नवी दिल्ली, 10 जून: 2021 या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण (Solar Eclipse) आज, 10 जून रोजी होत आहे. हिंदू पंचागानुसार यंदा सूर्यग्रहण ज्येष्ठ अमावस्येका होत आहे. पंचांगानुसार ज्येष्ठ अमावस्या महत्त्वाची असून, या दिवशी शनी जयंती आणि वटसावित्री व्रतही साजरं केलं जातं. त्यामुळं हे सूर्यग्रहण महत्त्वाचं आहे. मात्र भारतातून (India) हे सूर्यग्रहण दिसणार नाही. त्यामुळं ग्रहणाचा वेध काळ लागू होणार नाही. त्यामुळं शुभ कार्य, धार्मिक कार्यांवर काही बंधनं नाहीत.
टाईम्स नाउ हिंदी डॉट कॉमनं दिलेल्या वृत्तानुसार, आपल्या देशात ग्रहणकाळात काही रिती प्राचीनकाळापासून पाळल्या जात आहेत. या काळात सर्वानी शक्यतो घरी रहावे. ग्रहण लागत असण्याच्या काळात कापणे, चिरणे, तळणे अशी कामं करू नयेत. जेवण करू नये अशा अनेक प्रथा पूर्वापार चालत आल्या आहेत. सूर्यग्रहणाच्या काळात गर्भवती महिलांना (Pregnant Woman) अधिक काळजी घेण्यास सांगितलं जातं. त्यांनी काय करावं, काय करू नये याचे काही नियम पूर्वापार चालत आलेले आहेत. या काळात आई आणि बाळाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, असं मानलं जातं. विज्ञानानं ही एक खगोल शास्त्रीय घटना असल्याचं सिद्ध केलं असलं तरीही आजही कमी अधिक प्रमाणात अशा काही प्रथांचं पालन केलं जातं.
हेही वाचा- सूर्य ग्रहण 2021: सूर्यग्रहणाबाबत पाळले जातात हे नियम
गर्भवती महिलांसाठी सूर्यग्रहणाच्या काळातील काही नियम असे आहेत :
नुसत्या डोळ्यांनी सूर्यग्रहण बघू नये :
ग्रहण काळात गर्भवती महिलांनी सूर्याकडे पाहू नये. थेट सूर्याकडे नुसत्या डोळ्यांनी (Naked Eyes) पाहिल्यास त्याच्या किरणांचा डोळ्यांना त्रास होऊ शकतो. स्त्रियांच्या आरोग्यावर आणि गर्भधारणेवरही त्याचा वाईट परिणाम होतो, असं मानलं जातं.
घरातून बाहेर पडू नये :
ग्रहण काळात कोणीही बाहेर जाऊ नये. विशेषतः गर्भवती महिलांनी तर अजिबात घराबाहेर पडू नये. बाहेरील वातावरणाचा, सूर्य किरणांचा गर्भवती महिलेच्या आणि गर्भातल्या बाळाच्या त्वचेवर वाईट परिणाम होऊ शकतो. गर्भावर सूर्यग्रहणाची सावली पडू देऊ नये.
धारदार वस्तूंपासून दूर राहावे :
हिंदू मान्यतेनुसार, गर्भवती महिलांनी ग्रहण कालावधीत धारदार वस्तूंचा जसं सुरी, कात्री, पिन इत्यादीचा वापर करू नये. यामुळं बाळाला इजा होऊ शकते.
ग्रहण काळात खाऊ नये :
ग्रहण काळात गर्भवती महिलांनी अन्नपदार्थांचे सेवन न करता फलाहार करावा असा सल्ला दिला जातो.
गर्भवती महिलांनी झोपू नये :
गर्भवती महिलांनी सूर्यग्रहणादरम्यान झोपू नये. गवतावर बसावे. तसंच सूर्यग्रहणापूर्वी आणि नंतर स्नान करावे.
(Disclaimer: या लेखामधील तपशील आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. News18lokmat.com त्याची पुष्टी करत नाही. याला शास्त्रीय आधार नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Eclipse, Pregnant, Pregnant woman