मुंबई, 10 एप्रिल : भूक लागली, काही वेगळं खावंसं वाटलं तर हल्ली हाॅटेल्सचा फोन नंबर शोधत बसावा लागत नाही. Zomato वर लाॅग इन केलं की बरेच पर्याय समोर येतात. आपल्याला काय खायचंय, ते कुठल्या हाॅटेलमध्ये उपलब्ध आहे, तेही शोधता येतं. भारतीय कुठल्या कुठल्या शहरात झोमॅटोवर आॅर्डर देतात, ते पाहा.
मणिपाल हे शहर शैक्षणिक संस्थांचं शहर आहे. अख्ख्या देशात इथे झोमॅटोवरून जास्त डिलिव्हरी होतात.
राजस्थानमधलं कोटामधून झोमॅटोवरून खाद्य मागवण्याची संख्या वाढतेय. अहमदाबादमध्येही झोमॅटो डिलिव्हरी जास्त आहे. गुजरातमध्ये आनंद शहरातून पिझ्झा जास्त आॅर्डर होतो. तर जम्मूमध्ये झोमॅटोवरून फास्ट फूडला जास्त मागणी आहे.
आंध्र प्रदेशमध्ये तुनी हे सर्वात लहान शहर आहे. तिथे झोमॅटोवर कॅशलेस व्यवहार जास्त चालतो. गोवाहाटी इथे तर ब्रह्मपुत्रा नदी ओलांडून झोमॅटो फूड डिलिव्हरी केली गेली.
असं म्हणतात मुंबई कधी झोपत नाही. पण झोमॅटोसाठी मध्यरात्री खाद्याची आॅर्डर जास्त येते ती इंदूरमधून.
आंध्र प्रदेशच्या विजयवाडा इथून झोमॅटोवर सर्वात जास्त ब्रेकफास्ट मागवला जातो. प्रत्येक आॅर्डरमागे जास्त बिल देणारं शहर म्हणजे उटी.
बिहारच्या गया आणि भागलपूर इथे झोमॅटो डिलिव्हरी सायकलवरून केली जाते.
झोमॅटोचं मुख्य आॅफिस आहे गुरगावला. 200 शहरांमध्ये झोमॅटोची सेवा आहे. एक लाखापेक्षा जास्त रेस्टाॅरंट्स झोमॅटोवर लिस्टेड आहेत. मार्च 2019मध्ये 30 मिलियन डिलिव्हरीज झाल्यात.
झोमॅटोचे मुख्य अधिकारी दीपिंदर गोयल म्हणाले, झोमॅटोची टेबल रिझर्वेशनचीही सुविधा आहे. ही सेवा भारतासह 8 देशांत आहे. 16000 रेस्टाॅरंटपैकी तुम्ही तुम्हाला हव्या असलेल्या रेस्टाॅरंटमध्ये झोमॅटोवरून टेबल बुक करू शकता.
VIDEO: रामदास आठवलेंनी वर्तवलं पवारांच्या बालेकिल्ल्याचं भाकीत