स्मार्ट दिसायचंय ?, पुरुषांसाठी स्मार्ट टीप्स

स्मार्ट दिसायचंय ?, पुरुषांसाठी स्मार्ट टीप्स

पुरुष तशी फारशी काळजी घेताना दिसत नाहीत, पण काही सोपे उपाय वापरल्याने तुम्ही ही खूप स्मार्ट दिसू शकता.

  • Share this:

खरं आहे की महिला आपल्या त्वचेची खूप काळजी घेतात. सगळ्यात जास्त वेळ त्या सजण्या-सावरण्यात घालवतात. पुरुष तशी फारशी काळजी घेताना दिसत नाहीत, पण काही सोपे उपाय वापरल्याने तुम्ही ही खूप स्मार्ट दिसू शकता.

धूम्रपान सोडा

स्मोकिंग आपल्या शरिराला आणि सुंदरतेला खूप घातक आहे. सिगारेट पिल्याने प्रकृती तर खराब होतेच पण त्याचा वाईट परिणाम सगळ्यात आधी आपल्या चेहऱ्यावर पाहायला मिळतो. सिगारेटच्या सेवनाने चेहऱ्यावर सुरकत्या पडतात, चेहरा हिरमुसल्यासारखा होतो, आणि ओठं पण काळे पडतात.जर स्मार्ट दिसायचे असेल तर मग धूम्रपानापासून लांब राहणचं योग्य असेल.

दातांची निगा

शरिर आणि चेहऱ्याच्या सुंदरतेनंतर दांतांची निगा राखणं ही महत्वाचं आहे. चांगले स्वच्छ आणि पांढरे शुभ्र दात आपल्या चेहऱ्याच्या सुंदरतेला आणखी निखळ बनवतात.

केसांची काळजी

आजकाल मुलं खूप नवीन हेअर स्टाईल करतात. केस नीट विंचरणं, वेळच्यावेळी ती कापणं, योग्य तो शँपू वापरणं आपल्या चेहऱ्याला नवीन लूक आणि स्मार्ट बनवतं.

चेहऱ्याची काळजी

गरमीच्या दिवसात चेहऱ्यावर घाम येतो आणि धूळ बसते, म्हणून चेहऱ्याला दिवसातून 2-3 वेळा धूवा. असं केल्याने चेहऱ्यावर वयस्करपणा न दिसता चेहरा खुलून येतो.

रोज दाढी टाळा

तरुण दिसण्यासाठी काही जणं रोज दाढी करतात. पण त्याने तरुणं दिसणं तर लांबच पण चेहरा खडबडीत होत, त्वचेत रफनेस येतो. त्यामुळे रोज दाढी करणं टाळा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 1, 2017 08:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading