मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Solar Eclipse 2020: वर्षातलं शेवटचं सूर्यग्रहण आज, जाणून घ्या महत्त्व आणि पौराणिक कथा

Solar Eclipse 2020: वर्षातलं शेवटचं सूर्यग्रहण आज, जाणून घ्या महत्त्व आणि पौराणिक कथा

वर्षातील सर्वात शेवटचं सूर्यग्रहण आहे. 2020 मधील हे ग्रहण सर्वात शेवटचं असल्यांच सांगितलं जात आहे.

वर्षातील सर्वात शेवटचं सूर्यग्रहण आहे. 2020 मधील हे ग्रहण सर्वात शेवटचं असल्यांच सांगितलं जात आहे.

वर्षातील सर्वात शेवटचं सूर्यग्रहण आहे. 2020 मधील हे ग्रहण सर्वात शेवटचं असल्यांच सांगितलं जात आहे.

    मुंबई, 14 डिसेंबर : वर्षातील सर्वात शेवटचं सूर्यग्रहण आहे. 2020 मधील हे ग्रहण सर्वात शेवटचं असल्यांच सांगितलं जात आहे. लग्न राशी वृश्चिक आणि मिथुन राशीवर देखील या ग्रहणाचा परिणाम होणार आहे. भारतातून हे ग्रहण दिसणार नाही त्यामुळे याचा थेट कोणताही परिणाम होणार नाही. आपण वर्षाच्या सर्वात शेवटच्या ग्रहणाबद्दल जाणून घेऊया. सनातन धर्माच्या समजुतीनुसार सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण आपल्या राशिचक्रांवर परिणाम करतात. असे मानले जाते की ग्रहण काळात सूर्यापासून निघणारी किरण हानिकारक असतात. गर्भवती महिलांनी ग्रहण काळात बाहेर पडू नये अशी देखील एक प्रथा मानली जात असते. ग्रहणकाळ सुरू होण्यापूर्वी लोक अन्न आणि पेयमध्ये तुळशीची पाने ठेवतात जेणेकरून अन्न आणि पाणी अपवित्र होणार नाही असाही काहींचा समज आहे. पौराणिक कथेनुसार ग्रहाणाबाबत एक कथा सांगितली जाते. समुद्र मंथनावेळी जेव्हा राक्षसांनी स्वर्ग, पाताळ आणि धरती या तिन्हीचा ताबा घेतला तेव्हा भगवान विष्णूंच्या मदतीनं समुद्र मंथन करण्यात आलं. त्यातून निघालेलं अमृत असूरांना मिळू नये म्हणून विष्णूंनी मोहिनीचं रुप धारण करून पहिलं अमृत देण्यासाठी निघाले असताना राक्षकांना याचा संशय आला आणि त्यांनी देवाचं रुप घेऊन देवांमध्ये जाण्याची योजना केली. हे वाचा-राशीभविष्य : मिथुन आणि मकर राशींच्या व्यक्तींना करावा लागेल समस्यांचा सामना चंद्र आणि सूर्य देवानं त्यांची ही योजना ओळखली आणि विष्णूंना त्याची माहिती दिली. पण तोपर्यंत उशिर झाला होता. राक्षसाला अमृत मिळालं होतं. तो राक्षस अमर झाला आणि त्याचे डोके राहू तर धड केतुसारखे झाले. राहू, केतू आणि चंद्र हे सूर्याचे वैरी झाली आणि नंतर या तिघांनाही पृथ्वीच्या सावलीत स्थान मिळाले. त्या काळापासून राहूला सूर्य आणि चंद्राबरोबर वैर असल्यानं ग्रहण होते अशी एक पौराणिक कथा सांगितली जाते. (सूचना- हा लेख सामान्य ज्ञानावर आधारीत आहे News 18 लोकमत याची कोणतीही पुष्टी करत नाही)
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    पुढील बातम्या