मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Cannes film festival 2021 : ... म्हणून कान्स रेड कार्पेटवर ब्रेस्ट पंप लावून उतरली सौंदर्यवती

Cannes film festival 2021 : ... म्हणून कान्स रेड कार्पेटवर ब्रेस्ट पंप लावून उतरली सौंदर्यवती

दीपा बुलेर खोसला (Diipa Büller-Khosla) कान्समधील आपल्या सुंदर ड्रेसवर ब्रेस्ट पंप (Diipa Büller-Khosla Breast pump) लावून दिसली.

दीपा बुलेर खोसला (Diipa Büller-Khosla) कान्समधील आपल्या सुंदर ड्रेसवर ब्रेस्ट पंप (Diipa Büller-Khosla Breast pump) लावून दिसली.

दीपा बुलेर खोसला (Diipa Büller-Khosla) कान्समधील आपल्या सुंदर ड्रेसवर ब्रेस्ट पंप (Diipa Büller-Khosla Breast pump) लावून दिसली.

  • Published by:  Priya Lad

कान्स, 14 जुलै :  कान्स फिल्म फेस्टिव्हल (Cannes film festival) म्हटलं की सेलिब्रिटींच्या हटके स्टाइलची चर्चा असते. सेलिब्रिटींचे ड्रेस, ज्वेलरी सर्वांचं लक्ष वेधून घेतात. एकापेक्षा एक सौंदर्यवती आपला जलवा दाखवतात. अशाच सौंदर्यवतींमध्ये चर्चेत आहे ती सोशल मीडिया इन्फ्लूएंसर दीपा बुलेर खोसला (Diipa Büller-Khosla) जिनं संपूर्ण जगाचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं आहे.

दिपा खोसला कान्समधील आपल्या सुंदर ड्रेसवर ब्रेस्ट पंप (Diipa Büller-Khosla Breast pump) लावून दिसली. दिपाने आपल्या सोशल मीडियावर हा फोटो पोस्ट केला आहे. सोबतच तिने भला मोठा मेसेजही लिहिला आहे. दिपाचा हा फोटो एक स्ट्राँग आई असल्याचं दाखवून देते.

दिपा म्हणते, "माझ्यासाठी आई होणं म्हणजे मुलाला जन्म देण्याच्या कितीतरी पटीने जास्त आहे. न पाहताच एका मुलाला ओळखणं त्याच्यावर प्रेम करणं म्हणजे आई होणं. तो तुमच्यावर अवलंबून असतो आणि तुम्ही आयुष्यभर त्याला मार्गदर्शन करता. आई होण्याचा अर्थ ज्याला तुम्ही या जगात आणलं त्याची जबाबदारी उचलणं आहे. तुम्ही आयुष्यभर त्याची देखभाल करता आणि त्याला खूप प्रेम देता"

हे वाचा - हातपाय खिळखिळे होईपर्यंत देश पिंजून काढला; अखेर 24 वर्षांनी बापाने लेकाला शोधलंच

"आई होणं म्हणजे तुम्ही सर्वांमध्ये टाइगेट होणं आणि कोणीतरी तुम्हाला काहीतरी सांगत राहणं. एक आई होण्याच्या नात्याने तुम्ही हे खूप वेळा ऐकलं असेल? तुमच्यासाठी हे विचार तुमचं कुटुंब, मित्र किंवा इतर कुणाचेही असू शकतात. खरंतर मातृत्वासाठी काही नियम नाही. तुमच्यासाठी काय चांगलं आणि काय वाईट हे फक्त शिकण्यातून किंवा अनुभवातूनच समजतं", असं ती म्हणते.

हे वाचा - 'MIMI'साठी क्रितीने वाढवलं होतं 15 किलो वजन; चित्रपटाचा ट्रेलर ठरतोय हीट

"मी माझ्या बाळाला ब्रेस्टफिड करायचं की नाही हे कुणाच्या चर्चेचा विषय कसं काय असू शकतं. ब्रेस्टफिंडिंगसंबंधीत लोकांचे काही नियम आहेत, जे प्रत्येक आईवर लागू होत नाही. आई होण्यासंबंधी लोकांचे नियम त्या महिलांना बिलकुल लागू नसायला हवेत ज्या मातृत्वाचा सुंदर प्रवास ठरवत आहेत", असं दीपा म्हणाली.

First published:

Tags: Entertainment, Fashion, Festival, Lifestyle