मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Solar Eclipse 2020: अंतिम सूर्यग्रहणाचं सूतक लागणार नाही पण या गोष्टींची काळजी घ्या

Solar Eclipse 2020: अंतिम सूर्यग्रहणाचं सूतक लागणार नाही पण या गोष्टींची काळजी घ्या

 यंदाच्या या वर्षाअखेरच्या ग्रहणाचं सूतक जरी भारतीयांना लागणार नसलं तरी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे.

यंदाच्या या वर्षाअखेरच्या ग्रहणाचं सूतक जरी भारतीयांना लागणार नसलं तरी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे.

यंदाच्या या वर्षाअखेरच्या ग्रहणाचं सूतक जरी भारतीयांना लागणार नसलं तरी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे.

    पटणा, 14 डिसेंबर : 2020 या वर्षातलं आज शेवटचं सूर्यग्रहण होणार आहे. येणाऱ्या म्हणजेच 2021मध्ये दोन सूर्यग्रहण पाहता येणार आहेत. सूर्यग्रहणाबाबत अनेक समज गैरसमज आणि असतात. जरी भारतात हे सूर्यग्रहण दिसणार नसलं तरी देखील त्याचा प्रभाव पडण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जात आहे. हे सूर्यग्रहण नागरिकांना सूर्यग्रहण दक्षिण अमेरिकेत चिली आणि अर्जेंटिनाच्या काही भागांतून पाहाता येऊ शकतं. प्रत्येक ग्रहणासाठी सूतक काळ असतो. यंदाच्या या वर्षाअखेरच्या ग्रहणाचं सूतक जरी भारतीयांना लागणार नसलं तरी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे उघड्या डोळ्यांनी सूर्यग्रहण पाहू नये. त्यामुळे डोळ्याचे विकार होण्याची शक्यता असते. सूर्यग्रहण जरी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता होणार असलं तरी भारतात 12 तासांसाठी सूतक पाळण्याची परंपरा आहे. जे ग्रहणाला आणि त्याच्या होणाऱ्या परिणामांवर विश्वास ठेवातत असे लोक 12 तासांसाठी सूतक पाळतात. अशा नागरिकांच्या घरी सूतक काळ सुरू होण्याआधी जेवणं तयार करून जेवलं जातं. याशिवाय सूतक काळात पाणी आणि अन्न दूषित होऊ नये म्हणून तुळशीची पान टाकण्याचे परंपरा आहे. हे वाचा-वर्षातलं शेवटचं सूर्यग्रहण आज, किती वाजता आणि कुठे पाहता येणार जाणून घ्या यंदा हे ग्रहण भारतात दिसणार नसल्यानं नागरिकांना देखील सूतक काळ पाळावा लागणार नाही. वर्षाचे शेवटचे सूर्यग्रहण दक्षिण अमेरिका, दक्षिण आफ्रिका, अटलांटिक महासागर आणि पॅसिफिक महासागराच्या काही भागांत दिसून येईल. हे ग्रहण 5.30 तास असणार आहे. बिहारसह भारतामध्ये सावली असेल. हे सूर्यग्रहण भारतीय वेळेनुसार सोमवारी संध्याकाळी 7:03 वाजता सुरू होईल आणि रात्री 12: 23 वाजता संपेल. सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहिलं तर डोळ्यांना त्रास होऊ शकतो. सूर्यातून येणाऱ्या प्रखर किरणांमुळे डोळ्याचे विकार होऊ शकतात. म्हणून ग्रहण पाहण्यासाठी विशिष्ट्य चष्म्याचा वापर करावा. सूर्यग्रहण पाहण्याचा आणि त्याच्या प्रकाशात राहिल्यास त्याचा परिणाम संपूर्ण शरीराच्या आरोग्यावरही होतो असंही काही जुन्या जाणकारांचं मत आहे. (सूचना- हा लेख सामान्य ज्ञानावर आधारीत आहे News 18 लोकमत याची कोणतीही पुष्टी करत नाही)
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    पुढील बातम्या