नवी दिल्ली, 14 डिसेंबर : कोरोना काळात यंदाचं शेवचं 2020 या वर्षांतलं शेवटचं सूर्यग्रहण आहे. हे ग्रहण भारतातून दिसणार नाही. सूर्यग्रहण बहुतेक दक्षिण अमेरिकेतून दिसेल. या ग्रहणात चंद्र सूर्याला पूर्णपणे व्यापून टाकणार आहे. तर सूर्य चंद्राच्या एकाच दिशेला किंवा भागाला कव्हर करणार आहे. 2021 मध्ये दोन सूर्यग्रहण दिसणार आहेत.
आज होणाऱ्या सूर्यग्रहणाची काय असेल वेळ? कुठे पाहता येणार?
हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही तर भारताबाहेरच्या देशांमध्ये दिसणार आहे. भारतीय वेळेनुसार हे ग्रहण संध्याकाळी 7 वाजून 3 मिनिटांनी सुरू होईल तर रात्री 12 वाजता संपणार आहे. साधारण 5 तासांचं हे ग्रहण असणार आहे.
संध्याकाळी उशीरा असल्याने सूर्य ग्रह सोमवारी भारतात दिसणार नाही. संपूर्ण सूर्यग्रहण दक्षिण अमेरिकेत चिली आणि अर्जेंटिनाच्या काही भागांतून सर्वोत्तम दिसेल. चंद्रामुळे सूर्य झाकोळला जातो म्हणून चिली आणि अर्जेंटिनामध्ये काळोख होणार आहे. अमेरिकेच्या दक्षिण भाग, नैऋत्य आफ्रिका आणि अंटार्क्टिका येथे काही अंशी सूर्यग्रहण दिसणार आहे. अमेरिकेची अंतराळ संस्था नासा लोकांना हे ग्रहण पाहण्यासाठी त्यांची लिंक देखील देणार आहे.
हे वाचा-Solar Eclipse: वर्षातलं शेवटचं सूर्यग्रहण आज, जाणून घ्या महत्त्व आणि पौराणिक कथा
सूर्यग्रहण असच पाहू नका. सूर्यग्रहण असंच पाहिलं तर डोळ्यांना त्या किरणांमुळे त्रास होऊ शकतो. जाणकार लोक म्हणतात नुसत्या डोळ्यांनी सूर्यग्रहण पाहू नये. ग्रहण काळात सूर्य उघड्या डोळ्यांनी पाहिला तर डोळ्यांचा विकार होण्याची शक्यता असते. म्हणून ग्रहणादरम्यान सूर्याकडे पाहण्यासाठी विशिष्ट प्रकारचे चष्मे मिळतात त्यांचा वापर करावा. असे म्हणतात की सूर्यग्रहण पाहण्याचा आणि त्याच्या प्रकाशात राहिल्यास त्याचा परिणाम संपूर्ण शरीराच्या आरोग्यावरही होतो. असे म्हटले जाते की असे केल्याने त्वचा, केस आणि बोलण्याशी संबंधित आजार उद्भवू शकतात. म्हणून, सुतक काळाच्या समाप्तीपर्यंत सूर्यप्रकाशाकडे जाऊ नये किंवा सूर्याकडे पाहू नये असंही बरेचदा सांगितलं जातं.
(सूचना- हा लेख सामान्य ज्ञानावर आधारीत आहे News 18 लोकमत याची कोणतीही पुष्टी करत नाही)