Surya Grahan 2019- जाणून घ्या कुठे आणि कधी दिसेल?

Surya Grahan 2019- जाणून घ्या कुठे आणि कधी दिसेल?

नव्या वर्षातील पहिल्या आठवड्यात पहिलं सूर्यग्रहण आज सुरू झालं. हे खंडग्रास सूर्यग्रहण आहे.

  • Share this:

नव्या वर्षातील पहिल्या आठवड्यात पहिलं सूर्यग्रहण आज सुरू झालं. हे खंडग्रास सूर्यग्रहण आहे. या सूर्यग्रहणाची सुरुवात 5 जानेवारीच्या मध्यरात्रीपासून झाली. शनिचर अमावस्या असल्यानं या ग्रहणाचं धार्मिक महत्व जास्त आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, या काळात दान धर्म करण्याचा सल्ला दिला जातो.

कुठे दिसणार ग्रहण

आजचं सूर्यग्रहण उत्तर-पूर्व आशिया आणि पॅसिफिक महासागराच्या क्षेत्रात दिसणार आहे. जपान, कोरिया, मंगोलिया, तैवान, रशियातील लोक आजचे सूर्यग्रहण पाहू शकतील. तसेच जगातील इतर काही भागात हे ग्रहण दिसणार आहे. मात्र भारतात हे ग्रहण दिसणार नाही.

ग्रहणाचा कालावधी

भारतीय प्रमाणवेळेनुसार सूर्यग्रहण सकाळी 5 वाजून 04 मिनिटांनी सुरु होईल तर ते ९ वाजून १८ मिनिटांपर्यंत असणार आहे.

२०१९ मध्ये ५ वेळा सूर्यग्रहण

२०१९ मध्ये एकूण पाचवेळा सूर्यग्रहण लागणार आहे. २ आणि ३ जुलैलादेखील सूर्यग्रहण होईल मात्र ते भारतात दिसणार नाही. २६ डिसेंबरला होणारं सूर्यग्रहण भारतात दिसणार आहे.

खंडग्रास सूर्यग्रहण म्हणजे का?

सूर्य आणि पृथ्वी या दोन्हींच्यामध्ये चंद्र आल्यावर सूर्यग्रहण लागतं. यावेळी पृथ्वीवर चंद्राची सावली पडते आणि सूर्य दिसेनासा होतो. पण जेव्हा चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्यामध्ये पूर्ण येत नाही तेव्हा खंडग्रास सूर्यग्रहण होते.

First published: January 6, 2019, 2:23 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading