मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

दोनदा अंघोळ करून पण घामाचा वास जात नाही? जास्त घाम येणं नॉर्मल नाही

दोनदा अंघोळ करून पण घामाचा वास जात नाही? जास्त घाम येणं नॉर्मल नाही

घामाचा वास येण्याची कारणे

घामाचा वास येण्याची कारणे

घामाचा वास येत असल्यानं चारचौघांमध्ये आपल्याला लाजिरवाणे वाटते. पण घामाचा वास का जात नाही याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? त्वचेवर बॅक्टेरिया आणि घामाच्या मिश्रणामुळे शरीराला दुर्गंधी येते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Ramesh Patil

मुंबई, 26 नोव्हेंबर : प्रत्येकाला घाम येतो, पण प्रत्येकाच्या घामाला दुर्गंधी येतेच असे नाही. आपल्या घामाच्या वासाने आजूबाजूच्या अनेकांना त्रास होतो. सुगंधित साबण आणि परफ्यूम वापरल्यानंतर किंवा आंघोळ केल्यावर वास कमी होतो, परंतु काही लोकांच्या घामाचा वास आंघोळ करूनही जात नाही. घामाचा वास येत असल्यानं चारचौघांमध्ये आपल्याला लाजिरवाणे वाटते. पण घामाचा वास का जात नाही याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? त्वचेवर बॅक्टेरिया आणि घामाच्या मिश्रणामुळे शरीराला दुर्गंधी येते. कधीकधी हार्मोन्स, अन्न, संसर्ग, औषधे आणि मधुमेह यांसारख्या परिस्थितींमुळे देखील शरीराचा गंध बदलू शकतो. घामाचा वास येण्याची अनेक कारणे आहेत, चला जाणून घेऊया.

हार्मोन्स बदलतात -

जास्त घाम येणे आणि शरीराची दुर्गंधी हार्मोनल चढउतारांमुळे असू शकते. क्लीव्हलँड क्लिनिकच्या मते, जेव्हा एखादी व्यक्ती विशिष्ट स्थितीत असते तेव्हा शरीराचा वास येतो. गर्भधारणेदरम्यान, प्रीमेनोपॉज किंवा रजोनिवृत्ती, हार्मोन्स आणि घाम ग्रंथींच्या क्रियाकलापांमध्ये वाढ झाल्यामुळे घामाची दुर्गंधी येऊ शकते. महिलांना रात्री घाम येण्याचा त्रास जाणवतो, ज्यामुळे घामाचा वास वाढू शकतो.

आजारपणामुळे -

जास्त घाम आल्याने शरीराची दुर्गंधी येण्याची शक्यता वाढते. मधुमेह, लठ्ठपणा, थायरॉईड, किडनी रोग, संसर्ग आणि संधिरोग यांसारख्या काही वैद्यकीय परिस्थिती आणि रोगांमुळे देखील घाम येऊ शकतो. शरीराच्या गंधात अचानक बदल जाणवल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.

मसालेदार अन्न -

मसालेदार अन्न, कांदा, लसूण, अल्कोहोल आणि कॅफिनच्या अतिसेवनामुळे देखील घामाचा वास येऊ शकतो. शरीरातील प्रथिनांचे प्रमाण वाढल्याने दुर्गंधी देखील वाढू शकते.

अधिक ताण घेणं -

अशा लोकांच्या घामाला जास्त वास येतो जे जास्त चिंताग्रस्त, तणावग्रस्त असतात. जर शरीराला जास्त वास येत असेल तर याचा अर्थ शरीर खूप तणावाखाली आहे. शरीरात घाम येणे सामान्य आहे, परंतु जास्त घाम येणे हे काही समस्यांचे कारण असू शकते. जास्त घाम येणे किंवा दुर्गंधी आल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

हे वाचा - हिवाळ्यात सांधेदुखी, संधिवाताचा त्रास टाळण्यासाठी या गोष्टींकडे वेळीच लक्ष द्या

(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

First published:

Tags: Health, Health Tips