बगदाद, 29 नोव्हेंबर : कित्येक पती (Husband) आपली एका बायकोलाच (Wife) वैतागलेले असतात. अशात एका व्यक्तीच्या तीन तीन बायका असतील तर त्याची काय अवस्था होत असेल जरा विचार करा (Husband wife). अशाच तीन बायकांच्या तक्रारीला वैतागलेल्या एका पतीने सरकारी नोकरीचाही (Government Jobs) राजीनामा दिला. आपल्या पत्नीची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याने नोकरी (Jobs) सोडण्याचा निर्णय घेतला (Husband resigned from government job for 3 wives). पण त्याच वेळी त्याच्या बॉसने त्याचा राजीनामा न स्वीकारता तिन्ही बायकांना खूश ठेवण्याची जबरदस्त आयडिया दिली
इराकमधील एका सैनिकाने आपल्या पत्नीसाठी आपल्या सरकारी नोकरीचा राजीनामा दिला. आपला राजीनामा त्याने आपल्या कमांडरकडे सुपूर्द केला. राजीनामा देण्याचं सैनिकाचं कारण ऐकून कमांडर हैराण झाले. आपण आपल्या तिन्ही बायकांच्या तक्रारीच्या कटकटीला वैतागून नोकरी सोडत असल्याचं त्याने सांगितलं.
हे वाचा - अरे! हे काय? बॉससोबत Zoom meeting दरम्यान 'ते' दृश्य पाहून महिलेला वाटली लाज
गल्फ न्यूजच्या रिपोर्टनुसार सैनिक आपल्या तीन बायकांच्या तक्रारीला कंटाळला होता. आपला पती आपल्याला पुरेसा वेळ देत नाही. त्याला खूप कमी सुट्ट्या मिळतात. सुट्ट्यांमध्ये तो घरी आल्यावर झोपण्यात आणि इतर कामं पूर्ण करण्यातच वेळ घालवतो. आपल्या पतीसोबत त्या जास्त दिवस राहू शकत नाही, अशी तक्रार त्यांची होती.
एका सैनिकाचं राजीनामा देण्याचं है कारण समजताच कमांडरलाही धक्का बसला. त्याने त्याचा राजीनामा स्वीकारला नाही. पण त्याने त्यावर वेगळा मार्ग त्याला दिला. त्याच्या तिन्ही पत्नींना खूश कऱण्यासाठी सुट्ट्या दिल्या. त्याला तब्बल 12 दिवसांची सुट्टी देण्यात आली आणि प्रत्येक पत्नीसोबत चार दिवस राहून तिला खूश ठेवण्याचा सल्ला देण्यात आला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Relationship, Wife and husband