र खारट आणि तिखट चवीचं हे पेय आकाशात मात्र चविष्ट वाटतं.
  Published by:desk news
  First published: