Home /News /lifestyle /

पालकांनो Alert! फक्त एक चिप खाताच मुलं रुग्णालयात; सोशल मीडियावरील One Chip Challenge ठरतंय खतरनाक

पालकांनो Alert! फक्त एक चिप खाताच मुलं रुग्णालयात; सोशल मीडियावरील One Chip Challenge ठरतंय खतरनाक

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

सोशल मीडियावर व्हायरल होणारं One Chip Challenge मुलांसाठी ठरतंय धोकादायक.

    वॉशिंग्टन, 22 जानेवारी :  सोशल मीडियावर फोटो, व्हिडीओजसोबत बरेच गेम्स आणि चॅलेंजही व्हायरल होत असतात (Social media viral challenge). सध्या असंच एक चॅलेंज ट्रेंडमध्ये आहे (One Chip Challenge Trend) , ते म्हणजे वन चिप चॅलेंज. जे चॅलेंज स्वीकारणाऱ्या मुलांवर रुग्णायात भरती होण्याची वेळ आली आहे. काही मुलांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे (One Chip Challenge cause child hospitalised). चिप्स... लहान मुलं खूप आवडीने खात असतात. त्यात आता हल्लीची लहान मुलं सोशल मीडियावरही अॅक्टिव्ह असतात. त्यामुळे अशा व्हायरल होणाऱ्या चॅलेंजबाबत त्यांना माहिती असतं. त्यामुळे चिप्स खाण्याचं चॅलेंज मिळालं तर साहजिकच कुणीही ते घेईल. सोशल मीडियावर व्हायरल होणारं हे वन चिप चॅलेंज अशाच शालेय मुलांनी घेतलं आणि त्यांची अवस्था भयंकर झाली. अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात या चॅलेंजमुळे बऱ्याच शालेय मुलांना रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे. कॅलिफोर्निया स्कूल डिस्ट्रिक्टने दिलेल्या माहितीनुसार शाळेतील कमीत कमी 3 विद्यार्थ्यांनी व्हायरल वन चिप चॅलेंज घेतल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली. चिप्स खाल्ल्यानंतर ते आजारी पडले. त्यापैकी काही मुलं सॅक्रामेंटोजवळील लोदी हायस्कूलचे आहेत. हे वाचा - वॉशिंग मशीन वापरताय सावधान! कपडे धुताना महिलेसोबत भयंकर दु्र्घटना; जागीच मृत्यू न्यूजवीकशी बोलताना शाळेच्या प्रिन्सिपल एडम ऑरबॅक यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं, हे चॅलेंज घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्या एकसारखीच समस्या उद्भवली आहे. मसालेदार चिप्स खाल्ल्यानंतर त्यांना श्वास घ्यायाला त्रास होतो आहे. काहींना उलटी होते आहे. शाळेत असे मसालेदार चिप्स आणणाऱ्या घरी पाठवलं जाईल, असा इशाराही मुख्याध्यापकांनी दिला आहे. पालकांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत. काय आहे वन चिप चॅलेंज? Paqui ब्राँडद्वारा देण्यात आलेलं हे चॅलेंज. #onechipchalleng हॅशटॅगने हे चॅलेंज ट्रेंड होतं आहे. ब्रांड वेबसाईटच्या मते, हे बटाट्याचे चिप्स आहेत. त्यात कॅरोलिना रिपर आणि स्कॉर्पिअन काळी मिरी टाकण्यात आली आहे. खूप तिखट असलेलं हे पोटॅटो चिप्स खाण्याचं चॅलेंज देण्यात आलं. हे चिप्स खाल्ल्यानंतर त्यावर काहीच प्यायचं नाही आहे. हे चिप्स इतके तिखट आहे की तोंड-नाक-डोळ्यातून पाणी येतं. पोटातही आग आग होते.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Parents and child, Social media trends, Social media viral, Viral

    पुढील बातम्या