Home /News /lifestyle /

थांबा! आताच सिगरेट सोडा नाहीतर पश्चाताप करण्यासाठीही वेळ मिळणार नाही

थांबा! आताच सिगरेट सोडा नाहीतर पश्चाताप करण्यासाठीही वेळ मिळणार नाही

अजूनही वेळ गेली नाही! सिगरेट सोडल्यामुळे शरीर आणि मनाला होणार हा फायदा.

    मुंबई, 02 जानेवारी: सिगरेट ओढणं आता फॅशन नाही तर सवयीचं झाल्याचं पाहायला मिळत आहे. अगदी वयात येणाऱ्या मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सिगरेट ओढणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बऱ्याचवेळा सिगरेट सोडण्यासाठी आपण फार प्रयत्न करतो तरीही ती सवय सुटत नाही. सिगरेटची सवय लवकर सुटत नाही असं म्हटलं जातं, किंवा अनेकांना सुटलेली सवय पुन्हा लागते. अशावेळी आपण विचार करतो जाऊदे आता खूप उशीर झाला आहे तसाही आता काय फायदा. सिगरेट केव्हाही सोडली तरीही ती शरीरासाठी चांगलीच असते. ती सोडण्यासाठी कोणत्याही वेळेची वाट पाहावी लागत नाही. एका अभ्यासातून असं समोर आलं आहे की धूम्रपान सोडण्यास उशीर कधीच होत नाही. नुकत्याच केलेल्या अभ्यासानुसार, धूम्रपान सोडण्याने केवळ फुफ्फुसांचे नुकसान कमी होणार नाही तर फुफ्फुसातील वाईट झालेल्या सेल्स बऱ्या होण्यास मदत होते. या अभ्यासात असे दिसून आले आहे की सिगारेट सोडल्यानंतर कर्करोगाच्या पेशी तयार होण्याऐवजी चांगल्या पेशी तयार होतात. हेही वाचा-सावधान !  प्रेग्नन्सीमध्ये करू नका ‘ही’ चूक; नाहीतर बाळाला होऊ शकतं फ्रॅक्चर जपानच्या टाइम्सने दिलेल्या अहवालानुसार 30 ते 40 वर्ष सलग स्मोकिंग करणारे म्हणतात आम्ही आता सिगरेट सोडून काय फायदा? जे नुकसान होत ते होणार आहे. मात्र असं काहीच नाही. सिगरेट केव्हाही आणि कोणत्याही वयात सोडली जाऊ शकते. ज्या दिवशी सिगरेट सोडाल त्या दिवसापासून स्वस्थ सुधारण्यास मदत होते. या अभ्यास 16 हजार लोकांवर करण्यात आला होता. या लोकांनी काही दिवसांपासून स्मोकिंग सोडलं होतं. त्यांच्या फुफ्फुसाची तपासणी केल्यानंतर त्यांच्या सेल्सची सुधारणा होत असल्याचं लक्षात आलं आहे. त्यामुळे सिगरेट सोडल्यानं कर्करोगाचा धोका टळू शकतो असंही या अहवालातून समोर आलं आहे. हेही वाचा-गुगल सर्च करत आहात, जरा जपून; त्याआधी वाचा या गोष्टी...
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Smoking

    पुढील बातम्या