Home /News /lifestyle /

वाट्टेल ते! बायको बुटकी आणि सावळी आहे म्हणून हवा घटस्फोट, MNC मध्ये काम करणाऱ्या इंजिनिअरची मागणी

वाट्टेल ते! बायको बुटकी आणि सावळी आहे म्हणून हवा घटस्फोट, MNC मध्ये काम करणाऱ्या इंजिनिअरची मागणी

'बाला' (Bala movie) सिनेमाची आठवण देणारी ही घटना खरोखर घडली आहे. PhD करणाऱ्या बायकोला इंजिनिअर तरुणाने हे कारण देत घटस्फोट (Divorce case) मागितला आहे.

    लखनौ, 3 सप्टेंबर : बायको ठेंगणी आणि सावळी आहे या कारणासाठी एका उच्चशिक्षित तरुणाने घटस्फोट मागितला आहे. एका मल्टिनॅशनल कंपनीत चांगल्या पदावर काम करणाऱ्या इंजिनिअरने त्याच्या उच्चशिक्षित बायकोपासून वेगळं होण्यासाठी दिलेल्या कारणाची देशभर चर्चा सुरू आहे. काही काळापूर्वी प्रदर्शित झालेला आयुष्मान खुरानाचा 'बाला' चित्रपट आठवेल अशी ही घटना उत्तर प्रदेशात गाझियाबादमध्ये घडलेली ही खरी घटना आहे. सिनेमात जसं टकला नवरा नको म्हणून नवपरिणित बायको लग्न अवैध ठरवलं जावं असं अपील करते, अगदी त्याच धर्तीवर ठेंगणी आणि काळी बायको नको म्हणून या इंजिनिअर तरुणाने घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. कोर्टाने हा अर्ज नोंदवून घेत मध्यस्थीसाठी प्रयत्न करणाऱ्या कौन्सेलिंग केंद्राकडे हे प्रकरण सोपवलं आहे. मनोज तिवारी या वकिलांमार्फत तरुणाने घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. हा तरुण गुरुग्रामला एका मोठ्या कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. त्याचा विवाह PhD करणाऱ्या एका तरुणीशी झाला होता. पण हा विवाह आपल्यावर दबाव आणून करण्यात आला असल्याचं या तरुणाचं म्हणणं आहे. मेरठला राहणाऱ्या आपल्या मामांनी आई-वडिलांकरवी आपल्यावर या लग्नासाठी दबाव आणला. 'या मामांनी आपल्या नात्यातल्या या मुलीशी लग्न करण्यास मला भाग पाडलं. गेल्या वर्षी जूनमध्ये हे लग्न झालं होतं. प्रथम मुलीला बघायला गेलो तेव्हाच ती नापसंत होती. पण घरच्यांच्या दबावामुळे लग्न केलं', असं या तरुणाचं म्हणणं आहे. मुलगी स्मार्ट नाही, बुटकी आणि सावळी आहे. आणच्यात एकही गोष्ट पटण्यासारखा नाही. म्हणून घटस्फोट द्यावा, अशी त्याची मागणी आहे.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    पुढील बातम्या