सोशल मीडियामुळे तुटतायत जवळची नाती

सोशल मीडियामुळे तुटतायत जवळची नाती

कौटुंबिक न्यायालयाच्या आकडेवारीनुसार ३० टक्के घटस्फोट हे केवळ सोशल मीडियाच्या वापरामुळे निर्माण झालेल्या वादातून होताहेत.

  • Share this:

प्रवीण मुधोळकर, 23 आॅक्टोबर : स्मार्ट फोननं माणसाचं आयुष्यं बदलून टाकलं. नवी व्हर्च्युअल नाती निर्माण झाली. पण त्यातून घरातली नाती मात्र तुटत असल्याचं समोर येतंय. कौटुंबिक न्यायालयाच्या आकडेवारीनुसार ३० टक्के घटस्फोट हे केवळ सोशल मीडियाच्या वापरामुळे निर्माण झालेल्या वादातून होताहेत.

नागपूरच्या कौटुंबिक न्यायालयाच्या या इमारतीतली ही गर्दी कौटुंबिक वादातून झालेली भांडणं, घटस्पोट आणि पोटगी संदर्भातील प्रकरणांतील पक्षकारांची आहे. गेल्या दशकात आर्थिक चणचण, व्यसनाधीनता आणि नवरा - सासरच्याकडून हुंड्यासाठी छळ अशा कौटुंबिक प्रश्नातून घटस्फोट व्हायचे.  पण आता घटस्फोटांसाठी सोशल मीडिया हे प्रमुख कारण म्हणून समोर येतंय.

नागपूरच्या कौटुंबिक न्यायालयाच्या काऊन्सिलर डॉ. मंजुषा कानडे म्हणतात, 'आमच्याकडे येणाऱ्या १००पैकी तीस केसेसे या सोशल मीडियातून झालेल्या भांडणातून होत असतात. व्हाट्सअप लास्ट seen हे संसाराचा लास्ट Sean होतोय.

व्हाट्सअप, फेसबुक, इन्स्टाग्रामवर तासनतास खास करून रात्री होणारी चॅटिंग नवरा बायकोच्या नात्यांवर संक्रांत येतीय.  यातून होणारे भांडण हेच घटस्फोटासाठीचं कारण असल्याचं अनेकांनी घटस्पोटाच्या अर्जात लिहिलंय.

मानसोपरचार तज्ज्ञ सुनीता लानकर सांगतात, 'अनेक जोडप्यांना आम्ही समजावत असतो की लहान सहान गोष्टीवरून संसार मोडू नका. पण सोशल मीडियावरून पोस्ट करणं, फोटो शेअर करणं, फोटोत कोण आहे अशा गोष्टी वरून वाद होतात ते शेवटी घटस्फोटापर्यंत जातात.'

सोशल मीडियाच्या अतिरेकी वापरानं चांगले सुखातले संसार तुटत चाललेत. जगभरातील माणसं सोशल मीडियानं एका टचनं जवळ आली तर यातून होणाऱ्या भांडणांनी नवरा बायकोला एकमेकांपासून दूर नेताहेत.

सहज आणि सुंदर वाटणाऱ्या या व्हर्च्युअल जगाच्या भोवऱ्यात सापडेलेल्यांना आपण अडकलोय याची जाणीव होत नाही. जेव्हा ती होते तेव्हा वास्तवात त्यांनी बरंच काही गमावलेलं असतं. ज्याची भरपाई व्हर्च्युअल जगातून होणं शक्य नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 23, 2017 09:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading