मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Online shopping करताय सावध राहा! प्रसिद्ध वेबसाईटवर सर्वाधिक Fake product

Online shopping करताय सावध राहा! प्रसिद्ध वेबसाईटवर सर्वाधिक Fake product

ऑनलाईन ऑर्डर (online order) केलं एक आणि आलं भलतंच... अशा भरपूर तक्रारी या ऑनलाइन शॉपिंग (online shopping) वेबसाईटबाबत आल्या आहेत.

ऑनलाईन ऑर्डर (online order) केलं एक आणि आलं भलतंच... अशा भरपूर तक्रारी या ऑनलाइन शॉपिंग (online shopping) वेबसाईटबाबत आल्या आहेत.

ऑनलाईन ऑर्डर (online order) केलं एक आणि आलं भलतंच... अशा भरपूर तक्रारी या ऑनलाइन शॉपिंग (online shopping) वेबसाईटबाबत आल्या आहेत.

मुंबई, 15 जानेवारी : एखादं ऑनलाईन प्रो़डक्ट मागवलं की त्याबदल्यात भलतीच वस्तू येते किंवा असं काही तरी येतं, जे पाहून आपल्याला शॉकच बसतो. अशी बरीच प्रकरणं तुम्ही पाहिली असावीत किंवा कदाचित तुमच्यासोबतही असं कधीतरी घडलं असावं. दरम्यान ऑनलाईन प्रोडक्ट विकरणाऱ्या अशाच वेबसाईटपैकी एक असलेल्या स्नॅपडीलवर (snapdeal) फेक प्रोडक्टचं प्रमाण वाढतं आहे, यावर अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधीनींही शिक्कामोर्तब केलं आहे.

ग्राहकांना बनावट वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या जगातल्या सर्वांत मोठ्या ई-कॉमर्स वेबसाइटमध्ये स्नॅपडीलचाही (Snapdeal) समावेश होतो, असं युनायटेड स्टेट्स ट्रेड रिप्रेझेंटेटिव्हनी (United States Trade Representative) या संदर्भातील एका अहवालात म्हटलं आहे. भारताचा विचार करता अॅमेझॉन (Amazon) आणि फ्लिपकार्टनंतर (Flipkart) स्नॅपडील हे तिसऱ्या क्रमांकाचं ई-कॉमर्स पोर्टल (E-Commerce) असून, बनावट वस्तू देऊन ग्राहकांची फसवणूक करणं आणि त्याबद्दल विक्रेत्यांना कोणतीही शिक्षा न करणं असा स्नॅपडीलचा भारतातील इतिहास आहे.

'2020 रिव्ह्यू ऑफ नटोरियस मार्केट्स फॉर काउंटरफीटिंग अँड पायरसी' या नावाचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. त्यात युनायटेड स्टेट्स ट्रेड्स रिप्रेझेंटेटिव्हच्या कार्यालयाने स्पॅनपडीलचा उल्लेख केला आहे. वेगवेगळ्या देशांमध्ये पायरसी आणि बनावट उत्पादनांच्या (Fake Prodducts) विक्रीला प्रोत्साहन देण्यामध्ये ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सची भूमिका या अहवालातून उघड करण्यात आली आहे. स्नॅपडीलबाबत या अहवालात म्हटलं आहे, की नोव्हेंबर 2018च्या सर्वेक्षणानुसार स्नॅपडीलच्या 37 टक्के ग्राहकांना आपण मागवल्यापेक्षा भलतंच उत्पादन मिळाल्याचा अनुभव आला. जुलै 2019 मध्ये स्नॅपडीलच्या संस्थापकांवर भारतात खोटी उत्पादनं विकल्याबद्दल गुन्हेगारी वर्तनाचा आरोप ठेवण्यात आला होता. काही जणांनी स्नॅपडीलवर खटलाही दाखल केला होता.

न्यूज 18 ने 2020 च्या सुरुवातीला अशाच प्रकारची एक बातमी दिली होती. स्नॅपडीलवरून बनावट एन 95 मास्कची किंवा भरमसाट किंमत असलेल्या मास्कची किंवा दोन्ही प्रकारे फसवणूक करून विक्री झाल्याचा उल्लेख त्या बातमीत होता. शॉपक्लूज, फ्लिपकार्ट यांच्यासह स्नॅपडीलही अशा प्रकारे ग्राहकांची फसवणूक करणारं मोठं ई-कॉमर्स पोर्टल असल्याचं त्या बातमीत म्हटलं होतं. कारण या पोर्टल्सवरून विक्रेते बनावट उत्पादनांची विक्री करत होते. त्यापैकी अनेकांना कोणत्याही छाननीशिवाय उद्योगाची मोफत नोंदणी करू देण्यात आली होती. त्यामुळे बनावट उत्पादनांच्या विक्रीचा वेग वाढला होता.

हे वाचा - दिवसरात्र मोबाईल हातात; फक्त वेळच नाही, तर तुमचा खिसाही होतोय रिकामा

त्या वेळी स्नॅपडीलच्या प्रवक्त्याने असं सांगितलं होतं की, बनावट उत्पादनं मिळाल्याबद्दल ग्राहकांच्या आलेल्या तक्रारी आणि बाहेरून मिळालेल्या माहितीची आम्ही नियमित दखल घेतो. मात्र ई-कॉमर्स पोर्टलचा गैरवापर करणाऱ्या विक्रेत्यांना आळा घालण्यासाठी कंपनी नेमके कोणते प्रयत्न करते, याबद्दल तो प्रवक्ता ठोस काही सांगू शकला नाही. या पार्श्वभूमीवर यूएस ट्रेड रिप्रेझेंटेटिव्ह ऑफिसला मिळालेल्या माहितीनुसार, बनावट उत्पादनांच्या विक्रीचे प्रकार स्नॅपडीलवरून होण्याचं प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढलेलंच आहे.

स्नॅपडील हे भारतातल्या सर्वांत मोठ्या स्टार्टअप्सपैकी (Startup) एक होतं. त्या कंपनीचं मूल्य 6.5 अब्ज डॉलरपर्यंत गेलं होतं. कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आलेली असताना स्नॅपडीलने असा दावा केला होता, की त्यांचा तोटा 95 टक्क्यांनी कमी करून (फोर्ब्ज इंडियाच्या अहवालानुसार) आणि खेळतं भांडवल 85 टक्क्यांनी वाढवून कंपनीने आपला व्यवसाय यशस्वीपणे सुरू ठेवला होता. देशातल्या ई-कॉमर्स कंपन्यांमध्ये पुन्हा उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी कंपनी धडपडत होती. या पार्श्वभूमीवर, अमेरिकेच्या रिपोर्टकडे पाहायला हवे.

हे वाचा - Explainer: व्हॉट्सॲप, सिग्नल आणि टेलिग्राम; नेमकं काय सुरक्षित आणि सोपं?

मुंबईचं हिरा पन्ना मार्केट, कोलकात्यातलं किडरपोरमधलं फॅन्सी मार्केट, नवी दिल्लीतला पालिका बझार आणि टँक रोड ही चार भारतीय ऑफलाइन मार्केट्स बनावट उत्पादनांची खाण असल्याचा उल्लेख त्या अहवालात आहे. उत्पादनांच्या पायरसीमध्ये चीन आणि हाँगकाँग हे हॉटस्पॉट्स आहेत. तसंच, भारत, सिंगापूर, थालयंड, तुर्की आणि संयुक्त अरब अमिराती या देशांमध्ये बनावट वस्तूंचा खुला व्यापार हे मोठं आव्हान असल्याचा उल्लेखही या अहवालात आहे.

First published:

Tags: Fake, India, Online shopping, USA