सावधान! तुमच्या स्वप्नातही येतो का साप, हा आहे त्याचा खरा अर्थ

असं म्हटलं जातं की, प्रत्येक स्वप्न काही ना काही सांगतं. आपण दिवसभरात अनेक स्वप्न पाहतो ज्याचा संबंध आपल्या अंर्तमनाशी असतो.

News18 Lokmat | Updated On: Aug 18, 2019 01:33 PM IST

सावधान! तुमच्या स्वप्नातही येतो का साप, हा आहे त्याचा खरा अर्थ

असं म्हटलं जातं की, प्रत्येक स्वप्न काही ना काही सांगतं. आपण दिवसभरात अनेक स्वप्न पाहतो ज्याचा संबंध आपल्या अंर्तमनाशी असतो. अनेकदा दिवसभर आपण जो विचार करतो किंवा जसा दिवस जातो त्याच्याशी निगडीत गोष्टी आपल्या स्वप्नात येतात. पण, अनेकदा असंही होतं की, ज्या गोष्टींची आपण कधी कल्पनाही केलेली नसते त्या गोष्टी स्वप्नात येतात. अशावेळी अनेकदा आपण त्या स्वप्नांचा अर्थ काय असू शकतो याचा विचार करतो. स्वप्न शास्त्रानुसार, स्वप्नात साप दिसण्याचा अर्थ काय असू शकतो ते जाणून घेऊ...

जर तुम्हाला स्वप्नात पांढऱअया रंगाचा साप दिसला तर घाबरण्याचं काही कारण नाही. अनेकजण पांढऱ्या रंगाचा साप स्वप्नात दिसणं हे चांगलं लक्षण मानतात. याचा अर्थ येणाऱ्या काळात तुम्हाला आर्थिक लाभ होणार असा होतो.

जर तुम्हाला स्वप्नात अनेदा साप दिसला तर पत्रिकेत पितृदोष किंवा सर्पदोष असल्याचं म्हटलं जातं. तसेच जर तुम्हाला हवेत उडणारा साप दिसला तर ते अशुभ मानलं जातं. भविष्यात तुमच्यावर आर्थिक संकट कोसळू शकतं किंवा तुम्ही आजारी पडू शकता.

जर स्वप्नात साप तुमचा पाठलाग करत आहे आणि तुम्ही जीव मुठीत घेऊन पळत आहात तर भविष्यात तुमच्यासोबत एक मोठा अपघात घडणार आहे असं मानलं जातं.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सुचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

Loading...

KISS ने डिप्रेशन होतं दूर, जाणून घ्या याचे आणखीन फायदे!

या चार गोष्टी तुमचं लव्ह लाइफ उद्धस्त करतात!

ऑफिसमधला ताण कमी करायचाय तर हे उपाय कराच!

SPECIAL REPORT: पिंपरी चिंचवड पालिकेचा जक्कास उपक्रम, 107 शाळांमध्ये गणेश मूर्ती साकारण्याचं प्रशिक्षण!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 18, 2019 01:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...