फक्त हवा खाऊन भरू शकेल पोट, एक किलोची किंमत 390 रुपये!

फक्त हवा खाऊन भरू शकेल पोट, एक किलोची किंमत 390 रुपये!

वेळेवर जेवण मिळालं नाही तर मी काय हवा खाऊन जगू का? असं आपण मजेने विचारतो पण युरोपमधल्या एका संशोधनात खरंच असं खाद्य तयार होतंय.

  • Share this:

मुंबई, 10 फेब्रुवारी : वेळेवर जेवण मिळालं नाही तर मी काय हवा खाऊन जगू का? असं आपण मजेने विचारतो पण युरोपमधल्या एका संशोधनात खरंच असं खाद्य तयार होतंय.

युरोपमधल्या फिनलंडमधली सोलर फूड नावाची कंपनी हवेतून अन्न बनवण्यावर संशोधन करतेय. हवेतला कार्बन डाय ऑक्साइड, पाणी आणि सौरऊर्जेचा वापर करून हे अन्न तयार केलं जाईल.

हवा, पाणी आणि सौरऊर्जा वापरून तयार सोलेन (solein)नावाची प्रोटीन पावडर तयार होते. वैज्ञानिकांच्या मते, हे अन्न शाकाहारातून मिळणाऱ्या प्रोटीनपेक्षा दहापट आणि मांसाहारातून मिळणाऱ्या प्रोटीनपेक्षा 70 पटीने फायदेशीर आहे. त्यामुळे हे खाद्य पर्यायी खाद्य होऊ शकतं.

(हेही वाचा : तुमच्या पार्टनरसाठी तुम्ही आहात सर्वात स्पेशल, कसं ओळखाल त्याच्या मनातलं?)

असं बनतं हे खाद्य

हवेतून कार्बन डायऑकक्साइड कॅप्चर करून कार्बन डायऑक्साइड वेगळा काढला जाईल. यामध्ये पाणी, व्हिटॅमिन आणि पोषक मूल्यं मिसळली जातील. दुसऱ्या कुठल्याही प्रोटीनसारखंच हे प्रोटीनही स्वादरहित आणि गंधरहित असेल.

(हेही वाचा : शशी थरुर यांच्या गळ्यात ही डिक्शनरी आहे की कुठलं यंत्र? Twitter वर जोरदार चर्चा)

'नासा' ची संकल्पना

सोलेन फूड ही 'नासा'ची संकल्पना आहे. अशा प्रकारचं खाद्य अंतराळवीरांसाठी विशेष उपयोगी ठरू शकतं. Solar Foods ही कंपनी यासाठी 2021 पर्यंत कमर्शिअल लासनन्स मिळवण्याचा प्रयत्न करतेय. त्यानंतर ते सगळ्यांसाठी उपलब्ध करून दिलं जाईल. त्याची किंमत प्रतिकिलो 390 रुपये असेल. फिनलंडच्या कंपनीने बनवलेलं हे खाद्य भारतात यायला थोडा अवधी लागेल पण अंतराळवीरांप्रमाणेच खेळाडू, गिर्यारोहक यांच्यासाठीही हे खाद्य फायदेशीर ठरणार आहे.

(हेही वाचा : भारताने करून दाखवलं! ‘कोरोना’ग्रस्त पहिल्या 2 रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा)

=========================================================================================

First published: February 10, 2020, 8:46 PM IST

ताज्या बातम्या